Bookmark

Bookmark this Blog

Friday, July 10, 2015

चालु घडामोडी व खेळ आणि इतर

महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2015

    स्पर्धचे ठिकाण: कॅनडा
    विजेता: अमेरिका
     उपविजेता: जपान
     सर्वोत्तम खेळाडू (गोल्डन बाँल): कार्ली लॉइड

सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे.

विश्वचषक इतिहासात अंतिम फेरीत हॅट्ट्रिक नोंदविणारी कार्ली लॉइड ही पहिली महिला खेळाडू ठरली.कार्ली ने पहिल्या १६ मिनीटातच ३ गोल केले
   
अमेरिकेने १९९१ आणि १९९९ नंतर प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. याचबरोबरच सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे. त्यापाठोपाठ दोन जेतेपदे पटकावणाऱ्या जर्मनी संघाचा क्रमांक येतो.

  गतविजेते: १९९१:- अमेरिका, १९९५:- नार्वे, १९९९:- अमेरिका, २००३:-जर्मनी, २००७:- जर्मनी, २०११:- ज

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या ९९ वर्षांच्या इतिहासात चिलीने प्रथमच कोणत्या बलाढ्य संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-१ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले?
अर्जेंटिना

♻सँतिएगोमधील स्टाडिओ नॅशनल मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान चिलीला प्रथमच विजेतेपदावर आपले नाव कोरण्यात यश आले.

♻अर्सेनल क्लबकडून खेळणारा चिलीचा खेळाडू ऍलेक्सिस सँचेझ याने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर विजयावर शिक्कामोर्तब केले.

♻सामन्याच्या निर्धारित व भरपाई वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. त्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला.

संयुक्त राष्ट्र संघाचा(यूएन) अहवाल:-

♻ जागतिक स्तरावर गरिबीचे प्रमाण कमी करण्यात भारत आणि चीन यांची मध्यवर्ती भूमिका असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

♻ १९९० पासून जगभरातील एक अब्जहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

♻ दारिद्य्र रेषेखालील जगातील नागरिकांचे प्रमाण १९९० मधील ३६ टक्यां्य  वरून २०१५ मध्ये १२ टक्यांय्  वर आले आहे. आफ्रिकेतील काही देश वगळता इतर सर्व देशांना त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आल्याचे अहवाल सांगतो.

♻ जगातील सर्वांत अधिक लोकसंख्या असलेले चीन आणि भारत यांची गरिबी कमी करण्यातील भूमिका मध्यवर्ती ठरल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

♻ १९९० नंतर चीनने मोठी प्रगती केल्याने पूर्व आशियामधील अत्यंत गरिबीचे प्रमाण ६१ टक्यांती  वरून फक्त चार टक्यांय   वर आले आहे. तसेच, भारतानेही प्रगती केल्याने दक्षिण आशियामधील अत्यंत गरिबीचे प्रमाण ५२ टक्यांवरून १७ टक्यांमा  वर आले असल्याचे अहवालात म्हटले आहे

सार्वजनिक शौचालये उभारण्यात दिल्ली सर्वांत पुढे..

♻  सार्वजनिक शौचालयांची उभारणी या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या उपक्रमात राजधानी दिल्ली सर्वांत पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.

♻  घरोघरी शौचालये उभारणीमध्ये गुजरात सर्वांत पुढे आहे.
  
♻  दिल्लीमध्ये  5776, छत्तीसगढमध्ये 3,570, महाराष्ट्रामध्ये 2,520, कर्नाटकमध्ये 1680 शौचालये उभारली आहेत.
  
♻   देशात 2019 पर्यंत एक कोटी शौचालये उभारण्यासाठी देशभरातील केंद्रशासित प्रदेशांसह राज्यांकडून एकूण 30 लाख 41 हजार 97 खाजगी शौचालये उभारण्यासाठी अर्ज आले होते. त्यापैकी 13 लाख 64 हजार 814 शौचालयांच्या उभारणीसाठी नगर विकास मंत्रालयाने मान्यता दिली.

No comments:

Post a Comment