Bookmark

Bookmark this Blog

Thursday, May 21, 2015

चालु घडामोडी २६

चालू घडामोडी (15 मे 2015) :

भारत व चीनने केली  24 करारांवर स्वाक्षरी :

भारत व चीनने अंतराळ, विज्ञान, रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी तब्बल 10 अब्ज डॉलर्सच्या 24 करारांवर स्वाक्षरी केली.
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात दौ-यावर आले होते त्यावेळी 18 करारांवर स्वाक्षरी केली होती.
 
शांघाई येथे गांधवादी व भारतीय केंद्राची स्थापना, कुनंमिग येथे योग महाविद्यालय, चेन्नई व चीनमधील चोंगकिक तसेच हैदराबाद व किंगदाओ या शहरांना सिस्टर स्टेट बनवणे असे विविध करार याप्रसंगी करण्यात आले.
चित्रकार पाब्लो पिकासो यांच्याकलाकृतीची 17.94 कोटी डॉलर किमतीला विक्री :

जगप्रसिद्ध प्रतिभाशाली चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या एका कलाकृतीची न्यूयॉर्क येथील लिलावामध्ये नुकतीच 17.94 कोटी डॉलर किमतीला विक्री झाली.
 
या किमतीमुळे नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. 'विमेन ऑफ अल्जियर्स' या नावाची ही चित्रनिर्मिती आहे.
 
पिकासो यांनी 1954-55 मध्ये निर्माण केलेल्या 15 चित्रांच्या मालिकेमधील हे एक चित्र आहे.
 
याच लिलावामध्ये अल्बर्टो जियाकोमेत्ती या ख्यातनाम स्वीस शिल्पकाराचे 'पॉइंटिंग मॅन' हे शिल्प विक्रमी किमतीत (14.12 कोटी डॉलर) विकले गेले.
 
या दोन्ही कलाकृती विकत घेणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
 
या लिलावासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे नाव 'लूकिंग फॉरवर्ड टू द पास्ट' असे होते.
 
या लिलावामध्ये विसाव्या शतकामधील 36 कलाकृतींपैकी 35 कलाकृतींचा लिलाव करण्यात आला. या एकूण लिलावाची किंमत 70.6 कोटी डॉलर
'नमस्ते रशिया' उत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते :

रशियात भारतीय कला, चित्रपट आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणणाऱ्या 'नमस्ते रशिया' उत्सवाचे उद्घाटन मॉस्को दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
पुढील सहा महिन्यांत हा उत्सव रशियातील विविध प्रांतांपर्यंत पोहोचून भारतीय संस्कृती व कलेचा प्रचार करणार आहे.
वीरेंद्रसिंग यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी बदली :

मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक वीरेंद्रसिंग यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.
 
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांची बदली महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, मुंबईच्या सह संचालकपदावर झाली आहे.
 
विक्रमकुमार यांच्याकडे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) चा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे

��अधिक माहितिसाठि भेट द्या...
www.mahampsc.tk

No comments:

Post a Comment