Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, November 18, 2015

क्रिडा घडामोडि

खेळातील महत्वाच्या घडामोडी :

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ब्रॅड हॅडिन याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने निवड समितीच्या शिफारशीनुसार दिनेस रामदीन याची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली .त्याच्या जागी जेसन होल्डर याला कर्णधार करण्यात आले

कर्णधार राणी रामपालच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय मुलींनी मलेशियाचा ९-१ असा धुव्वा उडविला आणि आशियाई कुमारी हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चिरत केली

बांगलादेश "अ' संघाविरुद्ध होणाऱ्या तीन दिवसांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व शिखर धवनकडे सोपविण्यात आले

इटलीच्या फ्लाव्हिया पेन्नेट्टाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. रॉबर्टा व्हिन्सी हिच्यानंतर अशी कामगिरी केलेली ती इटलीची दुसरी खेळाडू ठरली

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई केली

सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याच्यावर पुन्हा एकदा मात करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले

भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव याने जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक मिळवून, पुढील वर्षी रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले

क्रीडाविश्वांतील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू म्हणून लोकप्रिय असणारा बॉक्सढर फ्लॉइड मेवेदर याने विजेतेपदासह आपल्या कारकिर्दीची अखेर केली

हिला कुस्तीपटूंसाठी जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या आळंदी देवाची येथील जोग व्यायामशाळेला केंद्रीय क्रीडा प्राधिकरणाची (साई) मान्यता मिळाली

स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत भारताच्या लिअँडर पेसने इतिहास घडविला. हिंगीस-पेस यांना चौथे मानांकन होते. त्यांनी अंतिम सामन्यात बेथानी मॅटेक-सॅंड्‌स आणि सॅम क्यूोरी यांच्यावर ६-४, ३-६,१०-७ असा विजय संपादन केला

जागतिक आणि ऑलिंपिक विजेत्या मो फराह याने ग्रेट नॉर्थ रनचे विजेतेपद कायम राखले. केनियन धावपटूंचे कडवे आव्हान मोडून काढत त्याने ५९ मिनिटे २३ सेंकद अशी वेळ दिली

भारताच्या युकी भांब्रीने शांघाय चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले

सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याच्यावर पुन्हा एकदा मात करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले

मार्टिना हिंगीसने लिअँडर पेसपाठोपाठ सानिया मिर्झाच्या साथीत महिला दुहेरीतही विजेतेपदाला गवसणी घातली. सानिया मिर्झाने सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद जिंकले

जागतिक ‘पॅरा’ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी करत चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार ब्राँझपदकांसह अकरा पदकांची कमाई केली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व जादुई फिरकीपटू शेन वॉर्न यांनी ठरविलेल्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) परवानगी दिली

श्रीलंकेचे माजी कसोटीपटू रोशन महानामा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सामनाधिकारी म्हणून ‘एलिट पॅनेल’मधून वर्षाअखेर निवृत्तीचा निर्णय घेतला

रिओ ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी ज्वाला गुत्ता- अश्वि नी पोनप्पा, सुमीत रेड्डी आणि मनू अत्री यांची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘टॉप’ योजनेसाठी निवड झाली

ऑस्ट्रेलियाचा बॉक्स र डेव्ही ब्राऊन ज्युनियर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिलिपिन्सच्या कार्लो मॅगालीविरुद्धच्या लढतीत ‘नॉकआउट’ झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला होता

चीनमधील हॅंगझू शहरात २०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला

ज्यावेळी दूरदर्शन नव्हते, अशा काळात आपल्या ओघवत्या शैलीने आकाशवाणीवरून मराठीतून समालोचन करून क्रिकेट घराघरांत पोचवणारे ज्येष्ठ समालोचक बाळ ज पंडित यांचे दिर्घ आजाराने निधन झाले

रेल्वेच्या गोळाफेक प्रकारातील खेळाडू मनप्रीत कौर हिने बुधवारी रिओ ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध केली

चेन्नई सुपर किंग्ज संघाला कायदेशीर अस्तित्व नसल्याचा युक्तिवाद बीसीसीआयने मद्रास उच्च न्यायालयात केला.

