Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, December 30, 2015

चालु घडामोडि ६८

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2015)

‘टॉप टेन’ वृत्तपत्रांत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले :

‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया’च्या (आरएनआय) ताज्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक खप असणाऱ्या ‘टॉप टेन’ वृत्तपत्रांत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले आहे.
 मराठी भाषिक वृत्तपत्रांमध्ये तर ‘सकाळ’ पुणे अव्वल स्थानीच आहे; तर देशातल्या प्रांतीय भाषिक वृत्तपत्रांत ‘सकाळ’ तिसऱ्या स्थानावर आहे.
 देशात वृत्तपत्रांची वाढ 5.8 टक्के या वेगाने होत असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
 देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘आरएनआय’च्या ‘प्रेस इन इंडिया’ या ताज्या अहवालानुसार, एका आवृत्तीच्या सर्वाधिक खपाच्या भाषिक वृत्तपत्रांच्या (हिंदी, इंग्रजी वगळून उर्वरित) भारतातील ‘टॉप टेन’च्या यादीत स्थान पटकावण्याचा मान मराठी वृत्तपत्रांमध्ये केवळ ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीला मिळाला आहे.
 या श्रेणीत पश्‍चिम बंगालमधील ‘आनंदबझार पत्रिका’ आणि ‘बर्तमान’ या दैनिकांबरोबरच तीन हिंदी आणि चार इंग्रजी भाषिक दैनिकांचा समावेश आहे.
 तसेच दुसऱ्या क्रमांकावरील इंग्रजी दैनिकांचा खप 11.40 टक्के आहे. मराठी दैनिके उर्दू व तेलगू भाषांनंतर पाचव्या स्थानी आहेत.

केंद्र सरकारची 3050 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची घोषणा :

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने 3050 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन त्यात मदतीचा निर्णय झाला.
 राष्ट्रीय आपत्तीनिवारण निधीतून (एनडीआरएफ) ही मदत मिळणार असून, मध्य प्रदेशलाही 2033 कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल.
 महाराष्ट्रात 21 जिल्ह्यांमधील 15747 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, राज्य सरकारने केंद्राकडे चार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती.

लेखक रघुवीर चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :

थोर स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच "आणीबाणी‘ला कडाडून विरोध करणारे आणि विपुल साहित्यसंपदा निर्माण करणारे ज्येष्ठ गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
 साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लेखक, कवींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते.
 गतवर्षी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 ज्ञानपीठ मिळविणारे चौधरी हे चौथे गुजराती लेखक आहेत. यापूर्वी उमा शंकर जोशी (1967), पन्नालाल पटेल (1985) आणि राजेंद्र शाह (2001) यांना हा पुरस्कार मिळाला होता.
 सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्तिपुस्तक आणि रोख 11 लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 चौधरी यांचा जन्म 5 डिसेंबर 1938 मध्ये गुजरातमधील गांधीनगरजवळील बापुपुरा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला.
 गुजरात विद्यापीठातच ते 1977 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आणि प्रोफेसर म्हणून 1998 मध्ये निवृत्त झाले.
 हाडाचे शिक्षक म्हणून चौधरी यांची ओळख आहे. एकीकडे ज्ञानदान करतानाच गुजराती साहित्यात त्यांनी विविध विषयांवर विपुल लिखाण केले आहे.

नीति आयोगाचे सीईओ म्हणून अमिताभ कांत यांची निवड :

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी अमिताभ कांत यांची केंद्र सरकारने निवड केली आहे.
 केरळ केडर्स आयएएसचे ते 1980च्या तुकडीचे ते अधिकारी असून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्याही उद्योग धोरण विभागाच्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
 कांत यांनी अनेक खात्यांचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय मित्रा यांची निवड करण्यात आली आहे. सरकारने अन्य खात्यांच्याही सचिवांची निवड केली आहे.

प्रसिद्ध गायक सुबीर सेन यांचे निधन :

प्रसिद्ध गायक सुबीर सेन (वय 81) यांचे आज एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
 आ जा रे नैन द्वारे (रूप की रानी चोरों का राजा), गोरी तेरे नटखट नैना वार करे चुप जाये (हम भी इन्सान है) यांसह त्यांच असंख्य गाणी गाजलेली आहेत. बंगालीमधील गाणी लोकप्रिय ठरली आहेत.

