अतिसंभाव्य १०० प्रश्नोत्तरे:-चालू घडामोडी:-मार्च २०१५
०१) मध्य इंडोनेशियातील कोणत्या बेटांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे?
== सुलावेसी बेटांना
०२) क्रिकेट विश्वयकरंडक २०१५ च्या बाद फेरीत पोहचू न शकलेले पाच सहयोगी संघ कोणते?
== आयर्लंड, स्कॉटलंड, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि अफगाणिस्तान
>मान्यताप्राप्त संघ:-इंग्लंड आणि झिंबाब्वे देखील अपात्र
०३) अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेल्या "जातपंचायत मूठमाती‘ अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत वैदू समाजाने जातपंचायती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.अखिल भारतीय वैदू समाजाचे राज्य अध्यक्ष कोण आहेत?
== श्यांमलिंग शिंदे
०४) क्रिकेट विश्विकरंडक २०१५ उपांत्यपूर्व लढती
>श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (१८ मार्च, सिडनी)
>भारत विरुद्ध बांगलादेश (१९ मार्च, मेलबर्न)
>ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (२० मार्च, ऍडलेड)
>न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडीज (२१ मार्च, वेलिंग्टन)
०५) ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे माजी माध्यम सल्लागार लेन्स प्राइस यांचे नवीन पुस्तक
== "दी मोदी इफेक्टच : इनसाइड नरेंद्र मोदीज कॅम्पेन टू ट्रान्सफॉर्म इंडिया‘
भारतामध्ये "हॅशेट‘ या प्रकाशन संस्थेचे
०६) लोकसभा निवडणुकांच्या आधी इतर मागास वर्गीयांमध्ये (ओबीसी) कोणत्या समाजाला आरक्षण देण्याचा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च
न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे?
== जाट
>न्यायाधीश रंजन गोगोई व न्यायाधीश रोहिंटन फली नरीमन
०७) बिहार, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्ली अशा एकूण नऊ राज्यांमध्ये पसरलेल्या जाट समाजाची लोकसंख्या सुमारे नऊ कोटी इतकी असून यूपीए सरकारने कधी अधिसूचना काढून जाट समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता?
== ४ मार्च २०१४ ला
०८) वृद्ध व अपंग गायींच्या रक्षणासाठी राज्यात कोणती योजना राबविण्यात येणार आहे?
== गोग्राम योजना
०९) महाराष्ट्र राज्यापाठोपाठ कोणत्या राज्यातही गोवंश हत्या बंदी विधेयक मंजुर करण्यात आले असून गोवंश हत्या केल्यास आजामीन गुन्हा ठरणार आहे?
== हरियाणा
१०) विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव:-
>इतिहासातील पहिलीच घटना
>भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १८३(ग) व महाराष्ट्र विधान परिषद नियम ११ अन्वये अविश्वास ठराव मांडता येतो.
>असा ठराव आल्यानंतर त्यावरील चर्चेसाठी किमान १४ दिवस जावे लागतात
>प्रस्ताव चर्चेला आणण्यासाठी किमान १० सदस्यांची आवश्यकता असते.एकूण २४ सदस्यांनी मांडला
>अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी किमान ४० मतांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात ठरावाच्या बाजूने ४५ मते पडलीत.
११) यशवंत पंचायतराज अभियान राज्यस्तर पारितोषिके:-
>कोल्हापूर, नाशिक आणि सिंधुदुर्ग
>पंचायत समिती रेणापूर (जि. लातूर), देवगड (जि. सिंधुदुर्ग), कागल (जि. कोल्हापूर)
>मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहमदनगर), परुळेबाजार (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग), चांदोरे (ता. माणगाव, जि. रायगड) आणि झरी (ता. लोहा, जि. नांदेड)
१२) दिनांक ७ व ८ मार्च २०१५ रोजी १६ वी महाराष्ट्र सिंचन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
== नेरे,ता.मुळशी,जि.पुणे
१३) केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी किती कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चाच्या ६२ सरकारी प्रकल्पांवरील टोल नाके बंद होतील.अशी घोषणा केली आहे?