नेमबाजीतील स्किट प्रकारातील अनुभवी मिराज अहमद खान याने बारा वर्षांच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम क्षण साजरा करताना आयएसएसएफ शॉटगन जागतिक स्पर्धेतून भारताला रिओ ऑलिंपिकसाठी कोटा मिळवून दिला

नासिर हुसेनच्या अष्टपैलू कामगिरीने बांगलादेश अ संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुक्रवारी भारतीय अ संघाचा 65 धावांनी पराभव केला

हॉकी इंडिया लीगच्या चौथ्या पर्वासाठी झालेल्या लिलावात जर्मन खेळाडूंचाच बोलबाला राहिला. भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार सरदार सिंगपेक्षा युवा खेळाडू मनदीप सिंग याला सर्वाधिक रक्कम मिळाली

दिल्ली क्रिकेट संघटनेने यंदाच्या रणजी मोसमासाठी दिल्ली संघाचे नेतृत्त्व गौतम गंभीरकडे सोपविले

डेव्हिस करंडकाच्या प्ले-ऑफ लढतीत रशियाचा पराभव करून इटलीने जागतिक गटातील आपले स्थान कायम राखले

ऑस्ट्रेलियाने बांगलादेश दौऱ्यासाठी त्यांच्या फलंदाजांना फिरकी खेळण्याचे धडे देण्यासाठी त्यांनी भारताच्या श्रीधरन श्रीराम याची सल्लागार म्हणून नियुक्ती केली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया (वय 75) यांचे निधन

एक काळ गाजविलेले टेनिसपटू यान्निक नोह यांची फ्रान्सने डेव्हिस करंडक कर्णधारपदी नियुक्ती केली

वसिम जाफरने तब्बल १९ वर्षे मुंबई क्रिकेटची सेवा केल्यानंतर आता विदर्भ संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे

वयाचे शतक गाठल्यानंतरही आपण अजूनही शंभर टक्के तंदुरुस्त असल्याची खात्री देत जपानच्या १०५ वर्षांच्या हिडेकिची मियाझाकी यांनी शंभर वर्षांपुढील वयोगटाच्या धावण्याच्या शर्यतीत ४२.२२ सेकंद अशी विश्वक विक्रमी वेळ दिली.

भारतीय क्रिकेट संघटनेचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याची बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोलकत्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याची अधिकृत घोषणा केली

भारताने 16व्या आशियाई रोईंग स्पर्धेत पाच रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळविली.

विविध वयोगटांच्या स्पर्धामध्ये वय चोरी केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) २२ खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१८च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धाही आयोजित करण्याचा प्रस्ताव भारतातर्फे सादर करण्याचा निर्णय घेतला

आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांच्यावर फिफाने तहहयात बंदी घातली आहे. त्यांना यापुढे फुटबॉलच्या कोणत्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही

स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारताच्या अडवाणीने अॅ्डलेड येथे सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. पंकजचे कारकीर्दीतील हे १४ वे विश्वविजेतेपद आहे. ३० वर्षीय पंकजने अफलातून खेळासह सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टवर ११६८ गुणांनी विजय मिळवला.

डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वासिमच्या भेदक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या टी- 20 सामन्यात झिंबाब्वेचा 13 धावांनी पराभव केला.

भारताचा "गोल्डन फिंगर' अभिनव बिंद्रा याने सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई एअर गन अजिंक्यअपद स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली

भारताच्या युकी भांब्रीला तैवान एटीपी चॅलेंजर स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्याला दक्षिण कोरियाच्या हायेऑन चुंगने 7-5, 6-4 असे हरविले

टोकियो ऑलिंपिक संयोजन समितीने 2020 मधील ऑलिंपिकमधील समावेशासाठी बेसबॉल-सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्ड, स्पोर्टस क्लाटइंबिंग आणि सर्फिंग या पाच खेळांची निवड केली आहे

