Bookmark

Bookmark this Blog

Saturday, May 7, 2016

English Study

������  ENGLISH ������

��Simple Sentences with ��

��A] "Be" :- am / is / are

***We use :- am / is / are
1.  "I am",
2. "We are",
3. "You are"
4. "They are",
5. "He is"
6. "She is".

��Examples : -

1. I am from Maharashtra .
I am a boy.
I am .........

2. He is a teacher.
He is my friend.
He is.........

3. She is my friend.
She is a clever girl.
She is..........

4. We are students.
We are good players.
We are.........

5. They are not players.
They are ready.
They are.........

6. You are a good student.
You are an active member.
You are........

❓❓Questions :-❓❓

1. What is your name?
(My name is ... / I am......)

2. Where are you from?
(I am from ...)

3. What is your job?
(I am a ...)

4. Are you busy ?
(Yes I am. / No I'm not.)

5. Is your friend a good student? (Yes he is. / No he isn't,
she's a ...)

6. Are your parents teachers? (Yes they are. / No, they are ...)

------------------------

��B] "Be" :- was / were

��We use "was",  "were"
1. I was...
2. You were.....
3. We were...
4. They were...
5. He was...
6. She was...

��Examples :-
1. I was tired yesterday.
I was .......

2. He was a lazy student.
He was......

3. She was my neighbor.
She was........

4. We were classmates.
We were.........

5. They were friends.
They were........

6. You were a cute child.
You were.......

❓❓Questions :-❓❓

1. Were you happy to see him?

2. Were you tired when you woke up this morning?

3. Was he your friend?

4. Were they in the same school?

5. Was he naughty as a child?

6. Was yesterday a rainy day?

��������������������

Tuesday, April 19, 2016

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण - [ संक्षिप्त रुपात - भाग I ]  
==================================================
१) स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.
.
२) संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.
.
३) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.
.
४) अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.
.
५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.
.
६) सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.
.
७) शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.
.
८) साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.
.
९) शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.
.
१०) प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.
.
११) धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
.
१२) धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.
.
१३) टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
.
१४) समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.
.
१५) शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.
.
१६) मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.
.
१७) इस. १८३६ साली मराठीतील पहिले मुद्रित व्याकरणाचे पुस्तक - "महाराष्ट्र भाषेचे व्याकरण" गंगाधरशास्त्री फडके यांनी लिहिले.
.
१८) महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.
.
१९) मुख्यार्थ्यास बाधा न येता संदर्भानुसार अनेक शब्द सूचित होतात त्यांना व्यंगार्थ असे म्हणतात.
.
२०) व्यंगार्थ निर्माण करणा-या शक्तीस व्यंजना असे म्हणतात.
.