== १०० कोटी रुपयांपेक्षा कमी
१४) खंडणी, खून, अपहरण आदी गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) गवळी सेनेचा अध्यक्ष माजी आमदार यास नुकतेच कोणत्या कारागृहात हलविण्यात आले आहे?
== नागपूर मध्यवर्ती कारागृह(अंडासेल)
१५) पोलंडच्या संघाला ३-१ असे पराभूत करून हॉकी वर्ल्ड लीगमधील (एचडब्लूएल) दुसरी फेरीतील विजेतेपद पटकाविणारा संघ कोणता?
== भारत
१६) गेल्या वर्षी(२०१४ ) मध्ये विनयभंग व बलात्काराबाबतच्या तक्रारीत पहिल्या क्रमांकावर असणारे राज्य कोणते?
== महाराष्ट्र((१३,८२७),
मध्य प्रदेश (१३,३२३) व आंध्र प्रदेश (१३,२६७)
१७) गोड गोजिरी लाज लाजरी‘, "परिकथेतील राजकुमारा‘, "मैनाराणी चतुर शहाणी.इत्यादी गीतांना सुमधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या कोणत्या ज्येष्ठ गायिकेचे नुकतेच निधन झाले आहे?
== कृष्णा कल्ले
१८) महात्मा गांधी यांनी १९२० मध्ये गुजरात विद्यापीठाची स्थापना केली होती. या विद्यापीठाचे जुलै २००७ ते मार्च २०१५ पर्यंत कुलगुरू असलेल्या कोणत्या ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि गांधी तत्त्वज्ञानाचे उपासक असलेल्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== नारायणभाई देसाई
१९) जम्मू-काश्मीरच्या ऍडव्होकेट जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ रियाझ अहमद जान
२०) हरियानातील हिस्सार येथील कोणात्या गावात बांधकाम सुरू असलेल्या एका चर्चवर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटनेमुळे ते गाव चर्चेत आले आहे?
== केमरी
२१) राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये २०११ मध्ये सुरू केलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच "एक प्रभाग-एक नगरसेवक‘ ही पद्धत सुरू करणारे विधेयक विधानसभेत कधी मंजूर करण्यात आले?
== १९ मार्च २०१५
२२) फॉर्म्युला वनमधील माजी विश्वविजेता असलेल्या कोणत्या खेळाडूचा मुलगा याच्या मोटारीला अपघात झाल्यामुळे जखमी झाला आहे?
== मायकल शूमाकर- मुलगा मिक शुमाकर
२३) दक्षिण मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर परिसराचे अर्थात चौपाटीचे कोणते नवीन नामकरण करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षप्रणित राज्य सरकारने केली आहे?
== स्वराज्य भूमी
२४)बहुचर्चित स्थानिक संस्था कर (एलबीटी) कधीपासून रद्द होणार आहे?
== ०१ ऑगस्ट २०१५
२५)ट्युनिशियाची राजधानी असणाऱ्या कोणत्या शहरातील बार्डो संग्रहालयावर दहशतवाद्यांनी हल्ल्या केला होता?
== ट्युनिस
Free job Alert App https://play.google.com/store/apps/details?id=com.mahanaukri
२६) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१५-१६ तरतूद:-
जलसंपदा (७६१९ कोटी),रस्ते आणि पूल (४३०९ कोटी),पर्यटन (४०५ कोटी),
स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज संस्था (२३२७ कोटी),कृषी (४७०० कोटी),ग्रामविकास (१६०५ कोटी), पाटबंधारे (७६१९ कोटी), वाहतूक (६८७६ कोटी), उद्योग (४०३ कोटी), ऊर्जा (३७२६ कोटी), सामाजिक क्षेत्र (२३४८ कोटी), सार्वजनिक सेवा (४११० कोटी), सर्वसाधारण आर्थिक सेवा (४११० कोटी), विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण (६७ कोटी)
२७) महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१५-१६ विविध योजना:-
>श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना
>पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसाहय योजना
>मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी योजना
>उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती योजना
>प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना
२८) श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना:-
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने ‘श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास’ योजनेची घोषणा करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत लोकसहभागातून वन वृक्षाच्छादन वाढविणे, वृक्षसंपत्तीचे व्यवस्थापन करणे; तसेच राज्याच्या ग्रामविकास, आदिवासी विकास व जलसंधारण विभागांच्या योजना एकात्मिक पद्धतीने राबविली जाणार आहे.