पत्रकारांसाठी भारतच अधिक धोकादायक :

आशियामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाचा बळी ठरलेल्या नागरिकांची संख्या अधिक असली, तरी पत्रकारांसाठी मात्र भारतच अधिक धोकादायक असल्याचे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 सरत्या वर्षांत विविध हल्ल्यांमध्ये भारतातील नऊ पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे.
 "रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर" या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, या वर्षांत जगभरातील विविध घटनांमध्ये 110 माध्यम प्रतिनिधींचा बळी गेला आहे. यापैकी 43 पत्रकारांच्या हत्येचे कारण समजलेले नाही.
 भारतात मारल्या गेलेल्या पत्रकारांची संख्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात मारल्या गेलेल्या पत्रकारांच्या संख्यपेक्षा अधिक आहे.

इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगवासाची शिक्षा :

इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना येथील सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
 लाच घेतल्याप्रकरणी इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना येथील सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आज (मंगळवार) सुनावली. तुरुंगवास भोगावा लागणारे एहुद ओल्मर्ट हे इस्राईलचे पहिलेच माजी पंतप्रधान आहेत. ओल्मर्ट यांच्यावर 1,28,500 डॉलरची लाच घेतल्याचा आरोप होता.एहुद ओल्मर्ट हे आता 70 वर्षांचे आहेत. 2006 ते 2009 या कालावधीमध्ये ते इस्राईलचे पंतप्रधान होते.
 गेल्या दशकाच्या सुरवातीस विविध कामांसाठी लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
 या प्रकरणी 2014 च्या मेमध्ये ओल्मर्ट यांना दोन प्रकरणांमध्ये मिळून एकूण सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात ओल्मर्ट यांना दोषमुक्त केले आणि त्यांची शिक्षा कमी करून दीड वर्षांचा तुरुंगवास भोगण्याचा आदेश दिला. या शिक्षेच्या अंमलबजावणीची सुरवात 15 फेब्रुवारी 2016 पासून होईल.

खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा :

खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी दिली आहे.
 नवजात बालकाची जन्मानंतर काळजी घेण्यासाठी प्रसूती रजेच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी गांधी यांनी कामगार मंत्रालयाला लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना :

सुप्रीम कोर्टाने केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना देण्याच्या राज्य सरकारच्या मद्य धोरणावर शिक्कामोर्तब केले.
 यामुळे आता पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असलेल्या आणि ‘गॉड्स ओन कन्ट्री’ अशी ओळख असलेल्या केरळमध्ये मद्यशौकिनांना पंचतारांकित हॉटेल्समधील फक्त 24 बारमध्येच आपली तल्लफ भागविता येईल.

गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे जाहीर :

जागतिक आरोग्य संघटनेने गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे जाहीर केले.
 गेली दोन वर्षे देशात इबोलाने 2500 लोकांचे प्राण घेतले.

‘आयफेल टॉवर’ बनला‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य :

जगप्रसिद्ध ताजमहाल व स्टॅच्यू ऑफ लिबर्टीने 126 वर्षे जुन्या आयफेल टॉवरचे ट्विटरवर स्वागत केले आहे. जगात सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा ‘आयफेल टॉवर’ गेल्या आठवड्यात ‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य बनला.
 आयफेल टॉवरने आपल्या अकाऊंटवर पहिले ट्विट फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत केले आहे.

नवीन चित्रफीत जारी :

अवकाशातील कचरा खूप मोठय़ा प्रमाणात वाढला असून त्याबाबतची एक व्हिडिओ नुकतीच जारी करण्यात आला आहे.
 युनिव्हर्सटिी कॉलेज लंडन या संस्थेचे स्टुअर्ट ग्रे यांनी अवकाशातील कचऱ्याबाबतचा व्हिडिओ तयार केला असून त्यात 1957 पासून 2015 पर्यंत अवकाशातील कचरा कसा वाढत गेला हे दाखवले आहे. रशियाने 1957 मध्ये स्पुटनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हापासून अवकाशात कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.
 अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे त्यांचा आकार सॉफ्टबॉलपेक्षा जास्त आहे.

