Bookmark

Bookmark this Blog

Thursday, January 21, 2016

महत्त्वपूर्ण सम्मेलन व परिषद

महत्वाच्या परिषदा-संमेलने
------------------------------------

1.चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन -

पोर्ट ब्लेअर येथे अंदमान निकोबार बेटावर 5 व 6 सप्टें. 2015 रोजी संपन्न झाले.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष - खा. राहूल शेवाळे
संमेलनाचे उद्घाटक - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे.
संमेलन अध्यक्ष - प्रा. शेषराव मोरे.
------------------------------------
2. 5 वे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन -

5 सप्टें. 2015 रोजी मॉरिशस देशात संपन्न झाले.
या संमेलनाचे अध्यक्ष - श्याम जाजू
------------------------------------

3. 10 ते 13 सप्टें. 2015 दरम्यान आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद -

मध्यप्रदेशात भोपाळ येथे आयोजित केली होती.
या परिषदेची संकल्पना होती - हिंदी जगत : विस्तार एवम संभवनाई
या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर समारोप अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केला.
पहिले विश्व हिंदी संमेलन 1975 साली नागपूर येथे भरले होते. तर 2007 चे 8 वे न्यूयॉर्क (अमेरिका), 2012 चे 9 वे जोहान्सबर्ग येथे आयोजीत केले होते.
भोपाळ येथे आयोजीत केलेले नागपूर, दिल्ली यानंतर हे तिसरे भारतात आयोजीत केलेले विश्व हिंदी संमेलन होते.
सन 2018 चे विश्व हिंदी संमेलन मॉरिशस देशात आयोजीत केले जाईल.
------------------------------------

4. संयुक्त राष्ट्र संघाची चौथी जागतिक संसद अध्यक्षांची परिषद -

न्यूयॉर्क येथे सप्टेंबर 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन व राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे.कुरियन हजर होते.
------------------------------------

5. फोरम फॉर इंडिया -

पॅसिफीक आयर्लंड को-ऑपरेशन/भारत - प्रशांत सागरीय व्दिप देश सहकार्य मंच - ची दुसरी शिखर परिषद 21 व 22 ऑगस्ट 2015 मध्ये नवी दिल्ली व जयपूर येथे संपन्न झाली.
या संघटनेची संकल्पना नोव्हें. 2014 मध्ये मोदी यांनी भांडली होती.
या संघटनेची पहिली परिषद नोव्हेंबर 2014 मध्ये फिजी या देशात संपन्न झाली होती.
या संघटनेतील 14 सदस्य देश - भारत, फिजी, किरीबाती, कुक्स बेटे, मार्शल बेटे, टोंगा, तुआलू, वॅनवाटू
या संघटनेतील फिजी देशात सुमारे 38 टक्के लोकसंख्या भारतीय वंशीय आहे.
ही सर्व बेटे दक्षिण पॅसिफीक/प्रशांत महासागरात आग्नेय आशिया व ऑस्ट्रेलिया खंडादरम्यान आहेत.
------------------------------------

6. जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांची व बँक गव्हर्नरांची परिषद -

4 व 5 सप्टें. 2015 रोजी तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे संपन्न झाली.
या परिषदेला भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली व आरबीआय चे गव्हर्नर रघुराम राजन हजर हीओपी/कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ची 21वी परिषद -

डिसेंबर 2015 मध्ये फ्रांस देशात पॅरीस येथे भरणार आहे.
---------------------------------

7. सीओपी/कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ची 21वी परिषद -

डिसेंबर 2015 मध्ये फ्रांस देशात पॅरीस येथे भरणार आहे.
---------------------------------

8. जी-4 गटांची शिखर परिषद -

26 सप्टेंबर 2015 रोजी न्यूयॉर्क येथे संपन्न झाली.
या संघटनेचे/गटाचे चार सदस्य देश-भारत, जर्मनी, जपान, ब्राझील.
या शिखर परिषदेला जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डिलीमा रौसेफ, जपानचे पंतप्रधान शिझो अॅबे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कायम सुरक्षा परिषदेचा विस्तार करून जी-4 गटातील चारही देशांना कायमसुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे अशी मागणी आहे.
------------------------------------

9. पहिली भगवद्गीता जागतिक परिषद इंग्लंड देशात सप्टेंबर 2015 मध्ये संपन्न झाली.
------------------------------------

10. संयुक्त राष्ट्र संघाचे 30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2015 दरम्यान 21 वे जागतिक हवामानबदल विषयक परिषद/संमेलन - पॅरिस (फ्रान्स)
------------------------------------

11. सन 2016 चे प्रवासी भारतीय संमेलन - नवी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे.
------------------------------------

12. सार्क संघटनेची दुसरी आंतरराष्ट्रीय युवा परिषद 30 सप्टेंबर 2015 रोजी चंदीगड येथे संपन्न झाली.
------------------------------------

13. पिपरी चिंचवड येथे सन 2016 मध्ये आयोजित केल्या जाणार्‍या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणार्‍या कलावंत - पद्मा इराणी व इरावती मालेगावकर.

