Bookmark

Bookmark this Blog

Saturday, February 21, 2015

फेब्रुवारी चालु घडामोडी ७

०१) देशभरात "स्वाईन फ्लू'चा वेगाने प्रसार होऊ लागला असून या रोगावरील कोणत्या प्रभावी औषधाची सर्वत्र टंचाई असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत?
== टॅमिफ्लू

०२) स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रकोपामुळे केंद्र सरकारने किती राज्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे?
== १७

०३) दग्गुबती रामा नायडू (डी. रामा नायडू)
>जन्म:- १९३६ साली आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्य़ात
>पहिला चित्रपट:- अनुरागम(१९६३)
>सुरेश प्रॉडक्शन्स अंतर्गत पाहिलां चित्रपट:-'रामुडू-भीमुडू'(१९६४)१५ भाषांमध्ये १५५ चित्रपटांची निर्मिती
>लोकसभा सदस्य:-बापतळा मतदारसंघ(१९९९)-तेलगु देसम पक्ष
>सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
>दादासाहेब फाळके पुरस्कार:- २००९
>पद्मभूषण पुरस्कार:- २०१२
>मृत्यू:- १८ फेब्रुवारी २०१५(हैदराबाद)

०४) मुंबईतील वाहतुकीची कोंडी व रस्त्यांवरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जागतिक पातळीवरील उद्योगपती मायकल ब्लुमबर्ग यांच्या कोणत्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने पाच वर्षांचा सामंजस्य करार केला आहे?
== ब्लुमबर्ग फिलान्थ्रोपिस

०५) बांगलादेश मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेले भारतीय हवाई दलाचे कोणते विमान भारताने बांगलादेशकडे सूपूर्त केले आहे?
== डाकोटा विमान(डीसी-३)

०६) बांगलादेश मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेले भारतीय हवाई दलाचे डाकोटा विमान भाग वेगळे करून हवाईदलाच्या कोणत्या विमानातून नवी दिल्लीहून ढाक्‍याला आणण्यात आले होते?
== सी-१७ ग्लोबमास्टर

०७) बांगलादेश मुक्तिसंग्रामात(१९७१) बांगलादेश हवाई दलाची निर्मिती कोठे झाली होती?
== नागालॅंडमध्ये

०८) ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांच्या विस्तारासाठी निती आयोगाकडून अपारंपरिक ऊर्जेचा कधी पर्यंतचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे?
== २०३०

०९) भारत आणि श्रीलंका करार:-
>पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना
>नागरी अणुसहकार्य करार
>संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य
>मच्छीमारांशी संबंधित संवेदनशील मुद्द्यावर परस्परसहमतीने तोडगा
>कृषी आणि आरोग्य क्षेत्रांतही सहकार्य
>श्रीलंका नालंदा विद्यापीठाच्या प्रकल्पात सहभागी

१०) इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदिनेजाद यांचे उजवे हात मानले जाणार्या इराणच्या कोणत्या माजी उप राष्ट्राध्यक्षांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.तसेच दंड म्हणून तीन लाख डॉलर्स व "नुकसानभरपाई‘ म्हणून आठ लाख डॉलर्स इतकी रक्कम सरकारदरबारी भरण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत?
== मोहम्मद रेझा रहिमी

११) केंद्र सरकारने 'नॅशनल रिसर्च प्रोफेसर' म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
== ज्येष्ठ कन्नड लेखक भैरप्पा, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक मोडक आणि हिंदीतील ज्येष्ठ लेखक-पत्रकार सूर्यकांत बाली

१२) स्वच्छता अभियानासाठी केंद्रीय नगरविकास खात्याकडून राज्यांना निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला यावर्षी स्वच्छता अभियानासाठी किती कोटी रुपये मिळणार आहेत?
== ८१० कोटी रुपये

१३) कुख्यात गुंड अबू सालेम याला पोर्तुगालने सन २००५मध्ये भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर विशेष टाडा कोर्टाने त्याला कोणत्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे?
== १९९५च्या प्रदीप जैन हत्येप्रकरणी

१४) दहीहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात करण्याच्या दृष्टीने सरकारला शिफारस करण्यासाठी अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे?
== आमदार आशिष शेलार

१५) राज्य सरकारी सेवेतील पेन्शन धारक, फॅमिली पेन्शन धारकांना त्यांचे मूळ पेन्शन, फॅमिली पेन्शन आणि महागाई निवृत्ती वेतन, महागाई कुटुंबनिवृत्ती वेतन (असल्यास) यांच्या एकूण रकमेवर १ जुलै २०१४ पासून अनुज्ञेय महागाईवाढीचा दर १०० टक्केवरून किती टक्के करण्यात आला आहे?
== १०७%

No comments:

Post a Comment