चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2015)
चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2015) :
नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर वर्षभरात 37 कोटी रुपये खर्च :
पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून परदेश दौऱ्यांसाठी चर्चेत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर वर्षभरात 37 कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे.
या दौऱ्यांत ऑस्ट्रेलिया दौरा सर्वांत महागडा होता.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती मागविण्यात आली होती.
भारतीय दूतावासांनी या अर्जावर दिलेल्या माहितीनुसार मोदींनी जून 2014 ते जून 2015 या वर्षभरात केलेल्या दौऱ्यांवर 37.22 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
तसेच या वर्षभरात मोदींनी 20 देशांचा दौरा केला आहे.
मात्र, जपान, श्रीलंका, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया देशांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आलेली नाही.
या दूतावासांतून मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी आणि चीन या देशांच्या दौऱ्यादरम्यान सर्वाधिक खर्च झाला आहे.
तर, भूतान दौऱ्यावर सर्वांत कमी म्हणजेच 41.33 लाख रुपये खर्च झाला. मोदींनी 365 दिवसांपैकी 53 दिवस परदेशात घालविले आहेत.
मेनसाला बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण :
बारा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीने इंग्लंडमध्ये मेनसा बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण मिळवून थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टिफन हॉकिंगलाही मागे टाकले.
दीडशे मिनिटांत तिने 162 गुण मिळवले.
तिला गणित, भौतिक विज्ञान आणि रसायनशास्त्रात रस होता. मेनसा (एमइएनएसए)ने आयोजित कॅटेल थ्री बी पेपरमध्ये सर्वाधिक गुण मिळाले.
तसेच या परीक्षेतील प्रश्न तिने काही मिनिटांतच सोडविले.
हॉकिंग आणि आइन्स्टाइन यांचा बुध्यांक 160 इतका आहे, तर लॅडियाचा 162 आहे.
No comments:
Post a Comment