Bookmark

Bookmark this Blog

Sunday, March 1, 2015

Budget 2015

बजेट
1. इन्कम टॅक्स 'जैसे थे'... स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत.
2. गुटखा, सिगारेट, मोबाइल, घरं महागणार.
3. आरोग्य विम्यावरील सवलतीची सीमा १५ हजारावरून २५ हजारांवर, वरिष्ठ नागरिकांसाठी ३० हजार रुपयांवर.
4. एक लाख रुपयांच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड देणं बंधनकारक... आजवर ५० हजारांच्या व्यवहारासाठी द्यावं लागत होतं पॅनकार्ड.
5. हॉटेलिंग, फोन बिलसारख्या अनेक गोष्टी महागणार.
6. सेवाकर १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर.
7. श्रीमंतांसाठी करात वाढ केली जाणार... १ कोटींहून अधिक उत्पन्नावर २ टक्के अधिभार.
8. काळा पैसा परदेशात लपवल्यास सात वर्षांची शिक्षा होणार... इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सांगावी लागणार परदेशातील संपत्ती.
9. पुढच्या चार वर्षांसाठी कॉर्पोरेट करात पाच टक्क्यांची घट.
10. उत्पन्न लपवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास आणि ३०० टक्के दंडाची तरतूद.
11. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखच राहणार.
12. कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात.... ३५ वरून २५ टक्क्यांवर आणणार कॉर्पोरेट टॅक्स.
13. नमामि गंगे मोहिमेसाठी ४ हजार ७१ कोटींची तरतूद.
14. सिंगापूरप्रमाणे गुजरातमध्ये नवं वित्तीय केंद्र बनवणार.
15. पर्यटनवृद्धीसाठी एलिफंटा गुंफासाठीही मोठी तरतूद.
16. महाराष्ट्रात नव्या औषधनिर्माण संस्थेची घोषणा.
17. योजना खर्च ४ लाख ६६ हजार ७७ कोटी.
18. आरोग्य विभागासाठी ३३,१५२ कोटी रुपयांची तरतूद.
19. काळा पैसा रोखण्यासाठी रोख व्यवहार कमी करणार.
20. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणार.
21. सरकारी खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी विशिष्ट प्रणाली बनवणार.
22. बिहार आणि पश्चिम बंगालला अतिरिक्त मदतीची घोषणा.
23. जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेशात आयआयएम.
24. प्रत्येक कुटुंबासाठी घर, ग्रामीण भागात २ कोटी घरे बांधणार .
25. महिला सुरक्षा- निर्भया फंडासाठी एक हजार कोटींची तरतूद.
26. देशात २५ जागतिक वारसा वास्तू आहेत... त्यांच्या जीर्णोद्धारासाठी निधी देणार..
27. अशोकचक्राची मुद्रा असलेली सोन्याची नाणी सरकार बाजारात आणणार.
28. गोल्ड अकाउंटमधील सोन्यावर मिळणार व्याज... गोल्ड बाँडही येणार.
29. ईपीएफमध्ये कर्मचाऱ्यांना ईपीएफ किंवा एनपीसी निवडण्याची मुभा मिळणार.
30. आंतरराष्ट्रीय स्तरावरील करप्रणाली देशात लागू करण्याचा सरकारचा विचार .
31. पीएम कृषि सिंचन योजनेसाठी ३ हजार कोटी अधिक देणार.
32. आयटी उद्योगासाठी सेतू नावाची योजना... १००० कोटींचा निधी देणार.
33. देशभरात पाच नवे अल्ट्रा मेगा वीज प्रकल्प सुरू करणार... पाच हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार.
34. ई-बिझनेस पोर्टल सुरू होणार... परवानग्यांसाठी भटकावं लागणार नाही.
35. जास्त कर मिळाल्यास मनरेगासाठी पाच हजार कोटी आणखी देणार.
36. २० हजार कोटींच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा... रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडासाठी १५० कोटी..
37. रेल्वे आणि रस्तेविकासासाठीही करमुक्त बाँड्स आणणार.
38. गरिबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी तीन योजना... अटल पेन्शन योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, ज्योती ईपीएफ योजना.
39. करमुक्त इन्फ्रा बाँड्स सुरू करणार.
40. अटल पेन्शन योजनाही लवकरच... एक हजार रुपये सरकार देणार, एक हजार रुपये व्यक्तीचा वाटा .
41. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करणार... दरवर्षी १२ रुपये हप्ता, दुर्घटनेनंतर २ लाखांचा परतावा मिळणार.
42. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी ८.५ लाख कोटींची तरतूद .
43. मनरेगासाठी ३४,६०० कोटी रुपयांची तरतूद, तर ग्रामीण विकास निधीला २५ हजार कोटी देण्याची तरतूद.
44. श्रीमंत लोक गॅस सबसिडी घेणं बंद करतील, अशी आशा आहे... सबसिडी गरजवंताना देण्यावर भर राहील.
45. पुढच्या वर्षी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणार.
46. २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला रोजगार देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
47. २० हजार गावांपर्यंत वीज पोहोचवायची आहे .
48. जनधन मोबाइल योजनेचा उपयोग जनतेपर्यंत सबसिडी पोहोचवण्यासाठी केला जाईल.
49. शहरी भागात दोन कोटी, ग्रामीण भागात चार कोटी घरं देण्याचं लक्ष्य.
50. २०२२ पर्यंत देशातील गरिबी हटवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य.
51. देशभरात सहा कोटी शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट.
52. जीएसटी १ एप्रिल २०१६ ला लागू होणार.
53. एक हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे चामड्याचे शूज स्वस्त.
54. पेन्शन फंडावरील करसवलत १ लाखावरून १.५ लाखांपर्यंत वाढवली.
55. १६०० रुपयांपर्यंतचा प्रवासीभत्ता करमुक्त.
56. संरक्षण क्षेत्रासाठी २,४६,७२७ कोटींची तरतूद.

No comments:

Post a Comment