Bookmark

Bookmark this Blog

Sunday, July 2, 2017

भारत- इस्त्रायल संबंध


🔶 पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भारत- इस्रायल संबंध दृढतेच्या दिशेने

▪️ 3 जुलैपासून पंतपप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या बहुचर्चित दौऱ्यावर जात आहेत. गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे इस्रायलमधील माध्यमे आणि लोकांमध्ये या दौऱ्याबद्द्ल जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील असे मत इस्रायली आणि भारतीय माध्यमांनी व्यक्त केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही आपण या दौऱ्याबाबत आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत उत्सुक असल्याचे सांगितले. यापुर्वी दोन्ही नेत्यांची विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर भेट झालेली आहे.

▪️भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.

▪️भारत आणि इस्रायल यांचे संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या 70 वर्षांमध्ये कायम नव्हता. 1947 साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने 1949 साली विरोध केला होता. 1950 साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापुर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपुर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती.

▪️1953 साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दुतावास उघडण्याची परवानगी मिळाली. 1950 ते 1990 या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरुपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. 1992 साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधीक चांगल्या स्थितीत आहेत असे म्हणावे लागेल.

🔹 भारत-इस्रायल यांच्यांमधील राजनैतिक संबंध

▪️1992दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित

▪️1997- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट

▪️2000- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट

▪️2003- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट

▪️2006- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची इस्रायल भेट

▪️2012- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट

▪️2014- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट.

▪️2014- ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद

▪️2014- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट

▪️2015- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)

▪️2015- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती

▪️2016 - जानेवारी महिन्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलला भेट दिली. यावेळेस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली.

▪️2016- नोव्हेंबर महिन्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी भारताला भेट दिली. यावेळेस त्यांनी मुंबईत खाबाद हाऊसलाही भेट दिली.

Friday, March 17, 2017

थोडक्यात समान्य ज्ञान

- आवश्यक सामान्य ज्ञान
  
1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.
2)अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.
3)अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.
4)अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.
5)अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.
6)अक्रा – घाना या देशाची राजधानी.
7)अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.
8)अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.
9)अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.
10)अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.
11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.
12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.
13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.
14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.
15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.
16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.
17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.
18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.
19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.
20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.
21)अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.
22)अबुजा – नायजेरियाची राजधानी.
23)अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.
24)अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.
25)अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.
26)अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.
27)अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.
28)अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.
29)अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.
30)अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.
31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.
32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.
34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.
35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.
36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.
37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.
38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.
39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.
40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.
41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.
42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.
43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.
44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.
45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.
46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.
47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.
48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.
50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.
51)आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)
52)आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.
53)आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.
54)आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.
55)आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.
56)आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.
57)आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील .... या घटका अभावी होतो.
58)आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.
59)आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.
60)आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.
61)आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.
62)आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.
63)आवली – संत तुकारामांची पत्नी.
64)आशिया – सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड.
65)आस्थिमज्जा – शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात.
66)इंग्रजी – या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत.
67)इंग्लंड – या देशाचे लिखीत संविधान नाही.
68)इंटरपोल – आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना.
69)इंडीया गॅजेट – हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकाता येथुन प्रकाशित झाले.
70)इंडोनेशिया – भारताच्या आग्नेय दिशेला हा देश आहे.
71)इंडोनेशिया – हा देश नारळांचा मुळ देश मानला जातो.
72)इंदिरा गांधी – भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.
73)इंदिरा गांधी – भारतातील पहिली महिला पंतप्रधान.
74)इंदिरा गांधी – या भारतीय स्त्रीला राष्ट्रमाता असे म्हटले जाते.
75)इंफाळ – मणिपूरची राजधानी.
76)इचलकरंजी – महाराष्ट्राचे मॅचेस्टर.
77)इटानगर – अरुणाचल प्रदेशची राजधानी.
78)इटालिया – या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत.
79)इमू – हा पक्षी उलट्

Saturday, February 25, 2017

अर्थशास्त्र

💎 💎 एमपीएससी मंत्र : अर्थशास्त्राशी दोन हात......... 💎 💎

💥  विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा-अर्थशास्त्र विषयाची तयारी भाग १ मध्ये आपण आर्थिक, सामाजिक आणि शाश्वत विकास या दोन घटकांचा अभ्यास केला. आता दुसऱ्या भागात  दारिद्रय़, लोकसंख्येचा अभ्यास. सामाजिक सेवा धोरणे व सामाजिक क्षेत्र सुधारणा घटकांचा अभ्यास करूयात.
दारिद्रय़ (poverty)
जीवनाच्या किमान मूलभूत गरजा न भागवता येण्याची स्थिती म्हणजे दारिद्रय़ होय. भारतात दारिद्रय़ मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्रय़ विचारात घेतले जाते. या घटकांच्या अभ्यासासाठी खालील बाबींचा सविस्तर अभ्यास करावा.

💥 भारतातील दारिद्रय़ –
दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्या अहवाल (तेंडुलकर, रंगराजन वगरे).
पंचवार्षकि तसेच इतर योजनांत दारिद्रय़ निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम, त्याची उद्दिष्टे आणि परिणाम.
भारतात दारिद्रय़ निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांचा आढावा घ्या.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची (NSSO)) दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी.

💥 हंगर इंडेक्स –
हंगर इंडेक्सचा भारत आणि जग असा तुलनात्मक अभ्यास करावा. भारताचे स्थान, गुण वगरे आणि पहिले व शेवटचे ३ देश.

💥 जागतिक दारिद्रय़ निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या संघटना –
युनो, जागतिक बँक, आय. एम. एफ. वगरे.

