Bookmark

Bookmark this Blog

Thursday, February 26, 2015

थोडं मनातलं

©विशाल भोसले...
मित्रांनो ...
दोन मिनिटे काढुन माझी पोस्ट वाचा...

मित्रांनो...
आपण Mpsc करतोय,
या स्पर्धेच्या युगात,  आपलं अस्तित्व बनवायला उतरलोय...

पण या क्षणी भरपुर अश्या गोष्टी असतात, ज्या आपल्या मनातुन कधी गेल्या नसतात...
किंवा काहि गोष्टी निर्माण होतात...
आणि अश्या गोष्टिंच्या मागे आपण जातो आणि आपलं जीवन या स्पर्धेच्या युगापासुन दुर जायला लागतं...

त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे,
"जाति-भेद "

मित्रांनो,
या जातिभेदामध्ये जर आपण गुंतुन पडलो, तर आपलं भविष्य खुप वेगळ्या दिशेसाठि असेल...
कारण,
जर आपण अधिकारी झालो,
तर आपणाला विविध जातीच्या, विविध धर्माच्या लोकांचे किंवा कामं काम करावं लागतं...
मग आज पर्यत केलेला जाति-भेद तीथे बाजुला ठेवावा लागतों...

आपल्या वर जे अधिकारी असतील ते सुद्धा वेगळ्या जातीचे किंवा धर्माचे असतात...

आपण कुठल्या जातीवर चिखलफेख करुन काहि नाहि होउ शकत,
प्रत्येकाला आपला धर्म प्यारा असतो..
पण दुसर्या धर्माला तुच्छ समजुन आपणाला काहि नाही मिळत ...
आपण मेहनतीने अधिकारी होउन नंतर आपले तत्व बाजुला ठेवावे लागतात...

दुसरा मुद्दा:
आपण या गोष्टिला बाजुला ठेउन जगलो तर खरचं आपणाला खुप छान वेळ देता येइल अभ्यासाला...
आणि त्यातुन आपण माणुसकी हा धर्म शिकतो...
महाराष्ट्रात जेवढ्या जाति-भेद करणार्या संघटना असतील त्या तुम्हाला किंवा तुमच्या परीवाराला कधी वाचवण्यासाठि येतील असं वाटतं??
नाहि ना...
कारण त्याचा फायदा कुठल्या युवकाला नाहि होत,
त्याचा फायदा राजकारणासाठिच होतो...

आपण समाजसेवा करायची इच्छा बाळगत असाल,
तर ती वेगवेगळ्या पद्धतिने आपण पूर्ण करु शकता...
पण अश्या गोष्टिंच्या मागे गेल्यावर आपल्या भविष्यात कुठलं अधिकारी हे पद ठेवलयं असं नाहि होउ शकत...

मी माझं कडवं म्हणतो

" ना मस्जिदसे अल्लाह आएगा...
ना मंदिर से भगवान बचाएगा...
तेरे तकलीफ मे तुझे,
बस्स इंन्सान ही बचाएगा"

त्यामुळे आपण जाति - पातीच्या राजकारणात न जाता,
फक्त Mpsc कडे लक्ष द्या...

तीसरा मुद्दा:
आपण म्हणतो कि मुली खुप प्रगति करत आहेत...
त्यांच नावं सगळीकडेच होत आहे,
तर त्याच हेच कारण आहे...
कारण मुलंच अश्या गोष्टींच्या मागे लागतात आणि आपलं आयुष्य थोडक्यात वेगळ्या वळणावे घेउन जातो...
आणि मुली कुठल्याही जातीच्या असल्या तरॊ त्या दंगलींपासुन दुर असतात...
त्यांना फक्त अभ्यास करता येतो...
आणि पूर्ण वेळ त्या अभ्यास करतात...
मग हा msg फक्त मुलांसाठिच नाहिये...
सर्वांसाठि आहे...

आपण आपला वेळ अभ्यासासठि द्यावा...
आणि खरचं तुम्हाला अधिकारी झालेलं पाहायचयं...
राजकरण्यांच्या मागे फिरणारा किंवा नोकरीसाठि झगडणारा युवक बनु नका...
आपण सुजान आहोत...
आणि जाति-भेद करुन आपल्या जिवनाला काही नाही भेटणार...

आपल्या भावी आयुष्यासाठि हार्दिक शुभेच्छा ...
��������

No comments:

Post a Comment