भारतीय संसद

भारतीय संसद : सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी
● भारत की संघीय व्यवस्थापिका को किस नाम से जाना जाता है— संसद
● भारतीय संसद का निर्माण कैसे होता है— लोकसभा + राज्यसभा + राष्ट्रपति
● संसद के कितने सदन है— दो
● संसद के किस सदन को ‘प्रतिनिधि सभा’ कहा जाता है— लोकसभा
● संसद का स्थायी संदन कौन-सा है— राज्यसभा
● भारतीय संसद का तीसरा अंग कौन है— राष्ट्रपति
● संसद के दो क्रमिक अधिवेशनों के मध्य कितना समयांतराल होता है— 6 माह
● भारतीय संसद को कौन भंग कर सकता है— राष्ट्रपति
● भारतीय संसद की संप्रभुत्ता किससे प्रतिबंधित है— न्याय समीक्षा से
● भारतीय संसद की दोनों की संयुक्त बैठक किस संबंध में होती है— साधारण विधेयक
● साधारण विधेयक से संबंधित गतिरोध को दूर करने के लिए संसद के दोनों सदनों की संयुक्त बैठक कौन बुलाता है— राष्ट्रपति
● स्वतंत्र भारत में अब तक कितनी बार संयुक्त अधिवेशन हो चुके हैं— चार बार
● क्या राष्ट्रपति या उपराष्ट्रपति कभी संयुक्त अधिवेशनों की अध्यक्षता करता है— कभी नहीं
● एक वर्ष में कम से कम कितनी बार संसद की बैठक होना आवश्यक है— दो बार
● संसद के दोनों सदनों की संयुक्त अधिवेशनों की अध्यक्षता कौन करता है— लोकसभा अध्यक्ष
● संसद के दोनों सदनों का सत्रावसान कौन करता है— राष्ट्रपति
● संसदीय प्रणाली को कौन-सी प्रथा भारत की देन है— शून्य काल
● संसद की कार्यवाही में प्रथम विषय कौन-सा होता है— प्रश्न काल
● किस विधेयक को संसद में दोनों सदनों द्वारा अलग-अलग विशेष बहुमत से पारित करना आवश्यक है— संविधान संशोधन विधेयक
● सांसदों के वेतन का निर्माण कौन करता है— संसद
● संसदीय प्रणाली वाली सरकार को अन्य किस नाम से जाना जाता है— संघीय सरकार
● संविधान लागू होने के बाद सर्वप्रथम त्रिशंकु संसद का गठन कब हुआ— 1989 ई.
● अस्थायी संसद भारत में कब तक रही— 17 अप्रैल, 1952 ई.
● संसद भवन (पार्लियामेंट हाउस) का उद्घाटन कब हुआ— 1927 ई.
● संसद भवन (पार्लियामेंट हाउस) का उद्घाटन किसने किया था— लॉर्ड इरविन
● भारत की संचित निधि से धन निर्गम पर किसका नियंत्रण होता है— संसद का
● राज्यसभा और लोकसभा की संयुक्त बैठक कब होती है— लोकसभा और राज्यसभा में मतभेद होने पर
● संसद का निम्न सदन कौन-सा होता है— लोकसभा
● संसद का उच्च सदन कौन-सा होता है— राज्यसभा
● संसद के किस सदस्य को गैर सरकारी सदस्य कहा जाता है— मंत्री के अतिरिक्त अन्य सभी सदस्यों को

Tuesday, April 12, 2016

राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भ पुस्तके

‎राज्यसेवा‬ मुख्य परीक्षा संदर्भ पुस्तके:-
‪#‎मराठी‬-
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
‪#‎इंग्रजी‬-
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
- 10000-Objective-general-English by R.S. Aggarwal & Vikas Aggarwal
‪#‎सामान्य‬ अध्ययन एक – इतिहास व भूगोल
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ.अनिल कटारे
- आधुनिक भारताचा इतिहास- डॉ.श्रीनिवास सातभाई
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- प्राचार्य डॉ एस,एस.गाठाळ
- महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास- भिडे-पाटील
- गांधींनंतरचा भारत- रामचंद्र गुहा
- आधुनिक भारताचा इतिहास- वैद्य सुमन,शांता कोठेकर
- आधुनिक भारत- य ना कदम
- भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
- दूरसंवेदन- प्रा. कार्लेकर
- हुसेन/खुल्लर यांची पुस्तके
- जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ
#सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
- इंडियन पॉलिटी- एम.लक्ष्मीकांत
- स्पेक्ट्रम पॉलिटी फॉर मेन्स.
- इंट्रोडक्‍शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन- डी. डी. बसू
- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- आपले संविधान- सुभाष कश्यप
- आपली संसद- सुभाष कश्यप
- भारतीय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे
- पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
- पंचायतराज- के. सागर
- पंचायती राज- किशोर लवटे
- महाराष्ट्र प्रशासन व्यवस्था -आर के बंग
- Modern Indian Political thought- B. L. Bhole
- भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण – प्रा. चिं. ग. घांगरेकर
#सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
- मानवाधिकार- NBT प्रकाश
- मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
- मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
- मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
- भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
- Wizard-Social Issue
#सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
- भारत आर्थिक पाहणी अहवाल
- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
- विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
- विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
- विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
- प्रा. के .एम .भोसले- काटे यांची पुस्तके
- अर्थव्यवस्था विशेषांक- प्रतियोगिता दर्पण
‪#‎चालू‬ घडामोडी-
- सकाळ, मटा, लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस ही वृत्तपत्रे
- परिवर्तनाचा वाटसरू’ पाक्षिक
-लोकराज्य’, योजना-कुरुक्षेत्र मासिके,
- महाराष्ट्र वार्षिकी'- युनिक प्रकाशन
- बळीराम हावळे, दत्ता सांगोलकर,देवा जाधवर व राजेश भराटे यांची पुस्तके कमी कालावधीत रिव्हिजन करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतात.
- तसेच maharashtra.gov.in, mahanews.nic.in ,pib.nic.in या वेबसाईटही अत्यंत उपयुक्त आहेत.
- फक्त दूरदर्शन व आकाशवाणी वरील वाद संवादाचा फायदा होऊ शकतो.
टीप:- अधिकृत संदर्भ म्हणून NCERT, स्टेट बोर्ड व य.च.मु ची पुस्तके अभ्यासाने अत्यंत गरजेचे आहे.
तसेच विविध खाजगी क्लासेसचे स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावरील पुस्तके व प्लानर व सराव प्रश्नसंच उपयुक्त ठरू शकतात.
( सर्व पुस्तके अभ्यासणे गरजेचे नाही विविध पर्याय म्हणून जास्त पुस्तकांची नावे दिलेली आहेत. अभ्यासण्यास सहज सोपी व अभ्यासक्रमाला धरून असलेली पुस्तके पाहूनच वाचायला घ्या)