२९) पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसाहय योजना:-
जनसंघाचे माजी अध्यक्ष आणि नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने घरकुल जागा अर्थसाहय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाला निवारा देण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यामध्ये सद्यस्थितीत दारिद्य्र रेषेखालील स्वत:ची जागा नसलेले २ लाखांपेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत; परंतु स्वत:ची जागा नसल्यामुळे त्यांना घरकूल योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा लाभार्थ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत स्वत:ची जागा खरेदी करण्याकरिता आर्थिक साह्य देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
३०) मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी योजना:-
जनसंघाचे धुळ्यातील कार्यकर्ते असलेले मोतीरामजी लहाने यांच्या नावाने ‘कृषी समृद्धी योजना’ सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ही योजना असेल. कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी क्षेत्रातील अन्य योजनांचे एकत्रीकरण या माध्यमातून शेतीची उत्पादतकता वाढविण्यावर भर देण्यात येणारा आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
३१) उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती योजना :-
उत्तमराव पाटील, जनसंघ नेते आणि भाजपचे १९८० ते ८५ महाराष्ट्राचे पहिले अध्यक्ष उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती.सामाजिक वनीकरणामार्फत प्रत्येक जिल्ह्यात उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. अशा उद्यानात वनीकरण; तसेच सर्व प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्या येणार आहे. त्यामध्ये निसर्ग परिचय केंद्र, वन व पर्यावरण शिक्षण केंद्र यांचाही समावेश असणार आहे. त्यासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
३२) प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना
राज्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार साह्याच्या काही योजना आहेत. त्यांना एका छताखाली आणून ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना’ सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत तरुणांना ते करत असलेल्या किंवा त्यांचा कल असलेल्या रोजगारासाठी प्रशिक्षण; तसेच स्वयंरोजगारासाठी दरवर्षी पाच लाख युवकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊन ७५ टक्के आश्वासित नोकरी मिळेल, असे नियोजन केले जाणार आहे.
३३) महिला बचत गटांना जिल्हास्तरावर कायमस्वरूपी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ’ निर्माण करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासाठी किती कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
== २०० कोटी
*माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी २०० कोटी
३४) संचालक मंडळाच्या निवडीदरम्यान केंद्रीय मनुष्यबळ संसाधन मंत्रालयाशी मतभेद निर्माण झाल्याने कोणी नुकताच मुंबईतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे?
== अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर
३५) भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आएएस) कोणत्या अधिकार्याचा अलिकडेच संशयास्पद मृत्यु झाला आहे?
== डी.के. रवी
३६) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अन्वये शिक्षापत्रिकेमध्ये कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिलेचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून नोंदविण्याची तरतूद करण्यात आली आहे.तसेच केवळ ज्या कुटुंबामध्ये एकही महिला सदस्य नाही,अशाच कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्याला कुटुंबप्रमुख म्हणून नाव नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे.परंतु यास विरोध दर्शवित विरोध दर्शविला असून महिलेला कुटुंब प्रमुख करण्याचा निर्णय भारतीय संस्कृतीसह इस्लाममधील कायद्याच्या विरूद्ध असल्याचे म्हटले आहे?
== बरेलीतील दर्गा अल हजरत
३७) इस्राईलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कोणत्या पक्षाने स्पष्ट बहुमत विरोधी झिओनिस्ट युनियन आघाडीचा पराभव केला आहे?
== लिकुड पक्ष
३८) विश्वकरंडक स्पर्धांमध्ये हॅट्ट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू कोण?
