व्यवसाय क्षेत्रात सुद्धा Saturation Point यायला सुरुवात झालीये.
5 वर्षांपूर्वी पुण्यात MPSC करायला आलो होतो तेंव्हा चांगली मेस शोधायला 2 दिवस गेले. मित्राच्या ओळखीने एक चांगली मेस मिळाली. ती पण 2 महिन्यात सोडली. अश्या मी आजपर्यंत 15-20 मेस बदलल्या असतील(कारण सांगायची गरज नाही!!). आज नवी पेठेत गल्ली गल्लीत 5-6 आणि एका बिल्डिंग मध्ये 2-3 तरी मेस आहेत. जागोजागी क्लासेस च्या पोस्टर्स जवळ मेस चे ही पोस्टर्स लागलेले दिसतात.हाच व्यवसाय 2 वर्षांपूवी अपग्रेड झाला. आणि हॉटेल कम मेस सिस्टीम चालू झाली. चहा व्यवसायाच्या बाबतीत ही सेम. 5-6 वर्ष MPSC करूनही result नाही आला की धंद्या शिवाय पर्याय उरत नाही. उमेदीचा काळ क्लासेस आणि अभ्यासिके मध्ये जातो. प्लस पुण्याची हवा लागलेली असते. पुणे सोडू वाटत नाही. मग धंदा करायचा विचार येतो. आज MPSC करणाऱ्या 10 तरुणांपैकी 7 तरुण हे हॉटेल कम मेस किंवा चहा ची टपरी टाकण्याच्या विचार करतात. आणि याला प्लॅन 'बी' असे म्हणतात.
कोणता धंदा करावा ही आपापल्या मर्जीची गोष्ट आहे. पण या जगात मेस आणि चहा हे 2 च व्यवसाय आहेत का? इतरही बरेच धंदे आहेत. आज पुण्यामध्ये हॉटेल,मेस,चहा टपरी या धंद्यांचा Saturation Point जवळ आलाय असे वाटते. आपली मानसिकता ह्याला जबाबदार असते. Engineering कॉलेज आले,सगळे Engineering ला पळाले. MBA आलं, सगळे तिकडे पळाले. MPSC कळाली, सगळे MPSC करायला लागले. हॉटेल व्यवसाय तसा सांगायला बरा वाटतो. प्रेस्टिज असतं यात. मग सगळे तेच करायला लागले. पण याच गोष्टीमुळे मेस चा व्यवसाय Engineering,MBA प्रमाणे देशोधडीला लागला. कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त प्रॉफिट या सूत्रामुळे अतिशय सुमार दर्जाच्या मेस उदयास आल्या. आणि मेस नावाचा धंदा बदनाम झाला.
धंदा करायचा आणि तो पुण्यातच करायचा असा अट्टाहास का बरं ठेवायचा? पुणेच का? स्वतःच्या गावी का नाही? याला दुष्काळ,प्रॉफिट,रिटर्न्स वगैरे कारणीभूत असेलही. पण प्रॉब्लेम बघण्यापेक्षा उपाय बघितला तर प्रगती लवकर होते. दुष्काळावर मात करून किती तरी व्यावसायिकांनी आपला व्यवसाय कोटींच्या घरात नेला.
जर खरच व्यवसायात उतरायचं असेल तर उद्दिष्ट Customer Satisfaction हेच असायला हवं. पैसा हा by-product असायला हवा. अन्यथा तुमचा टिकाव कोठेही लागणार नाही. मग पुण्यात जाऊन माझी तब्येत खराब होते,घरचं जेवण हे घरचं जेवण असतं, आयुष्य निवांत जगायचंय,किड्या मुंग्यांसारखं नाही. असे स्वतःच्या मनाला खुश करण्यासाठी स्वतः तयार केलेली कारणं सांगावी लागतात.

No comments:
Post a Comment