💥 बहुआयामी निर्धनता निर्देशांक (MPI) UNDP च्या  MPI च्या या अहवालात जगात किती टक्के दारिद्रय़ आहे याची सविस्तर माहिती ठेवा.

💥 पॉव्हर्टी गॅप इंडेक्स –
सरासरी दारिद्रय़ रेषेपासून दारिद्रय़ाचे अंतर म्हणजे पॉव्हर्टी गॅप.
ही संकल्पना गौरव दत्त व मार्टिन रॅव्हॅलीन यांनी सुचवली. याची सविस्तर  माहिती घ्या. भारताचा ढॅक व त्याचा इतर देशांशी तुलनात्मक अभ्यास करा.

💥 लोकसंख्या अभ्यास –
राज्य सेवा पूर्वपरीक्षेत अर्थशास्त्र घटकातील जनसांख्यिकी या घटकावर प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल जास्त आहे. या घटकाचा अभ्यास खालीलप्रमाणे ....................................................
...........................................................................................................................

💥 💥 वरील लेख पूर्ण व सविस्तरपणे वाचण्यासाठी SpardhaWorld हे App Download करा. किंव्हा http://bit.ly/2klgh1F या लिंक वर Click करा.

💎 हि माहिती जनरल नॉलेज अंतर्गत परीक्षा आणि विषय संदर्भात माहिती या घटकात सविस्तरपणे मांडण्यात आली आहे.💎

Facebbok ला जाऊन spardha mantra हे Page आपण Like करा.किंवा https://www.facebook.com/spardhamantra.in/ या link वरुन Like करु शकता. MPSC व स्पर्धा परीक्षा साठी अतिशय उपयुक्त !

Tuesday, January 31, 2017

विक्रिकर निरीक्षक पुर्व परीक्षा पेपर-१

उत्तरे:
विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा (२९ जानेवारी) चालू घडामोडी:-
---------------------------------------------------

१) रा.चि ढेरे यांनी कोणते ग्रंध लिहिले आहेत ? :-१) चक्रपाणी २) त्रिविध ३) लज्जा गिरी

२)जम्मू आणि काश्मीर च्या पहिल्या मुख्यंमंत्री कोण?:- मेहबुबा मुफ्ती

३) हरियाणातील आंतर्राष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या --------- या नावाने ओळखला जातो:- गुरुग्राम

४)अनवस्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम(एम.टी.सी.आर) गटबाबत:-
* जून २०१६ मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला
* या गटात ३५ राष्ट्रे सभासद आहे
* प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे
* क्षेपनाश्रे आणि वैमाणिक विरहीत विमानाच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश आहे

५)ऑल्वीन टाॅफलर यांनी कोणते ग्रंध लिहिले :- १)फ्युचर शाॅक २) पाॅवर शिफट ३) थर्ड वेव्ह

६) ८८ व्या अकादमी अवार्ड मध्ये आॅस्कर पारितोषिक विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार :-
सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट:-सन ऑफ साॅल
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघु चित्रपट:-बेअर स्टोरी
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर :-इंनसाईड आऊट
सर्वोत्कृष्ट अनुबोध:-एमी

७)आय.एस.आर ओ म्हणजे :-इंडीयन स्पेस रिसर्च आॅरगनायझेशन

८) २०१४ ते २०१६ या कालावधीत कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते:- डॉ मंजुळा चेल्लूर

९) जुलै २०१६ मध्ये कोणी आपल्या राज्य सभा सदस्यत्वचा राजीनामा दिला :- नवज्योतसिग सिधु

१०) भारतातील कोणते राज्य सन २०१५ मध्ये सेंद्रीय राज्य म्हणून घोषित केले गेले :सिक्कीम

११) सुंदरबन :-
* ते भारत आणि बांगलादेशात पसरलेला आहे
* २४ परगणा (दक्षीन)वन विभाग  सुंदरबनचा भाग आहे

१२) दि २१.१०२०१५ रोजी झालेले २०१२-१३ ची शिवछत्रपती पारितोषिक :-
जीवनगौरव:-रमेश विपट
नेमबाजी :-राही सरनोबत
जिमनॅस्टीक:-रोमा जोगळेकर
जिजामाता:-नंदिनी बोंगाडे

१३) युरोपियन युनीयनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे
court ऑफ जस्टीस व युरोपियन कमिशन ह्या रोपियन युनीयन च्या उपसंस्था आहेत

१४) योग्य कधने
* रीओ ओल्य्म्पिीक मध्ये सामन्यांच्या उद्घाटन सभारभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली
* ३१ व्या स्पर्धा ब्राझील मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या

१५) तेजस :-(योग्य विधाने)
* स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे
* इ.स. २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असे नामकरण केले
* त्याचा पल्ला ३००० की.मी आहे

१६) रामचंद्र चिंतामण ढेरे :-(योग्य विधान)
* त्यानी लोकसाहित्य ,प्राचीन ,साहित्य यांचा अभ्यास केला
* साहित्य विशारद आणी राष्ट्र भाषा प्रवीण या परीक्षा ते उतीर्ण झाले
* साहित्य अकादमी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले
* श्री नृसिह -उदय आणि विकास या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

Friday, January 20, 2017

देशातील पहिल्या घटना

देशातील पहिल्या घटना -

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

📖देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

📖देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

📖देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

📖देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

📖देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)

📖देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

📖देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

📖देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

📖देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

📖देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

📖देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

📖देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

📖देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

📖देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

📖देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

📖देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

📖देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

📖देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

📖देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

📖देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

📖देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे

📖देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

📖देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

📖देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)​
〰〰〰〰〰〰〰〰〰