मर्सिडीज संघाचे प्रतिनिधित्व करणारा ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन याने जागतिक फॉर्म्युला वन मालिकेतील जपानी ग्रांप्री शर्यत जिंकली

मनन व्होरा आणि मयांक अगरवाल या सलामीवीरांच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारत 'अ' संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये आठ गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळविला

अमेरिकेची टेनिसपटू व्हीनस विल्यम्स हिने वूहान टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेसला ६-४, ६-३ असे हरवून तिसरी फेरी गाठली. कारकिर्दीतील हा तिचा ७००वा विजय आहे. अशी कामगिरी करणारी ती व्यावसायिक युगातील (ओपन एरा) नववीच खेळाडू ठरली.

आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठ जणांत स्थान मिळविण्यात अपयश आल्याने माजी विजेता वेस्ट इंडीज संघ २०१७ मध्ये होणाऱ्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अपात्र ठरला. कॅरेबियन क्रिकेट इतिहासातील ही वेस्ट इंडीज संघासाठी सर्वांत नामुष्कीची गोष्ट ठरली.

भारताच्या हीना सिद्धूने आशियाई स्पर्धेची चांगली पूर्वतयारी करताना आठव्या आशियाई एअरगन स्पर्धेत दहा मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तिआनो रोनाल्डो याने चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत माल्मो संघाविरुद्ध गोल करताना कारकिर्दीमधील पाचशेवा गोल केला. त्याचवेळी रेयालकडून खेळताना रॉलच्या ३२३ गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली

भारतीय फुटबॉल संघाची ‘फिफा’ क्रमवारी १२ स्थानाने घसरली. ‘फिफा’ने गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत १६७व्या स्थानावर आला. फुटबॉल क्षेत्रामधील शिखर संस्था असलेल्या फिफाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये अर्जेंटिना अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाका कायम ठेवत या वर्षातील सातवे विजेतेपद पटकाविले

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने दिल्ली रणजी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू लिंडसे क्लाशईन (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी शशांक मनोहर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले

बेजबाबदार फलंदाजीमुळे हाराकिरी करणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या लढतीसह टी-20 सामन्यांची मालिका गमावली

बागलादेशचा क्रिकेटपटू शहादत हुसेन याला १९ वर्षांच्या मोलकरणीचा छळ केल्याबद्दल तुरुंगात टाकण्यात आले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीपासून एन. श्रीनिवासन यांना दूर ठेवता येईल का, या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

रशियाचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर सर्जी कर्जाकिन याने जागतिक चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत आपलाच सहकारी पीटर स्विडलरवर ६-४ अशी मात केली

आयपीएलचे ‘टायटल स्पॉन्सर’ असलेल्या पेप्सिको कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नोटीस पाठवली असून, आयपीएलमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारताच्या जोश्नाट चिनाप्पाचे कॅरोल वेमुल्लर ओपन स्क्वॅश स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंडच्या जोएली किंग हिच्याकडून ती ४-११, ११-९, ४-११, ८-११ अशी हरली

भारताला चार कसोटींच्या हॉकी मालिकेतील पहिल्या लढतीत न्यूझीलंडने २-० असे हरविले

भारताचा ऑलिंपियन बॉक्सीर जय भगवान याला लाच घेतल्याप्रकरणी पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले

महाघोटाळ्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले संघटनेचे अध्यक्ष सेप ब्लाटर आणि मायकेल प्लॅटिनी यांच्यावर फिफाच्या आचारसंहिता विभागाने कारवाई करत या दोघांनाही तीन महिन्यांकरता निलंबित केले आहे. दरम्यान आफ्रिका क्षेत्राचे प्रतिनिधी असलेल्या इसा हयाटोयू यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

भारताला विश्वरकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत सलग चौथा पराभव पत्करावा लागला. तुर्कमेनिस्तानने भारताला २-१ असे हरविले.

सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीस हिच्या साथीत नववे विजेतेपद मिळविले. या जोडीने शनिवारी चायना ओपन टेनिस स्पर्धा जिंकली

No comments:

Post a Comment