== जेपी ड्युमिनी
विकेट्स:-एंजेलो मॅथ्यूज-नुआन कुलसेखरा-थिरिंदू कौशल
३९) रेल्वे विषयक घडामोडी:-
>एक एप्रिलपासून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पाच ऐवजी दहा रुपयांना
>एक एप्रिलपासून प्रवासी 60 दिवसांऐवजी 120 दिवस आधी रेल्वेचे आरक्षण करू शकणार
४०)सॅनिटेशन चॅरिटी वॉटरएड‘ आणि जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल:-
*विषय:-विकसनशील देशांतील स्वच्छता
>केवळ अस्वच्छतेमुळे या देशांमध्ये दरवर्षी पाच लाख नवजात अर्भकांचा मृत्यू.
>एक तृतीयांश रुग्णालयांमध्ये एकतर पुरेसे कर्मचारी नाहीत.
>बहुतांश रुग्णांना हात धुण्यासाठी साबणही मिळत नाही.
>तब्बल ४० टक्के रुग्णालयांना पाण्याचा वेगळा स्रोतच उपलब्ध नाही.
>डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, हैती, मलावी, टांझानिया आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय
>बार्बरा फ्रॉस्ट, "वॉटरएड‘च्या कार्यकारी प्रमुख.
४१) मलेरिया ग्रस्त देश ही ओळख बदलून सिंगापूरला आशिया खंडातील एक समृध्द देश बनवणारे सिंगापूरचे पहिले पंतप्रधान असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== ली कुआन यू-१९५९ साली पहिल्यांदा सिंगापूरचे पंतप्रधान.
४२)भारतीय जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांना,ग्रामीण भागात त्यांनी पाण्याच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या पुरस्कार जाहीर झाला आहे?
== स्टॉकहोम वॉटर-पाणी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार
>एनजीओ:-तरुण भारत संघ
>२००१-मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार
४३) इंग्लंडच्या संसदेच्या परिसरात पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेले एकमेव भारतीय व्यक्ती कोण ठरले आहेत?
== म.गांधी
>पुतळ्याचे अनावरण:- इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
>पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या शेजारी गांधी यांचा पुतळा आहे
>नऊ फूट उंच ब्राँझ धातूचा
४४) २०१२मध्ये अब्दुल्ला मोहम्मद या न्यायाधीशांना अटक केल्या प्रकऱणी मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांना किती वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे?
== १३ वर्षे
४५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रीलंका दौरा:-
>१९८७ नंतर भारताच्या पंतप्रधानांनी श्रीलंकेला दिलेली ही पहिली भेट
>पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
>भारत-श्रीलंकेदरम्यान विसा, सीमाशुल्क, युवा विकास आणि श्रीलंकेमध्ये रविंद्रनाथ टागोर स्मारक बांधणे यासंबंधित चार करारांवर स्वाक्ष-या
>त्रिनाकोमालीला पेट्रोलियम हब बनवण्यासाठी सहकार्य करण्यास भारत तयार
>श्रीलंकेतील रेल्वे क्षेत्रासाठी ३१ कोटी आठ लाख अमेरिकन डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा
४६) मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लख्वीला झालेली अटक बेकायदा असून, त्याची तात्काळ सुटका करा, असा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने दिला होता?
== इस्लामाबाद उच्च न्यायालय
४७) अर्थजगत:-
>राज्यांमध्ये असलेल्या व्यवसाय-सुलभतेनुसार राज्यांना मानांकन देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.
निकष:-व्यवसाय निर्मिती, जमीन आणि आस्थापना, पर्यावरणीय मंजुऱ्या, कामगार, पायाभूत सुविधा, वित्त आणि कर, सुधारणा आणि कंत्राटांची अंमलबजावणी आणि सध्याचे व्यवसाय
४८) जागतिक बँकेच्या अहवालानुसार, व्यवसाय-सुलभतेच्या बाबतीत १८९ देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे.
== १४२व्या
४९) सुमारे १२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात मोबाईल फोन सेवाधारकांची संख्या किती कोटींवर गेली आहे. तसेच इंटरनेट कनेक्शन ३० कोटींवर गेले आहे?
