केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या
आणि आयोग:-
*भूषण गगराणी समिती-
महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या
समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
*डॉ. नरेंद्र जाधव समिती-
विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व
कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या
रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या
विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन
करण्यासाठी
*राम प्रधान समिती-
२६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या
संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
*माधवराव चितळे समिती-
मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
*न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील
रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची
चौकशी करण्यासाठी
*बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती-
जमातीच्या कल्याणाकरिता
*न्या. बापट आयोग (२००८)-
मराठा समाजास आरक्षणसंबंधी नेमलेला आयोग
(आरक्षण देऊ नये अशी शिफारस)
*न्या. सराफ आयोग (२००९) -
मराठा समाज आरक्षणासंबंधी नेमलेल्या बापट
आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्याकरिता.
*न्या. राजन कोचर समिती-
सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवी येथील झालेल्या
चेंगराचेंगरी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी
*डॉ. अभय बंग समिती-
कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या चौकशीकरिता
अमरावती पॅटर्न ही मोहीम राज्य शासनाने कुपोषण
निर्मूलन- संदर्भात सुरू केली.
*विलासराव देशमुख निवडणूक व्यवस्थापन समिती-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या
व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद केंद्रीय अवजड
उद्योगमंत्री विलासराव दशमुख यांच्याकडे
सोपविण्यात आले.
*देशमुख, दांडेकर, देऊस्कर समिती-
पाणी वाटप प्रश्नी राज्यात नेमलेली समिती
*प्रा. वि. म. दांडेकर समिती-
प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करून त्यावर उपाय
सुचविण्
*प्रा. जनार्दन वाघमारे समिती-
नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या
स्थापनेसाठी नेमलेली समिती
*पी. एस. पाटणकर समिती-
महाराष्ट्रातील नवीन नांदेड महसूल आयुक्तालयाच्या
स्थापनेसंबंधी
*वसंत पुरके समिती (२००८)-
शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश
करण्याबाबत परीक्षण करण्याकरिता राज्य सरकारने
नेमलेली समिती
*सुनील तटकरे समिती (२००९)-
रायगडावरील किल्ल्यातील मेघडंबरीत छत्रपती
शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात
नेमलेली समिती
*अशोक बसाक समिती-
दूध दरवाढ व खरेदी विक्री धोरण ठरविण्याबाबत
*न्या. राजिंदर सच्चर समिती-
मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक
दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने
नियुक्त केलेली समिती
*जगदीश सागर समिती (१९९५)-
नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या
बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी
*न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग-
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशी
करण्यासाठी
*के. नलिनाक्षण समिती -
ठाणे महानगर पालिकाअंतर्गत धोकादायक
इमारतीमागील कारणे शोधण्यासाठी नेमलेली समिती
तसेच ठेकेदारांचे भ्रष्टाचाराबद्दल
*नंदलाल समिती-
ठाणे महानगरपालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेली
समिती
*न्या. बी. एन. श्रीकृष्ण-
सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
*न्या. कुलदीपसिंग समिती -
मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संबंधीचा अभ्यास
करण्यासाठी
*लिबरहान आयोग
बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी चौकशी करण्यासाठी
*न्या. नानावटी आयोग/ न्या. बॅनर्जी समिती-
गोध्रा हत्याकांड चौकशी करण्यासाठी
*फुकन आयोग (२००४)- संरक्षण क्षेत्रातील
लाचखोरी व तहलका चौकशी करण्यासाठी
*मणिसाना आयोग-
पत्रकारासाठी नेमलेल्या वेतन आयोगानुसार
वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व
गैरपत्रकार कर्मचाऱ्यांना वेतनात ३० टक्के वाढ
No comments:
Post a Comment