महिलांना मदतीसाठी संपूर्ण भारतभरात एकच क्रमांक :

मोबाइल फोनमध्ये स्त्रियांच्या सुरक्षितेतेसाठी इशारा देणारी यंत्रणा बसवण्यास मोबाइल कंपन्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या महिला आता मोबाइलवरील संकटमोचक बटण दाबून मदत मागू शकतील, असे केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.
 पुढील वर्षांत मार्चपासून असे मोबाइलमध्ये अशी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबत अनिवार्य र्निबध दूरसंचार खाते लागू करणार आहे.
 मोबाइल उत्पादकांशी चर्चा करून ही यंत्रणा बसवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी आम्हाल एक वर्ष लागले व आता नवीन व जुन्या फोनमध्येही ही सुविधा देता येणार आहे.
 महिला संकटात असेल तर तिने हे बटण दाबल्यास पोलिसांना संदेश जाणार आहे. हे बटण असलेले नवीन फोन मिळणे सुरू झाल्यावर जुन्या फोनमध्येही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
 त्यासाठी किमान 10 हजार केंद्रे सुरू केली जातील.
 तसेच मोबाइलमध्ये या बटणाची सुविधा देण्यात येईल. नवीन व जुन्या फोनमध्ये ही सुविधा करण्यासाठी कंपन्या तांत्रिक पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
 महिलांना मदतीसाठी संपूर्ण भारतभरात एकच क्रमांक उपलब्ध केला जाणार आहे, त्यामुळे पोलिस, विधी, वैद्यकीय व समुपदेशन केंद्रांना हिंसापीडित महिलेचा संदेश जाणार आहे.

दिनविशेष :

1803 : अंजनगाव-सुर्जी येथे इंग्रज व शिंदे यांच्यात तह.
 1879 : भारतीय तत्वज्ञानी रमन महर्षि यांचा जन्म.
 1906 : ढाक्याचे नबाब सलीमुल्ला खान यांनी मुस्लीम लीगची स्थापना केली.
 1943 : पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला.

 

Monday, December 28, 2015

चालु घडामोडी ६७

��चालू घडामोडी (28 डिसेंबर 2015)��

��"स्टार्ट अप इंडिया"ची अंमलबजावणी 16 जानेवारीपासून :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "मन की बात" कार्यक्रमामध्ये नवीन वर्षात "स्टार्ट अप इंडिया"ची अंमलबजावणी 16 जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा केली.
 "स्टार्ट अप इंडिया- स्टॅंड अप इंडिया" या योजनेची घोषणा मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये केली होती.
 16 जानेवारीपर्यंत स्टार्ट अप- स्टॅंड अप इंडिया या योजनेचा आराखडा पूर्ण केला जाईल. यामध्ये आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमधील तज्ज्ञांचेही योगदान असेल. हे स्टार्ट अप केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासाठीच नसेल, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्टार्ट अप सुरू केले जाऊ शकते. देशाच्या प्रत्येक भागामध्ये हा कार्यक्रम सुरू केला जावा. राज्यांनीही हा कार्यक्रम केवळ काही शहरांपुरता मर्यादित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
 तसेच "मन की बात" या कार्यक्रमामध्ये, टीका सुरू असलेल्या मुद्‌द्‌यांवर नेहमीप्रमाणे बोलण्याचे टाळून पंतप्रधान मोदींनी पर्यटन व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेचेही आवाहन केले.

��चीन संसदेत दहशतवादविरोधी कायदा मंजूर :

चीन संसदेने दहशतवादविरोधी कायदा अपेक्षेप्रमाणे मंजूर केला.
 नव्या कायद्यानुसार चीनमध्ये व्यवसाय करत असलेल्या विदेशी कंपन्यांना चीन सरकारला सर्व गोपनीय माहिती देणे बंधनकारक असणार आहे. तसेच माध्यमांवरील बंधनेही कडक होणार आहेत. यामुळे या कायद्याला बराच विरोध होत होता.
 सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या विधेयकाला मान्यता देण्यात आली होती. पक्षाच्या निर्णयाला संसदेत विरोध होत नसल्याने हा कायदा आज अधिकृतरीत्या संमत करण्यात आला.

��आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर :

रेशनिंग, रॉकेल आणि गॅस अनुदानासाठी सक्ती असलेल्या आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून, उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंदणीची नोंद करण्यात आली आहे.
 नोव्हेंबर 2015 पर्यंत झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यात 10 कोटी 14 लाख 26 हजार 370 लोकांनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
 सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेशचे नाव पहिले असून यूपीमध्ये एकूण 13 कोटी 32 लाख 51 हजार 914 लोकांनी नोंदणी केल्याचा माहिती आहे.

��ब्रिटनकडून पुणे शहराला अर्थसाह्य देण्याची घोषणा :

स्मार्ट पुण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पुणे शहराला दीड कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा ब्रिटनकडून करण्यात आली आहे. पुढील 3 महिन्यांत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारतातील पुणे, अमरावती (आंध्र प्रदेश), इंदूर ही तीन शहरे स्मार्ट करण्यासाठी मदतीची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केली. त्याबाबतचे करारही त्या वेळी करण्यात आले.
 पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मदतीची तयारी ब्रिटनने दर्शविली आहे.
 ब्रिटन राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यासाठी, ब्रिटनचे शिष्टमंडळ लवकरच पुण्यात येणार आहे.

��एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले :

गत तीन दशकांपासून सुरू असलेले एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या निर्णयावर सरकारने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे.
 सत्तारूढ सरकारने ‘हम दो, हमारे दो’ अर्थात दोन अपत्यांच्या धोरणास आज अधिकृतपणे मान्यता दिली.
 जगातील सर्वांत मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये एक मूल धोरणामुळे अलीकडच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर तोडगा म्हणून सरकारने हे धोरणच बदलण्याचा निर्णय घेतला.
 एक जानेवारीपासून नवे धोरण अमलात येणार आहे. गत तीन दशकांपासूनचे जुने धोरण यामुळे संपुष्टात येईल.
 नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीत 159 सदस्यांच्या अनुमतीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
 सध्या चीनची लोकसंख्या 1 अब्ज 37 कोटी एवढी आहे.

⌚सलमानच्या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :

वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी सलमानसाठी 400 फूट लांबीचा केक तयार केला आहे. या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार असल्याचं वृत आहे. त्यामुळे सलमानच्या नावावर अजून एक रेकॉर्ड होणार आहे.

��लेगस्पिनर यासिर शहाला आयसीसीने केले निलंबित :

पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला लेगस्पिनर यासिर शहाचा डोपिंग चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आयसीसीने त्याला निलंबित केले आहे. आयसीसीने टि्वटरवरुन यासिर शहाच्या निलंबनाची माहिती दिली.
 यासिरने 13 नोव्हेंबरला 2015 रोजी डोपिंग चाचणीसाठी नमुने दिले होते. वाडाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थाचे घटक यासिरच्या नमुन्यांमध्ये सापडल्यामुळे यासिरला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले.

रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव आता रेल्वे विकास प्राधिकरण करण्यात येणार :

रेल्वे खात्यातील विविध विकासकामे करणाऱ्या रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव आता रेल्वे विकास प्राधिकरण करण्यात येणार आहे.
 हे प्राधिकरण मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीचे दर निश्चित करणार असून त्याच्या जोडीला विकास कामेही करणार आहे. रेल्वे सुधारणांसाठी स्वतंत्र रेल्वे प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना अनेक समित्यांनी यापूर्वी केली होती.
 आता रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव रेल्वे विकास प्राधिकरण असे केले जाणार असून त्याची भूमिका व्यापक करणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

��दिनविशेष :

1948 : मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

 

Wednesday, December 23, 2015

चालु घडामोडी ६६

चालू‬ घडामोडी:- २०१५ (२२ डिसेंबर)

>>बालगुन्हेगारी सुधारणा विधेयक( ज्युवेनाईल जस्टीस) राज्यसभेत मंजूर, बालगुन्हेगाराचं वय १८ वरुन १६ वर