Monday, April 4, 2016

चालु घडामोडी ८१

चालू घडामोडी (4 एप्रिल 2016)
चालू घडामोडी (4 एप्रिल 2016) :

वेस्ट इंडीज 2016 चा टी-20 वर्ल्डकप विश्वविजेता :

अखेरच्या षटकात विजेतेपद निश्चित करण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइकवर असलेल्या अष्टपैलू क्रेग ब्रेथवेटने बेन स्टोक्सला पहिल्या चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकले.
 इंग्लंडला 4 विकेटने नमवून वेस्ट इंडीजने दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
 विशेष म्हणजे, यासह दोन वेळा टी-20 विश्वविजेतेपद पटकाविणारा पहिला संघ म्हणून विंडीजने इतिहास रचला.
 विंडीज 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने सुद्धा 2016 चा विश्वचषक जिंकला आहे.
 ईडन गार्डनवर झालेल्या या रोमांचक सामन्याआधी याच मैदानावर विंडीजच्या महिलांनी ऑस्ट्रेलिया पाडाव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले.  
 प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 9 बाद 155 असा लक्ष विंडीज समोर ठेवला.
 तसेच वेस्ट इंडिज ने 19.4 षटकांत 6 बाद 161 धावा पूर्ण करून विश्वविजेतेपद जिंकले.  

जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री पदावर मेहबूबा मुफ्तीं :

जम्मू आणि काश्‍मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (दि.4) शपथ घेणार आहेत.
 भारतीय जनता पक्ष आणि 'पीडीपी'ची राज्यात युती आहे.
 जम्मू आणि काश्‍मीरच्या इतिहासात मुख्यमंत्रिपदाचा मान मिळविणाऱ्या मुफ्ती या पहिल्या महिला असतील.
 राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पीडीपी-भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.
 मेहबूबा यांचे वडील आणि मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर राज्यात राज्यपाल राजवट होती.

देहरजी मध्यम प्रकल्पासाठी वनजमीन देण्यास मान्यता :

प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने 10 वषार्नंतर 445.29 हेक्टर (1113 एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे.
 केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग असलेल्या असलेल्या पालघर येथील या जमिनीला पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी केलेला विरोध डावलून सरकारने ही मान्यता दिली आहे.
 देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी 531.186 हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता.
 शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता.
 तसेच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे.

