चालू घडामोडी (4 एप्रिल 2016)
चालू घडामोडी (4 एप्रिल 2016) :
वेस्ट इंडीज 2016 चा टी-20 वर्ल्डकप विश्वविजेता :
अखेरच्या षटकात विजेतेपद निश्चित करण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइकवर असलेल्या अष्टपैलू क्रेग ब्रेथवेटने बेन स्टोक्सला पहिल्या चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकले.
इंग्लंडला 4 विकेटने नमवून वेस्ट इंडीजने दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
विशेष म्हणजे, यासह दोन वेळा टी-20 विश्वविजेतेपद पटकाविणारा पहिला संघ म्हणून विंडीजने इतिहास रचला.
विंडीज 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने सुद्धा 2016 चा विश्वचषक जिंकला आहे.
ईडन गार्डनवर झालेल्या या रोमांचक सामन्याआधी याच मैदानावर विंडीजच्या महिलांनी ऑस्ट्रेलिया पाडाव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 9 बाद 155 असा लक्ष विंडीज समोर ठेवला.
तसेच वेस्ट इंडिज ने 19.4 षटकांत 6 बाद 161 धावा पूर्ण करून विश्वविजेतेपद जिंकले.
जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री पदावर मेहबूबा मुफ्तीं :
जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (दि.4) शपथ घेणार आहेत.
भारतीय जनता पक्ष आणि 'पीडीपी'ची राज्यात युती आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासात मुख्यमंत्रिपदाचा मान मिळविणाऱ्या मुफ्ती या पहिल्या महिला असतील.
राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पीडीपी-भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.
मेहबूबा यांचे वडील आणि मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर राज्यात राज्यपाल राजवट होती.
देहरजी मध्यम प्रकल्पासाठी वनजमीन देण्यास मान्यता :
प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने 10 वषार्नंतर 445.29 हेक्टर (1113 एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग असलेल्या असलेल्या पालघर येथील या जमिनीला पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी केलेला विरोध डावलून सरकारने ही मान्यता दिली आहे.
देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी 531.186 हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता.
शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता.
तसेच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे.
राज्यातील 11 जिल्ह्यांत डिजिटल शाळा :
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 जिल्ह्यांत ज्ञानरचनावादी शाळा आणि तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये संपूर्णत: डिजिटल शाळा झालेल्या आहेत.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत.
ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती म्हणजे मुलांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे होय.
तसेच या पद्धतीत मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यात शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकांची राहणार आहे.
परिसर स्वच्छ, शाळा व वर्गाची रंगरंगोटी, वर्ग सजावट आणि सर्वात म्हणजे प्रात्यक्षिकांतून शिक्षण देणे हेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती आहे.
शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2 वर्षात देशातील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये येण्याचा संकल्प केला आहे.
मात्र त्यापूर्वीच राज्यातील प्राथमिक शाळा आता डिजिटल शाळा व ज्ञानरचनावादी शाळा होणार आहेत.
अहमदनगर, सोलापूर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, नांदेड, बुलढाणा, परभणी आणि हिंगोली हे 14 जिल्हे 100 टक्के ज्ञानरचनावादी शाळांचे झाले आहेत.
तसेच नगर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांमधील शाळा डिजिटल झाल्या आहेत.
इस्रोचा चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी करण्याचा निर्णय :
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात रशियाची मदत घेतली जाणार नाही, अमेरिकेची किरकोळ मदत घेतली जाणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, चांद्रयान 2 मोहीम पूर्णपणे स्वदेशी राहील.
तसेच त्यातील लँडर व रोव्हर भारतातच तयार केले जातील.
डिसेंबर 2017 मध्ये किंवा 2018 च्या पूर्वार्धात भारताचे चांद्रयान 2 झेपावेल, त्यात चंद्रावरील खडक व माती गोळा करून त्यांची माहिती पृथ्थकरणानंतर पृथ्वीकडे पाठवणारी उपकरणे असतील.
चांद्रयान 2 च्या आधी भारताने चांद्रयान 1 मोहीम यशस्वी केली आहे.
तसेच त्यात चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.
2010 मध्ये रशियाच्या ग्लावकॉसमॉस संस्थेला लँडर तयार करण्यात सहभागी करण्याचे ठरवले होते व इस्रो ऑर्बिटर तसेच रोव्हर तयार करणार होती.
पण आता सगळे भारतच तयार करणार आहे, इस्रोने आता लँडर व रोव्हर, ऑर्बिटर सगळे स्वत:च तयार करण्याचे ठरवले आहे.
तसेच कुठलेही यानाचे निरीक्षण एका ठिकाणाहून करून चालत नाही त्यामुळे नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेतली जाणार आहे.
गुरू ग्रहा सारखा नवीन ग्रहाचा शोध :
वैज्ञानिकांनी तीन तारे व त्याभोवती फिरणारा गुरूसारखा वायू असलेला ग्रह शोधून काढला आहे.
हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स या अमेरिकेतील संस्थेच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे.
तसेच द्वैती ताऱ्यांचा एक संच यात आढळला असून आधी तो एकच तारा वाटत होता.
द्वैती हे तारे तिसऱ्या एका ताऱ्याभोवती फिरत आहेत, या सर्व तारका प्रणालीत एक ग्रह तीन ताऱ्यांभोवती फिरत आहे.
तीन ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह दुर्मीळ असतात. तीन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह सापडण्याची ही चौथी वेळ आहे.
विशेष म्हणजे हा ग्रह असलेली तारका प्रणाली पृथ्वीपासून तुलनेने जवळ आहे.
नवीन ग्रहाचे नाव केइएलटी 4 एबी असे असून तो वायू असलेला ग्रह आहे.
गुरूइतक्या आकाराच्या असलेल्या या ग्रहाला परिवलनास तीन दिवस लागतात, तो केइएलटी-ए ताऱ्याभोवती फिरत आहे.
तीस वर्षांत ते एकमेकांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात पण केइएलटी ए ताऱ्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास द्वैती ताऱ्यांना चार हजार वर्षे लागतात.
केइएलटी 4 एबी हा ग्रह आपल्या सूर्याच्या चाळीस पट मोठय़ा असलेल्या केइएलटी ए ताऱ्याभोवती फिरत आहे.
तसेच हे संशोधन द अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
दिनविशेष :
1949 : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.
No comments:
Post a Comment