चालू घडामोडी (2 जानेवारी 2016)
पोलिस महासंचालकपदी एस. जावेद अहमद :
उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकपदी एस. जावेद अहमद यांची नियुक्ती आज झाली.
पोलिस महासंचालक जगमोहन यादव हे काल सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अहमद यांची नियुक्ती झाली.
अहमद हे भारतीय पोलिस सेवेतील 1984 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
चिनी लष्कराकडून नव्या तुकड्यांची निर्मिती :
लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चीनने आज तीन नव्या तुकड्यांची निर्मिती केली आहे.
चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आधुनिकीकरणाचे सूतोवाच केल्यानंतर लगेचच त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवात झाली होती.
नव्या तीन तुकड्यांमध्ये एक तुकडी लष्करासाठी, एक क्षेपणास्त्र विभागासाठी आणि एक धोरणात्मक पाठबळासाठी असणार आहे.
पूर्व चिनी समुद्रात जपानबरोबर आणि दक्षिण चिनी समुद्रात फिलिपिन्स, व्हिएतनामसह सहा देशांबरोबर बेटांचा वाद सुरू असल्याने चीनने अधिक आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
जीवनगौरव पुरस्कार प्रदान :
ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’सह विविध चित्रपटांमध्ये अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि किरण शांताराम यांच्या उपस्थितीत ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘कँडल मार्च’ला ‘उत्कृष्ट चित्रपटाने गौरविण्यात आले, तर अंकुश चौधरी आणि सुमित राघवन यांना उत्कृष्ट अभिनेता, तर सोनाली कुलकर्णी (सीनिअर) हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वेगाने माहितीवहन करणाऱ्या सूक्ष्मसंस्कारकाची निर्मिती :
अतिशय वेगाने माहिती वाहून नेणारा सूक्ष्ममाहितीसंस्कारक म्हणजे मायक्रोप्रोसेसर तयार करण्यात आला असून या प्रकल्पात भारतीय वंशाच्या एका संशोधकाचा समावेश आहे.
प्रकाशाच्या मदतीने यात माहिती वाहून नेली जाते, या माहिती देवाणघेवाणीस सर्वात कमी ऊर्जा लागते.
अधिक वेगवान व शक्तिशाली संगणनप्रणाली व पायाभूत यंत्रणेची निर्मिती यातून शक्य होणार आहे.
प्रकाशावर आधारित समाकलित मंडले (इंटिग्रेटेड सर्किट्स) या नव्या पद्धतीमुळे संगणनात अनेक महत्त्वाचे बदल घडून येणार आहेत.
दिनविशेष :
धुम्रपान विरोधी दिन
1757 : ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने कोलकाता काबीज केले.
1942 : दुसरे महायुद्ध - जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली.
No comments:
Post a Comment