मवाळवादी युग व कार्यपद्धती
प्रारंभीचे राष्ट्रवादी मवाळ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून साम्राज्यवादाचे केलेले विश्लेषण आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी सतत चालविलेली चळवळ होय.
व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेने कशी पिळवणूक केली याचे त्यांनी विश्लेषण केले.
भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविणे हेच ब्रिटिश वसाहतवादाचे सार आहे हे त्यांनी पक्के ओळखले.
केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश, ब्रिटनमध्ये तयार होणार्या मालाला हुकमी बाजारपेठ व परकीय भांडवल गुंतवणुकीस उत्तम क्षेत्र् असे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा जो ब्रिटिश वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा हेतू होता त्याला त्यांनी जोरदार विरोध केला.
मवाळवादी युग :
कौंग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यत मवाळवादी नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यास मवाळवादी कालखंड असे म्हणतात.
मवाळ राष्ट्रवादी नेत्यांची उद्दिष्टे आणि कार्यपध्दती :
नागरी स्वातंत्र्य, स्वतंत्र वृत्तपत्रे, लोकशाहीनिष्ठ आणि वर्णभेद नसलेले प्रशासन हयांसाठी प्रारंभीच्या राष्ट्रवाद्यांनी सतत लढा दिला.
किंबहुना याच काळात राष्ट्रवाद्यांनी केलेल्या राजकीय प्रबोधनामुळे भारतीय जनतेत व विशेषत: बुध्दिमंतांना लोकशाहीची संकल्पना रुजू लागली.
आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञान जनतेत व विशेषत: बुध्दिमंतांत लोकशाहीची संकल्पना रुजू लागली.
आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा प्रसार व्हा म्हणूनही मवाळ विचारांचे नेते झटले.
प्रारंभीच्या काळातील राष्ट्रवाद्यांच्या चळवळीचा पाया अरुंद होता की एक उणीव होती. त्यावेळी या चळवळीला मोठया प्रमाणात प्रतिशाद नव्हते.
मवाळांचे राजकीय पबोधन कार्य शहरांती शिक्षित मध्यमवर्गीयांपुरते मर्यादित राहिले, मात्र त्याची धोरणे व कार्यक्रम मध्यवर्गीयापुरते मर्यादित नव्हते.
समाजाच्या सर्व वर्गातील लोकांच्या गर्हाण्यांची त्यांनी दखल घेतली व वसाहतवादाच्या वर्चस्वाविरुध्द उभरत्या भारतीय राष्ट्राच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व केले.
कोणतीही चळवळ घटनात्मक मार्गानी आणि कायद्यांच्या चौकटीत राहूनच करावयास हवी, असा मवाळांचा कटाक्ष होता म्हणूनच जाहीर सभा आणि वृत्तपत्रे यांवरच त्यांचा भर होता. अतिशय काळजीपूर्वक तयार केलेली अनेक निवेदने व अर्ज त्यांनी सरकारला पाठविले.
वरवर पाहता ही जरी सरकारला पाठविलेली निवेदने व अर्ज असले तरी त्याचे मूळ उद्दिष्ट जनतेला शिक्षित करणे व राजकीय प्रश्नांबाबत जागृत करणे हेच होते.
उदाहरणार्थ 1891 मध्ये न्या. मू. रानडयांनी गोपाळ कृष्ण गोखल्यांना सांगितले की, आपल्या देशाच्या इतिहासात आपले स्थान कोणते हयाची तुम्हाला कल्पना नाही, ही निवेदने सरकारला उद्देशून असली तरी ती नाममात्र आहेत.
वस्तुत ती जनतेला उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांच्याद्वारेच हया प्रश्नावर कसा विचार करावयाचा ते त्यांना कळून येईल. कारण हया प्रकारचे राजकारण हया देशाला सर्वस्वी नवे आहे.
हे राष्ट्रवादी राजकीयदृष्टया मवाळ असले तरी अधिकारी आणि ब्रिटिश राजकीय नेते त्यांना राजद्रोही आणि बंडखोर मानीत.
व्हाईसरॉय र्लॉड कर्झन तर इसवी सन 1900 मध्ये म्हणाला होता की, काँग्रेस नष्ट करण्यात माझा हातभार लागावा अशी माझी महत्वाकांक्षा आहे. कारण अगदी अल्प प्रमाणात का होईना पण मवाळांनीच देशात साम्राज्यविरोधी जागृती केली होती.
साम्राज्यवादाचे त्यांनी आर्थिकदृष्टया जे प्रभावी विश्लेषण केले त्यातूनच पुढे ब्रिटिश वसाहतवादाविरुध्द जनतेची क्रियाशील चळवळ सुरु झाली.
आपल्या आर्थिक लढयाद्वारा त्यांनी ब्रिटिश सत्तेचे जे क्रर व शोषक स्वरूप स्पष्ट केले त्यामुळे या सत्तेचा नैमिक पायाच ढासळला. शिवाय मवाळ पक्षियांचा भर धार्मिक किंवा भावनिक आवाहनापेक्षा प्रत्यक्ष अभ्यास आणि जनतेला दररोज ज्या दिव्यांतून जावे लागते त्याचे परखड विश्लेषण हयांवर होता.
राष्ट्रीय चळवळीसाठी असा भक्कम पाया तयार केल्यावरच राष्ट्रव्यापी आंदोलन करावे, असा त्यांचा मानस होता व पूढे अशी राष्ट्रव्यापी चळवळ झाली.
No comments:
Post a Comment