राज्यातील 11 जिल्ह्यांत डिजिटल शाळा :

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 जिल्ह्यांत ज्ञानरचनावादी शाळा आणि तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये संपूर्णत: डिजिटल शाळा झालेल्या आहेत.
 राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत.
 ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती म्हणजे मुलांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे होय.
 तसेच या पद्धतीत मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यात शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकांची राहणार आहे.
 परिसर स्वच्छ, शाळा व वर्गाची रंगरंगोटी, वर्ग सजावट आणि सर्वात म्हणजे प्रात्यक्षिकांतून शिक्षण देणे हेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती आहे.
 शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2 वर्षात देशातील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये येण्याचा संकल्प केला आहे.
 मात्र त्यापूर्वीच राज्यातील प्राथमिक शाळा आता डिजिटल शाळा व ज्ञानरचनावादी शाळा होणार आहेत.  
 अहमदनगर, सोलापूर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, नांदेड, बुलढाणा, परभणी आणि हिंगोली हे 14 जिल्हे 100 टक्के ज्ञानरचनावादी शाळांचे झाले आहेत.
 तसेच नगर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांमधील शाळा डिजिटल झाल्या आहेत.

इस्रोचा चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी करण्याचा निर्णय :

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात रशियाची मदत घेतली जाणार नाही, अमेरिकेची किरकोळ मदत घेतली जाणार आहे.
 इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, चांद्रयान 2 मोहीम पूर्णपणे स्वदेशी राहील.
 तसेच त्यातील लँडर व रोव्हर भारतातच तयार केले जातील.
 डिसेंबर 2017 मध्ये किंवा 2018 च्या पूर्वार्धात भारताचे चांद्रयान 2 झेपावेल, त्यात चंद्रावरील खडक व माती गोळा करून त्यांची माहिती पृथ्थकरणानंतर पृथ्वीकडे पाठवणारी उपकरणे असतील.
 चांद्रयान 2 च्या आधी भारताने चांद्रयान 1 मोहीम यशस्वी केली आहे.
 तसेच त्यात चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.
 2010 मध्ये रशियाच्या ग्लावकॉसमॉस संस्थेला लँडर तयार करण्यात सहभागी करण्याचे ठरवले होते व इस्रो ऑर्बिटर तसेच रोव्हर तयार करणार होती.
 पण आता सगळे भारतच तयार करणार आहे, इस्रोने आता लँडर व रोव्हर, ऑर्बिटर सगळे स्वत:च तयार करण्याचे ठरवले आहे.
 तसेच कुठलेही यानाचे निरीक्षण एका ठिकाणाहून करून चालत नाही त्यामुळे नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेतली जाणार आहे.

गुरू ग्रहा सारखा नवीन ग्रहाचा शोध :

वैज्ञानिकांनी तीन तारे व त्याभोवती फिरणारा गुरूसारखा वायू असलेला ग्रह शोधून काढला आहे.
 हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या अमेरिकेतील संस्थेच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे.
 तसेच द्वैती ताऱ्यांचा एक संच यात आढळला असून आधी तो एकच तारा वाटत होता. 
   द्वैती हे तारे तिसऱ्या एका ताऱ्याभोवती फिरत आहेत, या सर्व तारका प्रणालीत एक ग्रह तीन ताऱ्यांभोवती फिरत आहे.
 तीन ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह दुर्मीळ असतात. तीन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह सापडण्याची ही चौथी वेळ आहे.
 विशेष म्हणजे हा ग्रह असलेली तारका प्रणाली पृथ्वीपासून तुलनेने जवळ आहे.  
 नवीन ग्रहाचे नाव केइएलटी 4 एबी असे असून तो वायू असलेला ग्रह आहे.
 गुरूइतक्या आकाराच्या असलेल्या या ग्रहाला परिवलनास तीन दिवस लागतात, तो केइएलटी-ए ताऱ्याभोवती फिरत आहे.  
 तीस वर्षांत ते एकमेकांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात पण केइएलटी ए ताऱ्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास द्वैती ताऱ्यांना चार हजार वर्षे लागतात.
 केइएलटी 4 एबी हा ग्रह आपल्या सूर्याच्या चाळीस पट मोठय़ा असलेल्या केइएलटी ए ताऱ्याभोवती फिरत आहे.
 तसेच हे संशोधन द अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

दिनविशेष :

1949 : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.