>>यू ट्युब'वर सक्रीय आहेत ७६ टक्के १३ वर्षांखालील मुले, 'असोचेम'चा अहवाल

>>मध्य प्रदेशः दररोज ३३० मुले नव्याने सुरू करतात तंबाखूचे सेवन

>>पवनहंस हेलिकॉप्टर कंपनीला ३८.८१ कोटींचा निव्वळ नफा

>>दिल्लीत आज ३ रा कार फ्री डे

>>मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम २६ डिसेंबरला दणक्यात साजरा करणार ६० वा वाढदिवस, अज्ञातस्थळी होणाऱ्या पार्टीत सहभागी होणार पाकिस्तानी क्रिकेटपटू, निवडक व्यापारी आणि आयएसआयचे अधिकारी. दाऊदच्या पार्टीसाठी मुंबई आणि नेपाळच्या काही लोकांना आमंत्रण असल्याचे वृत्त

>>स्वदेशी डिझाइनच्याआधारे तयार केलेली पहिली भारतीय युद्धनौका 'आयएनएस गोदावरी' तीन दशकांच्या सेवेनंतर बुधवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सूर्यास्ताच्या साक्षीने निवृत्त होणार

>>दोन आसनी डबे असलेल्या लोकलचा मुहूर्त लांबला, येत्या ३-४ दिवसांनंतर ‘दोन आसनी लोकल’ रुळांवर धावण्याची शक्यता

>>आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य व सहभागी झालेल्या दहावी व बारावीच्या खेळाडूंना २५ ग्रेस गुण देण्यात येणार, अनुत्तीर्ण व उत्तीर्ण खेळाडूंना ग्रेस गुण देणार; राज्याच्या शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

>>न्यूझीलंडः क्रिकेटपटू ब्रँडन मॅकलम फेब्रुवारी २०१६ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार

>>येत्या २४ आणि ३१ डिसेंबरच्या रात्री बार आण‌ि रेस्टॉरंटना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी

>>हेमा उपाध्याय हत्येप्रकरणी पती चिंतनसह आतापर्यंत चौघांना अटक

>>अयोध्येत शिलापूजन, उत्तर प्रदेश सरकारने मागितला अहवाल

>>अफगाणिस्तान बगराम एअरबेसवर आत्मघाती हल्ला, अमेरिकेचे ६ सैनिक शहीद

>>दिल्लीः द्वारका येथे सीमा सुरक्षा दलाचे चार्टर विमान कोसळले, २ ठार आणि ८ जण जखमी, बारडोला गावाजवळ घडली घटना

>>रांचीला जात असलेले सीमा सुरक्षा दलाचे चार्टर विमान कोसळले; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या दाखल, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू

>>शनिशिंगणापूर: चौथऱ्याला कडेकोट सुरक्षा.महिला सुरक्षारक्षकही तैनात. महिलांच्या आंदोलनानंतर दक्षता. महिला पोलिसांचीही मागणी

>>फुलगाव येथील स. भ. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना सज्जनगड येथील श्रीसमर्थ सेवा मंडळातर्फे दिला जाणारा यंदाचा समर्थ संत सेवा पुरस्कार जाहीर

>>याहू सर्चमध्ये वर्षभरात चर्चेत राहिलेल्या सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि राजकीय नेते यांना मागे टाकत 'गायी'ने 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर'चा मान मिळवला. सेलिब्रिटींच्या यादीत महिलांमध्ये सनी लिओन आणि पुरुषामध्ये सलमान खान हे पहिल्या क्रमांकावर राहिल्याचे याहूने म्हटले आहे. वर्षभरात झालेल्या घटना आणि ट्रेन्डच्या आधारे याहूने २०१५चा रिव्ह्यू दिला आहे.

>>तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांना पुण्यातील तालविश्व संस्थेतर्फे पाचवा 'तालविश्व उस्ताद मेहबूबखानसाहेब मिरजकर पुरस्कार' जाहीर

>>कॉलड्रॉप प्रकरणी दिल्ली हायकोर्टात पुढील सुनावणी ६ जानेवारी रोजी होणार

>>राज्याच्या प्रत्येक विभागात संस्कृत कॉलेज सुरु करणार - विनोद तावडे, राज्याचे शिक्षणमंत्री

>>मुंबईः संगीतकार आनंदजी आणि गायक अमित कुमार यांना यंदाचा महमद रफी पुरस्कार जाहीर, रंगशारदा येथे २४ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहमद रफी यांच्या जयंती निमित्त होणार पुरस्काराचे वितरण. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थे तर्फे दिले जातात पुरस्कार

>>जागतिक मराठी अकादमीतर्फे येत्या १ आणि २ जानेवारीला अमरावतीमध्ये १३ व्या 'शोध मराठी मनाचा' संमेलनाचे आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन. विक्रम गोखले यांच्या अध्यक्षतेखाली होणार संमेलन.