== ९५.५ कोटींवर
५०) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने (आईसीडी) चा अंदाज;-
>२०१५मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा ७.७ टक्क्यांनी विकास होईल,
>तर २०१६मध्ये हा दर ८ टक्क्यांवर
५१) सायबरमेडिया रिसर्चच्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारीत कोणत्या कंपनीने फोर-जी फोनच्या बाजारपेठेत ३०.८ टक्के हिस्सा मिळवत अॅपलला मागे टाकले आहे?
== झिओमी (Xiaomi)
५२) मतदारांची बायोमॅट्रिक माहिती असलेला भारत हा जगातील कितवा देश बनेल?
== पहिला
५३) काळ्या पैशासंबंधीचे विधेयक:-
>२० मार्च २०१५ ला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केले
>परदेशात काळा पैसा दडवणा-यांवर कायदेशीर कारवाईच्या कडक उपाययोजना असून यात तीन ते १० वर्षापर्यंत तुरुंगवास आणि २५ लाख ते एक कोटी रुपये दंडाची तरतूद
>बेनामी परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता (नवीन कर तरतूद) विधेयक, २०१५ यामध्ये ज्यांच्याकडे परदेशी मालमत्ता आहे अशांना पहिल्या वेळेस तीन ते १० वर्षाची शिक्षा किंवा कर आणि दंड भरून कायदेशीर कारवाईतून सुटण्याचा मार्गही सुचवण्यात आलेला आहे.
>हे विधेयक मंजूर झाल्यास हा कायदा एक एप्रिल २०१६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
५४) पश्चिम बंगालमधील कोट्यावधींच्या शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने कोणते अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार यांना समन्स बजावले आहेत?
== मिथुन चक्रवर्ती
५५) जबलपूर-निझामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये लुटीमुळे चर्चेत आलेले मध्यप्रदेशचे अर्थमंत्री कोण?
== जयंत मालवीय
५६) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पश्चिम बंगाल सरकारला कोणत्या प्रकरणी नोटीस बजावली आहे?
== कोलकातामध्ये ननवर सामूहिक बलात्कार प्रकरणी
५७) ‘मी ओबीसी बोलतोय या पुस्तकाचे लेखक,‘भावसार जागृती’ नावाचे मासिक व ‘चलो बुद्ध की ओर’ हा कार्यक्रम हाती घेणार्या कोणत्या ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ नेत्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== हनुमंत उपरे
५८) घुमान(८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान, जि. गुरदासपूर (पंजाब) ३, ४ व ५ एप्रिल २०१५) येथे होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून निघणा-या रेल्वेच्या किती डब्यांना मराठी साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्षांची नावे देण्यात येणार आहेत?
== ३६
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ह. ना. आपटे, वि. दा. सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, आ. रा. देशपांडे (कवी अनिल), वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, शंकरराव खरात, दया पवार, नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, विंदा करंदीकर, केशव मेश्राम, विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकर्णी, अण्णा भाऊ साठे, इंदिरा संत, बहिणाबाई चौधरी, ग्रेस, शिवाजी सावंत, सुरेश भट, बाबूराव बागूल, बा. भ. बोरकर, विभावरी शिरूरकर, बाबा कदम, हमिद दलवाई आणि नामदेव ढसाळ
५९) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंड संघातून वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून कोणाचा संघात समावेश करण्यात आला आहे?
== मॅट हेनरी
६०) इराणी करंडक २०१५
विजेते:-कर्नाटक उपविजेते:- शेष भारत
>मुंबईनंतर (मुंबईने तीनवेळा इराणी करंडक राखण्याची कामगिरी केली आहे) इराणी करंडकाचे जेतेपद राखणारा कर्नाटक हा पहिलाच संघ
>देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग दुस-या वर्षी तीन मोठया स्पर्धा (रणजी, इराणी आणि विजय हजारे चषक) जिंकल्या.