��������

Saturday, March 19, 2016

महाराष्ट्र अर्थसंकल्प -२०१६

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सन 2016 - 17 चा अर्थसंकल्प मांडला , अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये

1. पालकमंत्री पांदण रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना - शेतांमध्ये जाणारे वर्षानुवर्षे नादुरुस्त असलेले पांदण रस्ते दुरुस्तीसाठी तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी पालकमंत्री पांदण रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना, या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना जेसीबी खरेदीसाठी राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्जपुरवठा, या कर्जावरील व्याजाची हमी शासन घेणार, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद. 
2. कृषी प्रक्रीया उद्योग योजना–  कृषी प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान, प्रकल्प खर्चाच्या 25 % किंवा जास्तीत जास्त 50 लाख मर्यादेत, यासाठी  50 कोटी रुपयांची तरतुद
3. पंडीत दिनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शन योजना – या योजनेअंतर्गत कृषी विषयक उपक्रम, घडामोडी, संशोधन, समुपदेशन यासाठी  एकत्रितपणे मार्गदर्शन शेतक-यांना देण्यात येईल, यासाठी  60 कोटी रुपयांची तरतुद
4. कृषी गुरुकुल योजना – शासनाद्वारे सन्मानित आदर्श शेतक-यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ राज्यातील इतर शेतक-यांना  देण्याची योजना.
5. जिल्हा कृषी महोत्सव योजना - प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी कृषी महोत्सव भरविण्यात येईल. या माध्यमातून कृषी  विषयक योजनांची माहीती व मार्गदर्शन, यासाठी 20 लाख रु. प्रति जिल्हा प्रति वर्ष, यासाठी एकूण 6.80 कोटी रुपयांची तरतुद
6. कृषी विद्यापिठांमध्ये सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना - सेंद्रीय शेतीचे महत्व लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या चार कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रीय शेती, संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना
7. गोवर्धन – गोवंश रक्षा केंद्रांची निर्मीती -  गोवंश रक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात भाकड व गोवंश संगोपन करण्यासाठी गोवंश गोवर्धन केंद्र स्थापन करणार, अनुभवी स्वयंसेवी संस्था मार्फत राबविण्यात येणार, यासाठी 1 कोटी रुपये एकरकमी देणार,  यासाठी 34 कोटी रुपयांची तरतुद
8. जल साक्षरता व जलजागृती कक्षांची स्थापना - भविष्यात पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी जल साक्षरता व जलजागृती केंद्रांची स्थापना करण्यात  येणार, कायमस्वरूपी केंद्र यशदा पुणे येथे, उपकेंद्र – चंद्रपुर, अमरावती व औरंगाबाद येथे स्थापन करणार
9. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम – राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात समाविष्ट नसणा-या योजना व बंद असणा-या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांचे पुनरुज्जीवन यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राबविणार , यासाठी  2500 कोटी रु. ची तरतुद, या वर्षी 500 कोटी रु. उपलब्ध करणार.
10. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान- ग्रामपंचायती अधिक सक्षम होण्यासाठी, या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवित ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान राबविणार, यासाठी  1 कोटी रुपयांची तरतुद.
11. स्व. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना-महिला स्वयं सहायता बचत गटांना 0 टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्व. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना राबविणार , यासाठी  10 कोटी रुपयांची तरतुद.

