Bookmark

Bookmark this Blog

Thursday, September 3, 2015

विजनिर्मिती

भारतातील भविष्‍यातील दरडोई वीजवापर पाहता भविष्‍यात आपल्‍याला जगाच्‍या आजच्‍या वीजनिर्मितीच्‍या ४०% अधिक वीजनिर्मितीची गरज आहे. भविष्‍यातील लोकसंख्‍या विकास नियोजन आणि गरजा विचारात घेऊन उद्दिष्‍टे ठेवण्‍यात आले आहे. चीन, जपान, अमेरिका आणि रशिया आजही अणुविज निर्मितीत अग्रेसर आहेत. आज जगाच्‍या गरजेच्‍या १६% वीज ही अणुऊर्जा प्रकल्‍पाव्‍दारे उपलब्‍ध होत आहे. भारतात अणुऊर्जेचा वीज म्‍हणून वापर सुरू झाला असून प्रमाण खूप अत्‍यल्‍प आहे.

भारतात १९४५ साली डॉ. होमी भाभा यांनी अणुशास्‍त्र व अणुसंशोधनाबद्दल चिंतन सुरू केले व त्‍यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोलाची साथ दिली. अणुसंशोधनाचा वापर शांततामय मार्गाने करण्‍याकरिता ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ ही संस्‍था स्‍थापन करण्‍यात आली. ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ ची स्‍थापना भारतात झाली व त्‍यानंतर अणुसंशोधनामुळे अनेक क्षेत्रात विकास सुरू झाला. आरोग्‍यक्षेत्र किंवा कृषीक्षेत्र प्रत्‍येक क्षेत्राला अणुसंशोधनामुळे चालना मिळाली आहे. कर्करोगातील संशोधनाला अणुसंशोधनाने जोड दिली आहे. कोल्‍हापूरजवळ भूईमुगावर अणुसंशोधनाचा प्रयोग झाला आहे. धान्‍य साठविण्‍यासाठी अणुसंशोधन लाखमोलाची भूमिका बजावत आहे. विशेषत: परळमधील ‘कँसर रिसर्च इन्स्टिट्यूट’ हे देखील ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ चालवत आहे. अणुसंशोधनाचा इंडस्ट्रियल क्षेत्रासाठी वापर केला जातो. एक्‍स-रे शिवाय मेडिकलमध्‍येही अणुसंशोधन लाखमोलाची भूमिका बजावत आहेत.

सर्वात महत्‍त्‍वाचे म्‍हणजे अणुबॉम्‍ब हा अणुसंशोधनाचा अगदी छोटा भाग आहे. शत्रुची भीती घालविण्‍यासाठी त्‍याचा वापर केला जात आहे. २०१५ साली जगात सर्वात जास्‍त अणुबॉम्‍ब रशियाकडे (४८०४) आहेत. त्‍यानंतर अमेरिका (४४८०), फ्रांस (३००), इंग्‍लंड (२२५), चीन (२५०), पकिस्‍तान (१२०), भारत (११०), इस्‍त्रायल (८०), उ.कोरिया (१०) असे साठे आहेत.

No comments:

Post a Comment