>सामनावीर - मनीष पांडे
६१) विश्वचषकातील उपांत्यपूर्वफेरीत बांगलादेशवर मिळालेल्या विजयासोबतच महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला कितवा विजय मिळवून देण्याचा नवा विक्रम केला आहे?
== १००वा
>१७८ एकदिवसीय सामन्यांमध्ये
>पहिला बिगर ऑस्ट्रेलियन कर्णधार
>आयसीसीच्या टी२० विश्वचषक(२००७), विश्वचषक (२०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी(२०१३) या तीनही स्पर्धांचे जेतेपद पटकावणारा पहिला कर्णधार
६२) पश्चिम घाटावरील अभ्यासासाठी कोणत्या जेष्ठ पर्यावरणतज्ञाला टायलर पुरस्कार जाहीर झाला आहे?
== ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ
६३) इंडियन वेल्स ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?
== सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस
>२०११मध्ये सानियाने एलेना व्हेसनिनाच्या साथीत विजेतेपद पटकावले होते.
>उपविजेते:- एकतेरीना माकारोवा आणि एलेना व्हेसनिना(रशिया)
>सानियाचे हे महिला दुहेरीच्या कारकिर्दीतीली चोवीसावे विजेतेपद
६४) शिर्डीत तिरूपती देवस्थानप्रमाणे पेड दर्शन सुरू होणार असून कधीपासून व्हीआयपी दर्शन बंद होणार आहे?
== १ एप्रिल २०१५
६५) डाव्या पायाची शेवटची केवळ दोन बोटे शिल्लक असल्यामुळे 'मार्टी टू टोज' या नावाने ओळखला जाणारा क्रिकेटपटू कोण?
== मार्टिन गप्टिल
६६) बीसीसीआयच्या प्रमुख वकील म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== उषानाथ बॅनर्जी
६७) उमेद भवन येथे ख्रिस्टिज या संस्थेने आयोजित केलेल्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने २०० व्या कसोटी सामन्यात वापरलेल्या जर्सीला सर्वाधिक सहा लाख रुपयांची बोली कोणी लावली?
== जोधपूरचे आधीचे राजे गजसिंह दुसरे यांचा मुलगा राजपुत्र शिवराजसिंह
६८) केंद्र सरकारच्या बहुचर्चित कोणत्या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भांडवल बाजार नियामक संस्था 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया'ने ('सेबी') 'म्युनिसिपल बाँड' शेअर बाजारात खरेदी-विक्रीसाठी ठेवण्यास अखेर परवानगी दिली?
== स्मार्ट सिटीज
>हे रोखे 'म्युनि बाँड' म्हणूनही ओळखले जाणार आहेत.
>'सेबी'चे अध्यक्ष यु. के. सिन्हा
६९) 'वर्ल्ड स्टील असोसिएशन'ने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचा 'स्टील प्रोड्युसर' देश कोणता?
==भारत
>चीन व जपान हे जगात पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांवर
७०) केंद्र सरकारच्या ५५ उपक्रमांची परीक्षा करण्यात आली असून पैकी ४६ कंपन्यांचे पुनरुज्जीवन/पुनर्रचना करण्यास आणि किती कंपन्या बंद करण्यास मंजुरी दिली आहे?
== ९
>भारत ऑप्थॅल्मिक ग्लास व भारत यंत्र निगम या दोन कंपन्यांनी आपले कारखाने आधीच बंद केले
>एचएमटी बेअरिंग्ज, तुंगभद्रा स्टील प्रॉडक्ट्स, हिंदुस्तान फोटो फिल्म्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, एचएमटी वॉचेस, एचएमटी चिनार वॉचेस, हिंदुस्तान केबल्स आणि स्पायसेस ट्रेडिंग कॉर्पोरेशन लि.या सरकारी कंपन्या बंद करण्यात येणार आहे.
७१) जर्मन सरकारचे अर्थसाह्य लाभलेल्या डेव्हलपमेंट बँकेने देशातील विद्युत वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी किती अब्ज युरोची मदत करण्याची तयारी दर्शवली आहे?