12. मुद्रा बँक कर्ज पुरवठा जिल्हास्तरीय समितीचे गठन – मुद्रा बॅंक योजनेच्या प्रसार व प्रसिद्धी साठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयात समिती स्थापन करणार, यामुळे जास्तीत जास्त तरुणांना योजनेचा लाभ मिळणार, यासाठी 20 कोटी रुपयांची तरतुद.
13. राज्य महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे - राज्य महामार्गावर दर 100 कि.मी. ला एक या प्रमाणे 400 स्वच्छतागृहे बांधण्यात येणार,  यासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद.
14. स्वत: चे घर नसलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा त्यांच्या हयात विधवांना घरे - स्वत: चे घर नसलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा त्यांच्या हयात विधवा यांना स्वत:चे घर बांधण्यासाठी 10 लाख रु पर्यत मदत, यसाठी स्वत:चे नावे किंवा पत्नीच्या नावे किंवा निकटवर्तीयांच्या नावे घर नाही अश्या स्वातंत्र्यसैनिकांना किंवा त्यांच्या हयात पत्नीला घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य.
15. महिलांसाठी स्वतंत्र ‘तेजस्विनी’ बसेस – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबीवली, पुणे ,नागपुर या शहरातील महिलांना बस प्रवास सुखकर होण्यासाठी 300 बस स्थानिक प्राधिकरणामार्फत उपलब्ध करणार, यासाठी  50 कोटी रुपयांची तरतुद
16. ई ग्रंथालये - 43 सार्वजनिक ग्रंथालयांचे रुपांतरण ई ग्रंथालयात करण्यात  येणार, प्रत्येकी 40 लाख अशी एकूण 17.20 कोटी रुपयांची तरतुद.
17. 2 कोटी वृक्ष लागवड - 1 जुलै कृषि दिन व वन महोत्सव यांचे औचित्य साधत राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करणार.
18. नमामि चंद्रभागा- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात लीन होणा-या चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचे अभियान, चंद्रभागा नदी 2022 पर्यंत प्रदुषण मुक्त करणार,  शासन व लोकसहभाग  सदर अभियान राबविणार, यसाठी 20 कोटी रुपयांची तरतुद.
19. आदर्श अंगणवाडी योजना – राज्यातील बालकांचा विकास करण्याच्या प्रक्रियेत महत्वपुर्ण भुमिका बजावणा-या 10,000 अंगणवाड्या आदर्श करणार, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद.
20. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विमा संरक्षण- प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा लाभ अंगणवाडी सेविका व मदतनिसांना देण्यात येणार, विम्याचा  हफ्ता शासन भरणार,  प्रत्येक योजनेअंतर्गत रु. 2 लाखाचे विमासंरक्षण.
21. सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांच्या अनुदानात वाढ - संजय गांधी निराधार  योजना , श्रावणबाळ योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्या इतर योजनांच्या अनुदानात वाढ करणार,  दोन अपत्य असणा-या लाभार्थींना 1000 रुपये, एक अपत्य असणा-यांना 850रुपये , अपत्यहिन लाभार्थ्यांना 700 रुपये, यामुळे शासनावर 332  कोटी रुपयांचा अतिरिक्त भार
22. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना- अनुसुचित जातीच्या शेतक-यांना विहिर खोदण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान, या विहिरीवर विद्युत पंप बसविणार, ज्याठिकाणी विद्युत पंप उपलब्ध नाही अशा ठिकाणी सौर ऊर्जा पंप बसविणार
23. सार्वजनिक धोरण संस्थेची स्थापना - शासनाच्या ध्येय धोरणांसंदर्भात शास्त्रशुध्द विश्लेषण संशोधन व मुल्यमापन यासाठी जागतीक मानांकनाची महाराष्ट्र धोरण संशोधन  परीषद स्थापन करणार
24. स्व. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या रकमेत वाढ व प्रतिपुर्तीच्या नियमात कुटुंबियांचा समावेश -अधिस्विकृती धारक पत्रकारांना आजार व मृत्युपश्चात देण्यात येणा-या मदतीच्या निकषात कुटूंबीयांचा समावेश, योजनेसाठीच्या मदत ठेवीत 5 कोटीवरुन 10 कोटी इतकी वाढ
25. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम - लोकमान्य टिळकांच्या “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” या घोषणेला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकमान्यांच्या स्मृतीला अभिवादन करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविणार, यासाठी 5 कोटी रुपयांची तरतुद.
26. जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी  - जळगांव जिल्हयात चाळीसगांव तालुक्यात पाटणदेवी येथे जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी स्थापन करणार
27. ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकार भवनाचे बांधकाम - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे पत्रकार भवनाचे बांधकाम करणार.
28. स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृती सभागृहाचे बांधकाम -  माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगली जिल्हयात सभागृहाचे बांधकाम  करणार, यासाठी 5 कोटी रुपयांची तरतुद.
29. राज्यनाटय स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत तसेच सादरीकरणाच्या खर्चात वाढ – सांस्कृतिक कार्य संचालनाद्वारे आयोजित होणा-या राज्य नाटय महोत्सवाअंतर्गत घेण्यात येणा-या मराठी, हिंदी हौशी नाटय स्पर्धा, व्यावसायिक, संस्कृत, संगीत, बाल नाटय स्पर्धाच्या पारितोषिकांच्या रकमेत तसेच सहभागी संस्थांना देण्यात येणा-या सादरीकरण खर्च तसेच दैनिक प्रवास भत्ता यात वाढ करणार
30. स्मार्ट गाव योजना – राज्यामध्ये यावर्षीपासून स्मार्ट गाव  ही नविन योजना जाहिर करण्यात येत आहे. याद्वारे राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याचा पध्दतशीर प्रयत्न. जिल्हास्तर, तालुकास्तर व पंचायत समिती गण स्तरावर ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा घेण्यात येणार. स्पर्धेतील विजेत्या गावांना विकास कामांसाठी प्रोत्साहनपर निधी.

