नवी दिल्ली : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या मते, प्लुटोच्या सर्वात जवळून जात असलेलं अंतराळ यान 'न्यू होरायझन्स'ची मोहिम यशस्वी झाली आहे.
प्लुटोची ऐतिहासिक परिक्रमा पूर्ण केल्यानंतर 'न्यू होरायझन्स'ने अमेरिकेच्या मेरीलँड मिशन ऑपरेशन सेंटरला सिग्नल पाठवले आहेत.
प्लुटोपासून 4.7 अब्ज किमी अंतर पार करून, नासाकडे हे सिग्नल पाठवण्यासाठी तब्बल 4 तास 25 मिनिटे कालावधी लागला. हे सिग्नल मिळाल्यानंतर शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला.
नासाच्या मते, पुढील काही तासात अंतराळयान आणखी काही फोटो पाठवेल, ज्यामुळे प्लुटोबाबत आणखी नवी माहिती उपलब्ध होईल.
दरम्यान, संशोधकांच्या या यशाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कौतुक केलं आहे. "नासा 'न्यू होरायझन्स'ने तीन अब्ज मैलांचा यशस्वी प्रवास केल्याबद्दल अभिनंदन" असं ट्विट ओबामांनी केलं आहे.
नवी माहिती
यापूर्वी नासाचं अंतराळ यान 9 वर्षांपूर्वी प्लुटोच्या जवळ पोहोचलं होतं. त्यावेळी त्याचा वेग 14 किलोमीटर प्रति सेकंद इतका होता.
तर आता 'न्यू होरायझन्स'कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्लुटोचा व्यास 2 हजार 370 किमी आहे. यापूर्वी हा व्यास 2 हजार 300 किमी मानला जात होता.
त्यामुळे प्लुटो हा सौरमंडळाच्या बाहेरच्या कक्षेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्रह असल्याचं सिद्ध झालं आहे.
No comments:
Post a Comment