== एक अब्ज युरो
७२) जर्मनीतील जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ‘हॅनोव्हर फेअर’ या उद्योग व्यापार जत्रेचे उद्घघाटन येत्या १२ एप्रिल रोजी संयुक्तपणे कोण करणार आहेत?
== पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल
७३) आईचे दूध पिणारी मुले भविष्यात अधिक बुद्धिमान व समृद्ध होतात, असा निष्कर्ष ब्रिटनमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनातून पुढे आला आहे.हे संशोधन कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे?
== द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ
== डॉ. बर्नार्डो लिझा हॉर्टा, मुख्य संशोधक, पिलोटस युनिव्हर्सिटी
७४) स्वादुपिंडाच्या कॅन्सरबाबत बहुमोल संशोधनासाठी २०१५ वर्षासाठीच्या 'न्यू साऊथ वेल्स वुमन' या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे?
== ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक मिनोती आपटे
>२०१४:- 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल'
७५) फेलो ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजी हृदयरोग क्षेत्रातील जगातील सर्वोत्तम सन्मानाने सन्मानित करण्यात येणार असलेले प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ कोण?
== डॉ. विजय सुरासे
Free job Alert App https://play.google.com/store/apps/details?id=com.mahanaukri
७६) गुरू ग्रहावरील कोणत्या चंद्रावर समुद्र असल्याचे पुरावे नासा'च्या हम्बल स्पेस टेलिस्कोपने दिले आहेत?
== गेनीमेड
७७) अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या 'इंटेल सायन्स टॅलेट २०१५' या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये कोणत्या तिघा भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले?
== सरन प्रेमबाबू,शाश्वत किशोर आणि अन्विता गुप्ता
७८) न्यायमूर्ती ई. पद्मनाभन समिती:-
>घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-१चे भाडे निश्चित करण्यासाठी
>न्यायमूर्ती ई. पद्मनाभन मद्रास हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती
सदस्य:- लोकसभेचे माजी सरचिटणीस टी. के. विश्वनाथन तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया
७९) सुप्रिसद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा 'यांच्याअगोदर पाण्याचं नोबेल' अशी ख्याती असलेला 'स्टॉकहोम वॉटर प्राइज' हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे?(भारतीय)
== जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे आणि बिंदेश्वर पाठक (सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक)
८०) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 'कायाकल्प' परिषदेची स्थापना केली असून तिचं अध्यक्षपद कोण सांभाळणार आहे?
== रतन टाटा
८१) पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभाला कोण उपस्थित होते?
== भारताचे माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग आणि कॉंग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर
>पाकचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बसीत
>काश्मीरमधील फुटीरवादी नेता मसरत अलम गैरहजर
८२) पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा "पुण्यभूषण पुरस्कार‘ कोणास जाहीर झाला आहे?
== प्रतापराव पवार
८३) भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार या वर्षी कोणास जाहीर झाला आहे?
== ज्येष्ठ अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक शशी कपूर
८४) हिंदी चित्रपटसृष्टीतील "प्रथम परिवार‘ मानल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबाला तिसऱ्यांदा दादासाहेब फाळके पुरस्काराचा मान मिळाला आहे.शशी कपूर यांच्याअगोदर कपूर परिवारातील कोणत्या सदस्यांना हा पुरस्कार मिळाला आहे?
== पृथ्वीराज कपूर (१९७१), राज कपूर(१९८७)
८५) दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी:-
२०१०-के. भालचंदर-दिग्दर्शक
२०११-सौमित्र चॅटर्जी-अभिनेता
२०१२-प्राण-अभिनेता
२०१३-गुलझार-गीतकार
२०१४-शशी कपूर-अभिनेता
८६) प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत असलेल्या वादाबाबत भारत आणि चीनदरम्यान चर्चेची १८वी फेरी कधी होणार आहे?
== २३ मार्च २०१५
सहभाग:-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जैची
८७) विधानसभा उपाध्यक्ष गजानन गरुड यांच्यावर कधी अविश्वास ठराव मंजूर झाला होता?