योजनानिहाय तरतुदी
1. सन 2016 हे शेतकरी स्वाभिमान वर्ष.
2. अर्थसंकल्पाचा भर शेतकरी व ग्रामविकास.
3. कृषी विषयक विविध योजनांसाठी 25000 कोटी एवढी भरीव तरतुद.
4. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी रु. 110 कोटी.
5. 2016 हे युनो ने आंतर राष्ट्रीय कडधान्य वर्ष जाहीर केले आहे.त्यामुळे तेल बिया व कडधान्य  उत्पन्नात वाढ करण्यासाठी रु. 80  कोटी.
6. नविन कृषी महाविद्यालये – बुलढ़ाणा, हळगाव त. जामखेड जि अहमदनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालये, पाल जि जळगाव येथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय, तर जळगांव आणि अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालये नव्याने स्थापन करणार.
7. 2065 महसुल मंडळस्तरावर स्वंयचलित हवामान केंद्र स्थापन करण्यसाठी रु. 107 कोटी.
8. राष्ट्रीय कृषी विकास  योजनेंतर्गत नाबार्डच्या सहाय्याने शेतक-यांची उत्पादक कंपनी स्थापन करुन 100 कोटी किंमतीचे दुग्धविकास प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यात उभारणार.
9. मागेल त्याला शेततळे  योजनेसाठी रु.2000 कोटी,
10. पिक विमा योजनेसाठी रु. 1855 कोटी,
11. विकेंद्रीत धान खरेदी योजनेसाठी रु. 62 कोटी.
12. जलयुक्त शिवार योजनेसाठी रु. 1000 कोटी,
13. 14 जिल्हयातील  शेतकर-यांना रास्त भावात धान्य देण्यासाठी रु. 1035.83 कोटी, 
14. माजी मालगुजारी तलावांची मस्त्य संवर्धन  खड्ड्यांसह दुरुस्ती,  संवर्धन व नुतनीकरण करण्यासाठी रु. 150 कोटी, शेतकरी व मासेमारी करणा-यांना दिलासा.
15. आदिवासी विद्यार्थांना नामांकीत शाळांमध्ये प्रवेशीतांसाठी रु. 290 कोटी,
16. आदिवासी विभागा अंतर्गत रस्ते विकासासाठी रु. 300 कोटी,
17. आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळा बांधकामासाठी रु. 370 कोटी,
18. आदिवासी पोषण आहार योजना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम योजनेसाठी रु. 112 कोटी,
19. वारली कला जोपासना व संवर्धन अंतर्गत वारली हाट उभारण्यासाठी रु. 60 कोटी,
20. अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रमाण ऑनलाईन प्रणाली गुढी पाडव्यापासुन सुरु.
21. अनु्सुचित जातींसाठी घरकुल योजनेअंतर्गत सन 2019 पर्यंत अनुसूचित जातीचे एकही कुटूंब बेघर राहणार नाही, राहत्या ठिकाणी किंवा भुखंड विकत घेऊन घरकूल बांधुन देणार, यासाठी रु 320 कोटी
22. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमासाठी रु.170 कोटी.
23. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांसाठी रु. 405 कोटी
24. सिंचन प्रकल्पांसाठी रु. 7850कोटीची भरीव तरतुद, गेल्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी जाहिर केलेली  रु. 7272 कोटीची तरतुद पुर्णपणे वितरीत
25. सर्व ग्रामपंचायतींना डीजीटल बोर्ड बसवुन देणार, सर्वसामान्य नागरिकांना गावपातळीवरच सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची सर्वकष माहिती उपलब्ध होणार.
26. मुख्यमंत्री ग्रामसडक  योजनेसाठीरु. 500 कोटी.
27. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी रु. 170 कोटी.
28. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व राज्य रोजगार हमी  योजनेसाठी रु. 3473 कोटी
