Bookmark

Bookmark this Blog

Tuesday, July 7, 2015

ब्ल्यु मॅारमॅानबद्दल अधिक माहिती

ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून
घोषित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला..
=================================
.
* देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले
* राज्य शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून
राज्य प्राणी:- शेकरू,
राज्य पक्षी :-हरियल,
राज्य वृक्ष:- आंबा
राज्य फुल:- जारूल घोषित केले आहे
* असे आहे 'ब्लू मॉरमॉन':-
■ शास्त्रीय नाव : पॅपिलिओ पॉली मेलेस्टॉर
■ आकारमानात सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतरचे सर्वात मोठे
फुलपाखरू
■ मुख्य रंग काळा; मात्र पंखांवर निळसर झाक
■ पंखांवर पांढर्या रंगाच्या ठिपक्यांचा पट्टा
■ पंखांचा आवाका : १२0 ते १५0 मिलीमीटर
■ समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीपर्यंतच्या जंगलांमध्येही
बागडते
■ एक्झोरा, घाणेरी, पेंटास यासारख्या गुच्छाने येणार्या फुलांवर अधिक
दिसते
■ लिंबूवर्गीय झाडांवर अंडी घालते
■ महाराष्ट्रातील गावागावात मोठय़ा संख्येने आढळते
■ दक्षिण, मध्य भारत, सिक्कीम, बिहार, पश्चिम बंगालमध्ये पाहायला
मिळते
■ भारताव्यतिरिक्त म्यानमार आणि श्रीलंकेत वावर...

No comments:

Post a Comment