#चालू घडामोडी:-मार्च २०१५
०१)गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या गोवंशहत्या बंदी (महाराष्ट्र प्राणीरक्षण दुरुस्ती) विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी संमतीची मोहोर उमटवली?
== ०२ मार्च २०१५
(कलम २०१अन्वये)२६ फेब्रुवारी रोजीच या विधेयकाला संमती दिली.
०२)गोहत्या बंदी विधेयक:-
>गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी
>गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार
>गोहत्या करणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद
>आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपींवर
०३) तक्रारीसाठी रेल्वेचे नवीन अॅप व साइट
>वेबसाइट : www.indianrailways.gov.in.
>मोबाइल अॅप www.coms.indianrailways.gov.in.या वेबपेजवरून डाऊनलोड करता येईल.
>एसएमएस क्रमांक- - ९७१७६३०९८२
०४) काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष:-
>प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
>मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम
०५) देशात १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीसंदर्भातील एका खटल्यात काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या विरोधात कोणत्या कोर्टाने अब्रूनुकसानीचा आरोप निश्चित केला असून, त्यावरील सुनावणी सुरू झाली आहे?
== दिल्ली कोर्ट )ज्येष्ठ वकील एच. एस. फूलका यांच्यावर केलेल्या कथित आरोपांमुळे)
>भारतीय दंडविधानाच्या कलम ४९९, ५००अन्वये ही बाब शिक्षेस पात्र आहे.
०६) देशातील १०१ जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्गांचा (नॅशनल वॉटरवेज) दर्जा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत असून यासाठी या नव्या जलमार्गांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी कशाची नेमणूक करण्यात आली आहे?
== इनलँड वॉटरवेज ऑथोरिटी ऑफ इंडिया
०७) जम्मू-काश्मीरमध्ये ४९ दिवसांची राज्यपालांची राजवट अखेर संपुष्टात येऊन पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) नेते असलेल्या कोणत्या नेत्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली?
== मुफ्ती महंमद सईद
>१९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री
>जम्मू-काश्मीरचे बारावे मुख्यमंत्री
>जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा
>शपथविधी:- झोरावार स्टेडियममध्ये
०८) १९९९ मध्ये स्थापन झालेल्या 'जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी'चे संस्थापक कोण आहेत?
== मुफ्ती महंमद सईद
०९) सुप्रीम कोर्टाचा निर्णय:-
>काही विशेष आणि समर्थनीय कारणे असली, तर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या गुन्हेगाराची शिक्षा कमी केली जाऊ शकते.
>भारतीय दंडविधान कलम ३७६ (२) (जी) नुसार
१०) 'पीएमओ'चे मोबाइल अॅप विकसित करण्यासाठी कोणत्या वेबसाइटवर नागरिकांकडून कल्पना मागवण्यात येणार असून, त्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे?
== mygov.in
-Vishal Bhosale
Visit -
www.mahampsc.tk
No comments:
Post a Comment