29. बी ओ टी तत्वावर रस्त्यांचे दुपदरी करण व चौपदरी करण करणेसाठी रु. 550 कोटी
30. हजार किमी चे राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग हायब्रिड अन्युटी माध्यमातून ८ वर्षात टप्प्या टप्याने सुधारणार
31. केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत सन 2015-16 मध्ये रु. 4665 कोटीची नविन कामे मंजुर , स्वातंत्र्यानंतरची राज्याला मिळालेली आत्ता पर्यंतची सर्वात मोठी रक्कम
32. सर्वांसाठी घरे 2022 – या केंद्रपुरस्कृत योजनेची काही सुधारणासह राज्यात अंमलबजावणी, राज्याचा सहभाग म्हणून रु. 700 कोटी.
33. नविन चंद्रपुर विकास योजनेसाठी रु. 100 कोटी.
34. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानासाठी रु. 100 कोटी.
35. नागपुर व पुणे मेट्रो प्रकल्पासाठी रु. 180 कोटी
36. मुंबई मेट्रो -3 प्रकल्पासाठी रु. 90 कोटी
37. ८ शहरांचे स्मार्ट सिटी प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातुन राबविणार
38. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान – माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकिकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रु. 137 कोटी.
39. मुला मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी रु. 220 कोटी.
40. सर्व शिक्षा अभियानासाठी रु. 740 कोटी,
41. शालेय शिक्षण विभागांतर्गत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु. 180 कोटी
42. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती शताब्दी वर्षानिमित्त रु. 1 कोटीचे  अर्थसहाय्य.
43. पोलिस गृहनिर्माण मंडळास रु. 320 कोटी
44. सिसिटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्यासाठी रु. 350 कोटी
45. न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी व न्यायालयीन इमारतीसाठी रु. 491 कोटी
46. अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दर वर्षी 400 कोटी खर्च करण्यात येत आहे.
47. तिवर संवर्धन प्रतिष्ठाणाच्या माध्यमातून समुद्र किना-यावरील लोकांचे जिवनमान उंचावण्यासाठी व्यवसाय व रोजगार वृद्धी
48. माझी कन्या भाग्यश्री  या योजनेसाठी 25 कोटी
49. आपले सरकार पोर्टल मार्फत 156 सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
50. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर स्मारक उभारले जात असल्यास राज्य शासन आर्थिक व भावनिक सहभाग देणार, यासाठी रु 5 कोटी
51. महाराष्ट्र उद्योजकता  परीषद स्थापन करणार
52. राज्य शासनाच्या नविन औद्योगीक धोरणामुळे जाने 2016 पर्यंत 8497 प्रकल्पांनी उत्पादन सुरु केले आहे. यात 262631 कोटी रु. ची गुंतवणूक करण्यात आली आहे, 11.23 लाख थेट रोजगार निर्मिती.
53. उद्योग क्षेत्रातल्या सवलतीसाठी रु. 2650 कोटी
54. वस्त्रोद्योग – कापुस उत्पादक भागात वस्त्रोद्योगाचा विकास व्हावा म्हणून विशेष लक्ष , विविध योजनांसाठी रु. 265 कोटी.
55. कोकणातील विविध 5 जिल्हयातील जेट्टी विकास कार्यक्रमासाठी रु. 30 कोटी
56. ससुन गोदी नुतनीकरण करण्यासाठी रु. 15 कोटी
57. राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेसाठी रु. 300 कोटी
58. नविन पर्यटन धोरण जाहीर, यासाठी रु. 285 कोटी, औरंगाबाद परीसरातील म्हैसमाळ, वेरूळ, सुलिभंजन पर्यटन विकासावर विशेष लक्ष