इन्फ्लेशन आणि बँकाचे व्याजदर यांच्यातील परस्पर संबंध काय ? =>
सध्या बँक दर आणि महागाई, चलनवाढ किंवा इन्फ्लेशन हे शब्द सगळीकडेच ऐकायला येतात. बँक दर हा अनेक वेगवेगळ्या कारणांनी निश्चित होतो. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण असतं इन्फ्लेशन दर. जेव्हा जेव्हा महागाई निर्देशांक वाढतो तेव्हा तेव्हा बँकांची कर्जे तसंच ठेवीवरील व्याजाचे दरही वाढतात. महागाई वाढते कारण उत्पादन कमी झालेल्या वस्तूंना जेव्हा जास्त मागणीमुळे भाववाढ होते, तेव्हा संबंधित वस्तूच्या उत्पादन मूल्यापेक्षा जास्त मूल्य संबंधित वस्तूला मिळतं. म्हणजेच सिस्टीममध्ये पैश्यांचं प्रमाण वाढतं. त्यावेळी सिस्टीममध्ये जास्त झालेला पैसा पुन्हा बँका आपल्याकडे ओढून घेतात, म्हणजेच ठेवींवरील व्याजदर वाढवतात, किंवा ग्राहकांना कर्जे देणं महाग करतात, त्यामुळे बँकांकडील पैसा पुन्हा सिस्टीममध्ये जाण्यापासून वाचतो. म्हणून जेव्हा जेव्हा महागाई वाढते, तेव्हा बँकांचे व्याजदरही वाढतात.
No comments:
Post a Comment