Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, March 11, 2015

चालु घडामोडी १०


‪#‎चालू‬ घडामोडी:- मार्च २०१५
०१)गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या गोवंशहत्या बंदी (महाराष्ट्र प्राणीरक्षण दुरुस्ती) विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी संमतीची मोहोर उमटवली?
== ०२ मार्च २०१५
(कलम २०१अन्वये)२६ फेब्रुवारी रोजीच या विधेयकाला संमती दिली.

०२)गोहत्या बंदी विधेयक:-
>गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी
>गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार
>गोहत्या करणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद
>आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपींवर

०३) तक्रारीसाठी रेल्वेचे नवीन अॅप व साइट
>वेबसाइट : www.indianrailways.gov.in.
>मोबाइल अॅप www.coms.indianrailways.gov.in.या वेबपेजवरून डाऊनलोड करता येईल.
>एसएमएस क्रमांक- - ९७१७६३०९८२

०४) काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष:-
>प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
>मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम

०५) देशात १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीसंदर्भातील एका खटल्यात काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या विरोधात कोणत्या कोर्टाने अब्रूनुकसानीचा आरोप निश्चित केला असून, त्यावरील सुनावणी सुरू झाली आहे?
== दिल्ली कोर्ट )ज्येष्ठ वकील एच. एस. फूलका यांच्यावर केलेल्या कथित आरोपांमुळे)
>भारतीय दंडविधानाच्या कलम ४९९, ५००अन्वये ही बाब शिक्षेस पात्र आहे.

०६) देशातील १०१ जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्गांचा (नॅशनल वॉटरवेज) दर्जा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत असून यासाठी या नव्या जलमार्गांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी कशाची नेमणूक करण्यात आली आहे?
== इनलँड वॉटरवेज ऑथोरिटी ऑफ इंडिया

०७) जम्मू-काश्मीरमध्ये ४९ दिवसांची राज्यपालांची राजवट अखेर संपुष्टात येऊन पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) नेते असलेल्या कोणत्या नेत्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली?
== मुफ्ती महंमद सईद
>१९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री
>जम्मू-काश्मीरचे बारावे मुख्यमंत्री
>जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा
>शपथविधी:- झोरावार स्टेडियममध्ये

०८) १९९९ मध्ये स्थापन झालेल्या 'जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी'चे संस्थापक कोण आहेत?
== मुफ्ती महंमद सईद

०९) सुप्रीम कोर्टाचा निर्णय:-
>काही विशेष आणि समर्थनीय कारणे असली, तर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या गुन्हेगाराची शिक्षा कमी केली जाऊ शकते.
>भारतीय दंडविधान कलम ३७६ (२) (जी) नुसार

१०) 'पीएमओ'चे मोबाइल अॅप विकसित करण्यासाठी कोणत्या वेबसाइटवर नागरिकांकडून कल्पना मागवण्यात येणार असून, त्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे?
== mygov.in

११) कोणत्या पाकिस्तानी गायक याने भारतीय नागरिकत्वासाठी पुन्हा एकदा अर्ज सादर केला आहे.त्याने या आधी दोन वर्षांपूर्वी केलेला अर्ज केंद्र सरकारने फेटाळला होता?
== अदनान सामी

१२) तैवानच्या कोणत्या नेत्याच्या पुतळ्याची काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली आहे?
== चांग कै शेक
>गोला दहशतवाद-१९४७(चीनच्या नॅशनॅलिस्ट पार्टीच्या संतापाचे कारण)

१३) जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष:-
>स्मार्ट फोन किंवा अन्य उपकरणांचा वापर करून संगीत ऐकणाऱ्या साठ टक्के लोकांना बहिरेपणाचा सामना करावा लागतो;
>तर सुमारे ४० टक्के लोकांना नाइट क्लब आणि संगीताचे कार्यक्रम ऐकल्याने बहिरेपण येते.
>श्रीमंत देशांमधील सर्वसाधारण १२ ते ३५ या वयोगटातील तरुणांच्या श्रवणशक्तीवर परिणाम

१४) भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?
== जगमोहन दालमिया
अध्यक्ष - जगमोहन दालमिया
उपाध्यक्षपद (प्रत्येक विभागास एक) - टीसी मॅथ्यू (पश्चिआम विभाग), जी. गंगाराजू (दक्षिण), सी. के. खन्ना (मध्य), गौतम रॉय (पूर्व), एम. एल. नेहरू (उत्तर)
सचिव - अनुराग ठाकूर
संयुक्त सचिव - अमिताभ चौधरी
खजिनदार - अनिरुद्ध चौधरी.

