नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प सादर करत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू भाडेवाढीपासून नागरिकांना दिलासा दिला आहे. रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये -
- रेल्वेच्या तिकीटदरात वाढ होणार नाही
- हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये तिकीट मिळणार
- ट्रॅक वाढवण्याला पुढील काळात प्राधान्य देण्यात येणार
- रेल्वेचा पुनर्जन्म होणार आहे, रेल्वेत खासगी कंपन्यांकडून गुंतवणूक होणार
- 108 रेल्वेगाड्यांमध्ये ई केटरिंगची सुविधा सुरू करणार
- पाच मिनिटांत विनाआरक्षण तिकीट मिळणे शक्य होणार आहे
- रेल्वेचे जाळे देशभर वाढविणे हे रेल्वेचे लक्ष्य आहे
- रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे
- आयआरटीसीची वेबसाईट इतर भाषांमध्येही सुरू होणार
- रेल्वे ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे
- रेल्वे स्थानकांवर 17000 बायोटॉयलेट उभारण्यात येणार
- महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
- अनेक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करणार
- तक्रारीसाठी रेल्वेची हेल्पलाईन 24 तास सुरु ठेवणार
- मोबाईल चार्जिंगची सुविधा जनरल डब्यातही, ए आणि बी कॅटेगरी स्टेशनवर फ्री वायफाय
- गाड्यांची माहिती देण्यासाठी 'एसएमएस अलर्ट' सुविधा
- पुढील पाच वर्षात रेल्वेचा वेग आणि क्षमता वाढवणार
- महिला यात्रेकरूंसाठी निर्भया फंडातून निधी देण्यात येणार
- रेल्वेमध्ये टॉयलेट्सची स्थिती सुधारण्यावर भर
- एकाच ट्रॅकवरुन अनेक गाड्या धावतात, त्यामुळे ट्रॅक वाढवण्यात येणार
- रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडणार,विमानाप्रमाणे रेल्वेतही व्हॅक्युम टॉयलेटची सुविधा
- मुंबईमध्ये वातानुकुलित रेल्वे चालविणार
- स्टेशन आणि रेल्वे स्वच्छतेसाठी स्वतंत्र विभाग. इतर
No comments:
Post a Comment