चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2015)
चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2015) :
आणखी सहा लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार केले परत :
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ आणखी सहा लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत.
प्रसिद्ध इंग्रजी कवी केकी दारूवाला व राजस्थानी लेखक नंद भारद्वाज यांचा यात समावेश आहे.
दादरी हत्याकांड तसेच गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या निषेधार्थ लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्यास सुरवात केली आहे.
त्यांची संख्या आतापावेतो 26 वर पोचली आहे.
शशी देशपांडे व सच्चिदानंदन यांच्यासारख्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले.
यात आज दारूवाला व भारद्वाज यांच्यासह वीरभद्रप्पा, के. नीला, आर. के. हुडूग्गी व काशिनाथ अंबालगी या कन्नड साहित्यिकांचीही भर पडली.
प्रति"कॉल ड्रॉप" एक रुपया दंड :
दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) चा प्रति"कॉल ड्रॉप"पोटी एक रुपया दंड मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना द्यावा, असा एक प्रस्ताव आहे.
तसेच हा दंड देशातील सर्व कंपन्यांना द्यावा लागू शकतो.
या संदर्भात सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्यामुळे असा दंड लावला जाऊ शकतो, असे समजते.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे रामेश्वरममध्ये भव्य स्मारक उभारण्याची घोषणा :
देशाचे क्षेपणास्त्रपुरुष आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे रामेश्वरममध्ये भव्य स्मारक उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
तसेच 'अमृत' योजनेच्या माध्यमातून रामेश्वरमचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
उदयोन्मुख संशोधकांना प्रेरणा मिळावी म्हणून रामेश्वरममध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येईल.
या स्मारकाच्या उभारणीसाठी सरकारने भूसंपादन केले असून, यासंबंधी नि��
No comments:
Post a Comment