>>सीमेचे रक्षण करण्यासाठी तसेच तस्कर, नक्षलवादी, दहशतवादी आणि घुसखोर यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारत अमेरिकेकडून मानवरहीत विमानांची (ड्रोन) खरेदी करण्याच्या तयारीत

>>सशस्त्र मानवरहीत ड्रोन आणि फक्त निरीक्षणाचे काम करणारे ड्रोन अशा १०० ड्रोनचा ताफा भारत खरेदी करण्याच्या तयारीत

>>भारत-बांगलादेश दरम्यान सुरू होणार असलेली महासंचालकांच्या स्तरावरील चर्चा दिल्ली विमान अपघातामुळे पुढे ढकलण्यात आली

>>नागपूरः जंगली प्राण्यांसाठी राज्य सरकारने सुरू केले हॉस्पिटल

>>छगन भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई, वांद्रे आणि सांताक्रूझमधील ११० कोटींची संपत्ती जप्त, कलिना भूखंड, महाराष्ट्र सदनप्रकरणी कारवाई

>>बालगुन्हेगारी कायदाः दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर, काँग्रेसचा विधेयकाला जाहीर पाठिंबा,तृणमूल काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा

>>हेमा उपाध्याय-हरीश भंभानी हत्याकांड, चिंतन उपाध्यायला १ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी, बोरीवली कोर्टाचा निर्णय

>>कोणतीही विद्धंसक कारवाई करण्यापूर्वी प्रोटोकॉल पाळा: दिल्ली कोर्ट

>>नागपूर: मिहान प्रकल्प ग्रस्तांचा मिहान प्रशासकीय कार्यालयाला घेराव, अनेक वर्षापासून प्रलंबित आहे पुनर्वसन

>>नागपूर: संगणक परिचालक संघटनेचा मोर्चा अखेर मागे मागण्या पूर्ण करण्याचे मंत्री पकंजा मुंडे यांचे आश्वासन, १५ जानेवारी पर्यंत जी.आर. काढणार

>>पत्रकार जे डे यांच्या हत्याप्रकरणी छोटा राजन विरोधात मुंबई हायकोर्टाकडून वॉरंट जारी

>>'मिस युनिव्हर्स २०१५' स्पर्धेत विजेत्या विश्वसुंदरीच्या नावाची घोषणा करताना मोठी चूक करणारा सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वेने टि्वटरवरुन माफी मागितली आहे, स्टीव्हने उपविजेत्या सौदर्यवतीचे नाव विजेती म्हणून जाहीर केले होते.

>>बीएसएफ विमान दुर्घटना प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ३०४ अ, ३३६,३३७ कलमांतर्गत एफआयआर दाखल केला.

>>पूरग्रस्तांच्या पूर्नवसनासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केंद्र सरकारकडे २५,९०० कोटींची मदत मागितली.

>>मुंबईत माहुल, चेंबूर परिसरातील पेट्रोलियम कंपन्यांच्या आसपास ५०० मीटर परिसरात फटाके उडविण्यास मुंबई पोलिसांची बंदी, ३१ डिसेंबरपर्यंत असणार बंदी.

>>भारत-पाकिस्तानमध्ये बटालियन कमांडर स्तरावर पूँछच्या चाकन दा बागमध्ये झाली चर्चा, दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी शस्त्रसंधी आणि हवाई हद्दीच्या उल्लंघनावर केली चर्चा.

>>चिटफंड घोटाळयात नाव घेतले म्हणून भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला.

>>मधेशी लोकांच्या बरेच दिवस सुरु असलेल्या आंदोलनानंतर राज्यघटनेत सुधारणा करण्यास नेपाळ सरकार तयार झाले आहे.

>>वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या फिफाच्या नैतिक लवादाने सोमवारी सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

>>नागपूर स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीचा इशारा

>>१७ जानेवारीपासून 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद, कपिल शर्माची घोषणा

>>अयोध्येत पुन्हा मंदिराचा प्रश्न चर्चेत, विश्व हिंदू परिषदेचं शीलापूजन, राजस्थानातून २ ट्रक भरुन शीला अयोध्येत