------------------------------------

14. 2016 च्या 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन-

अध्यक्षपदी जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची निवड करण्यात आली.
व्हाया वस्त्रहरण हे त्यांचे आत्मकथन, व ऐसपैस हे पुस्तक आहे.
त्यांनी मालवणी भाषेत लिहिलेली प्रसिद्ध नाटके - वेडी माणसे, दोघी, वर भेटू नका, वर परीक्षा, वस्त्रहरण, वात्रमेले, वन रूम किचन इ.
------------------------------------

15. तिसरी भारत-आफ्रिका शिखर परिषद/भारत-आफ्रिका फोरम समिट-

2015-26 ते 30 ऑक्टोबर 2015 - नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियममध्ये संपन्न झाली.
पहिली भारत - आफ्रिका शिखर परिषद 2008 साली संपन्न झाली. या परिषदेला 14 देशांचे प्रतिनिधी हजर होते.
दुसरी शिखर परिषद 2011 साली इथिओपियाची राजधानी आदिसआबाबा येथे झाली होती. या परिषदेला 15 देशांचे प्रतिनिधी हजर होते.
तिसरी भारत-आफ्रिका शिखर परिषद ही 2014 साली भरणार होती परंतु गेल्या वर्षी आफ्रिका खंडात इबोला रोगाच्या प्रसारामुळे ती रद्द करून यावर्षी घेण्यात आली.
तिसर्‍या परिषदेला भारत सरकारने प्रथमच आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांना निमंत्रण दिले होते.
या परिषदेला आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांचे प्रतिनिधी हजर होते यापैकी 25 राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान हजर होते. तसेच उर्वरित देशांचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री हजर होते.
या परिषदेचे सह अध्यक्ष होते- झिबॉम्बेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाम्बे तर अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी.
या परिषदेचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
ही परिषद यापूर्वी तीन वर्षाला आयोजित केली जात होती परंतु यापुढे ती प्रती पाच वर्षाला आयोजित करण्यास या तिसर्‍या परिषदेत मंजूरी देण्यात आली.
भारतात आयोजित केलेली ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय महापरिषद होती.
------------------------------------

16. सन 2015 चे अखिल भारतीय उर्दू नाट्य संमेलन सोलापूर येथे आयोजीत केले जाणार आहे.

17. सन 2016 चे 11 वे युरोपीय मराठी संमेलन - हॉलंड/नेदरलँड या देशात आयोजित केले जाणार आहे.
------------------------------------

18. श्री संत नामदेव साहित्य संमेलन 2015-

हे पंढरपूर जि.सोलापूर येथे ऑक्टोबर 2015 मध्ये संपन्न झाले.
संमेलनाध्यक्ष - प्रा. डॉ. अशोक कामत.

19. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केले जाणारे पहिले सन 2016 चे युवा साहित्य संमेलन - औरंगाबाद येथे आयोजीत केले जाईल.
------------------------------------

महत्वाचे साहित्य संमेलने :

राज्यस्तरीय व्यसमुक्ती साहित्य संमेलन:

1) वर्ष : 2012 (1 ले)
शहर : पुणे
संमेलनाध्यक्ष : अनिल अवचट

2) वर्ष:2013 (2 रे)
शहर : नागपुर
संमेलनाध्यक्ष : डॉ. राणी बंग

3) वर्ष : 2014 (3 रे)
शहर : मुंबई
संमेलनाध्यक्ष : फ्रांसिस दिब्रीटो

अ.भा. मराठी साहित्य संमेलन :

1) वर्ष : 2013 (86वे)
शहर : चिपळूण
संमेलनाध्यक्ष : नागनाथ कोत्तापल्ले

2)वर्ष : 2014 (87वे)
शहर : सासवड
संमेलनाध्यक्ष : फ.मुं. शिंदे

3) वर्ष : 2015 (88वे)
शहर : घुमान (पंजाब)
संमेलनाध्यक्ष : सदानंद मोरे

4) वर्ष : 2016 (89वे)
शहर : पिंपरी चिंचवड

विश्व मराठी साहित्य संमेलन:

1) वर्ष : 2009 (1ले)
ठिकाण : सॅन होजे (अमेरिका)
संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

2) वर्ष : 2010 (2रे)
ठिकाण : दुबई (अरबअमिराती)
संमेलनाध्यक्ष : मंगेश पाडगांवकर

3) वर्ष : 2011 (3रे)
ठिकाण : सिंगापूर
संमेलनाध्यक्ष : महेशएलकुंचवार

4) वर्ष : 2015 (4थे)
ठिकाण : पोर्ट ब्लेअर (भारत)
संमेलनाध्यक्ष : शेषराव मोरे

भारतीय सायन्स काँग्रेसची अधिवेशने :

1) वर्ष 2013 (100वे)
शहर : कोलकाता (प.बंगाल)
संमेलनाध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग (मा. पंतप्रधान)

2) वर्ष 2014 (101वे)
शहर : जम्मू (जम्मू काश्मिर)

3) वर्ष : 2015 (102वे)
शहर : मुंबई (महाराष्ट्र)
संमेलनाध्यक्ष : डॉ. एस.बी. निमसे (महाराष्ट्र)

4) वर्ष : 2016 (103वे)
शहर : म्हैसूर (कर्नाटक)
संमेलनाध्यक्ष : डॉ. ए.के. सक्सेना (नियोजीत)

सार्क शिखर परिषदा :

1) वर्ष : 2010(16वी)
यजमान शहर : थिंपू
देश : भूतान

2) वर्ष : 2011 (17वी)
यजमान शहर : अड्डेबेट, माले
देश : मालदिव

3) वर्ष : 2014 (18वी)
यजमान शहर : काठमांडू
देश : नेपाळ

4) वर्ष 2016 (19वी)
यजमान शहर : इस्लामाबाद
देश : पाकिस्तान

प्रवासी भारतीय संमेलन :

1) वर्ष : 2013 (11वे)
यजमान शहर : कोची

2) वर्ष : 2014(12वे)
यजमान शहर : नवी दिल्ली

3) वर्ष : 2015(13वे)
यजमान शहर : अहमदाबाद (गांधीनगर)

4) वर्ष : 2016 (14वे)
यजमान शहर : नवी दिल्ली

No comments:

Post a Comment