१५) रेल्वे प्रवासासाठी "गो इंडीया‘ स्मार्ट कार्ड योजना रेल्वेतर्फे लागू करण्यात आली असून कोणत्या दोन मार्गांवर पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत ही योजना तूर्तास चालू करण्यात आली आहे?
== दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता (हावडा)

१६) आयआरएनएसएस १-डी उपग्रह:-दिशादर्शक भूस्थिर उपग्रह
इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीममधील चौथा उपग्रह
वजन:-१ हजार ४२५ किलो
उपग्रहाचे आयुर्मान:- दहा वर्ष

१७) कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने कंपनीसह कंपनीच्या तीन उच्च अधिकाऱ्यांना संशयित म्हणून समन्स बजावले?
== राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड

१८) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परकी चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी कोणत्या दोन नेत्यांना दंड ठोठावला आहे?
== संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार आणि बिहार विधान परिषदेचे उपसभापती सलीम परवेझ-१३.६२ लाख रुपयांचा दंड
>राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीन- १३.६२ लाख रुपयांचा दंड व तुरुंगवास

१९) काळा पैसा लपविल्याप्रकरणी (२० कोटी रुपयांचा काळा पैसा) प्राप्तीकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला कोणत्या मांस निर्यातदारला दिल्लीतील न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे?
== मोईन अहमद कुरेशी

२०) गुजरातच्या गीर अभयारण्यातील आशियाई सिंहांच्या बचावासाठी इंग्लंडमधील कोणत्या संस्थेने पुढाकार घेतला आहे?
== झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन
>"वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया‘ नॉलेज पार्टनर

२१) "मॅंडेट : विल ऑफ दि पीपल‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी

२२) जगातील सर्वांत मोठा ध्वजस्तंभ कोठे उभारला जाणार असून, त्याची उंची तब्बल २४० फूट एवढी असेल?
== फरिदाबाद-हरियाना

२३) जम्मू-काश्मीारचे शेवटचे राजे हरिसिंह यांचे अत्यंत निकटच्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा असलेले कोणत्या भाजप नेत्याने राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे?
== निर्मलसिंह

२४) अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याजागी आता कोणाची निवड करण्यात आली आहे?
== अरुण सिंह

२५) सार्क यात्रेवर गेलेले परराष्ट्र सचिव कोण?
== एस. जयशंकर

२६) दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती केली जाणार आहे?
== के के शर्मा
(हंगामी मुख्य सचिवपदी एस. एन. सहाय यांची नियुक्ती करण्यात आली होती)

२७) गुजरात कॉंग्रेस अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी

२८) स्वाइन फ्लू रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री कोण?
== सोनम कपूर

२९) केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६ तरतूद आकडे (कोटीमध्ये)
>२,४६,७२७ सरंक्षण
>७९,५२६ ग्रामविकास
>६८,९६८ शिक्षण
>३३,१५२ आरोग्य
>२२,४०७ गृहबांधणी-नागरी विकास
>१०,३५१ महिला-बाल विकास
>४,१७३ जलस्त्रोत-नममि गंगे
>१००० निर्भया निधी

३०) केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६ महाराष्ट्रासाठी तरतूद :-
>औषध प्रशिक्षण व संशोधन संस्था
>घारापुरी लेणी व बेटाचा होणार कायापालट
>औरंगाबाद शेंद्रे-बिटकिनच्या विकासासाठी १२०० कोटी
>पुणे मेट्रोसाठी १२६ कोटी रुपयांची तरतूद
>दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी १२०० कोटी
>आगामी पाच वर्षांत २ लाख ९५ हजार कोटींचे अनुदान
>विविध योजनांतर्गत २ लाख ६० हजार कोटींचा मिळणार वाटा
>पंचायतराज बळकटीकरण योजनेंतर्गत १५ हजार कोटी
>पालिकांना मिळणाऱ्या अनुदानात १२ हजार कोटींपर्यंत वाढ
>आपत्ती व्यवस्थापनासाठी ७ हजार ३०० कोटी मिळणार

No comments:

Post a Comment