== ५ एप्रिल १९७९
८८) "वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रीपोर्ट:-संयुक्त राष्ट्र
>जगाची लोकसंख्या २०५० पर्यंत ९ अब्जांवर पोहचेल
>२०५० पर्यंत जगातील पाण्याची मागणी ही ५५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
>पाण्याच्या वापराची प्रचलित पद्धत बदलली गेली नाही, तर २०३० पर्यंत जगात केवळ ६० टक्के एवढाच पाण्याचा साठा राहील.
८९) नेटीझन्सना संवादाचे नवे माध्यम उपलब्ध करून देणाऱ्या ट्विटरने आता नवव्या वर्षांत पदार्पण केले आहे. ट्विटरचे संस्थापक जॅक दोर्सी यांनी नऊ वर्षांपूर्वी ट्विटरची स्थापना कधी केली होती?
== २१ मार्च २००६
९०) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) किती रुपयांची नवीन नाणी आणली आहेत?
== ५ रुपयांची
९१) विधान परिषद सभापतींची निवड बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवत सभागृहाने एकमताने कोणाची सभापतिपदी निवड केली आहे?
== राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर
>महाराष्ट्र विधान परिषदेचे सहावे सभापती
आधीचे सभापती:-वि. स. पागे, रा. सु. गवई, जयंतराव टिळक, ना. स. फरांदे,शिवाजीराव देशमुख
९२) ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरातील सर्वांत वयोवृद्ध देवदासी असलेल्या कोणत्या देवदासी महिलेचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे?
== शशीमनी देवी (वय ९०)
९३) कोणत्या अंडरवर्ल्ड डॉनला अटक करण्यात गुजरात पोलिसांना यश आले आहे?
== विशाल गोस्वामीला
९४) "गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा‘ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे, मुक्तनाट्याचे आद्य प्रवर्तक असलेल्या कोणत्या शाहिराचे नुकतेच निधन झाले आहे?
== लोकशाहीर कृष्णराव साबळे-शाहीर साबळे
९५) शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार:-
शाहिरांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी
संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९८४), शाहीर अमर शेख पुरस्काराचे पहिले मानकरी (१९८८),अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९९०), अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्षपद (१९९०),महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०),संत नामदेव पुरस्कार (१९९४),साताराभूषण पुरस्कार (१९९७),शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार (१९९७),महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार (१९९७),महाराष्ट्र शासनाचा सर्वश्रेष्ठ गायक पुरस्कार (२००१),कविश्रेष्ठ पी. सावळाराम पुरस्कार (२००२),शाहीर फरांदे पुरस्कार (२००२), महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र–भूषण पुरस्कार (२००५),महाराष्ट्ररत्न पुरस्कार (२००६),लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध जीवनगौरव पुरस्कार (२०१२),‘पद्मश्री’(१९९८).
९६) "माझा पवाडा‘ हे त्यांचे आत्मचरित्र कोणत्या लोकशाहीराचे आहे?
== लोकशाहीर कृष्णराव साबळे-शाहीर साबळे
९७) गुगल या लोकप्रिय सर्चइंजिनने आपल्या ‘गुगल मॅप‘ या सेवेत भारतातील किती जागतिक वारसा स्थळांचा समावेश केला आहे?
== ३१
९८) खराब हवामानामुळे गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिम अर्धवट सोडावी लागलेल्या हजारो गिर्यारोहकांना त्यांचे परवाने कधीपर्यंत वापरण्याची परवानगी नेपाळ सरकारने दिली आहे?
== २०१९
९९) ईशान्य ऑस्ट्रेलियाला नुकतेच कोणत्या शक्तिशाली वादळाचा तडाखा बसला?
== नॅथन -उष्णकटिबंधीय वादळ
१००) आपल्या संगणकात मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असलेल्या ग्राहकांना, तसेच पायरेटेड व्हर्जन वापरत असलेल्या ग्राहकांनाही मायक्रोसॉफ्ट विंडोज कोणत्या व्हर्जनचे अपडेट्स विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे?
== विंडोज-१०
No comments:
Post a Comment