Bookmark

Bookmark this Blog

Tuesday, October 20, 2015

इतिहास

विषय - इतिहास
* शिक्षण विषयक धोरण
१८२३ - ' कोलकाता स्कूल सोसायटी ' व ' कोलकाता स्कूल बुक सोसायटी ' यांना लॉर्ड हेस्टींग्जने अनुदान दिले .
कमिटी आँफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ची स्थापना .
१८२४ - संस्कृत महाविद्यालय कोलकाता येथे स्थापना .
या काळात 'ओरिएंटँलिस्ट' गटातील होरेस विल्सन , विल्यम जोन्स , प्रिन्सेप यांनी भारतातील प्रचलित शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन दिले तर ' अँग्लिसिस्ट' गटातील बिशप हेबर , अलेक्झांडर डफ , चार्लस ट्रिव्हेलियन सारखे इंग्रज अधिकारी व राजा राम मोहन रॉय यासारख्या भारतीय समाज सुधारकांनी पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला .
१८३४ - लॉर्ड मेकॉलेची गव्हर्नर - जनरलच्या कौन्सिलातील विधी सदस्य नियुक्ती .
खालील प्रस्ताव गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलपुढे मांडले .
त्याने इंग्रजी शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन दिले जावे.
शिक्षणासाठी मंजुर झालेली रक्कम पौर्वात्य शिक्षणावर खर्च केली जाऊ नये.
७ मार्च १८३५ मेकॉलेने मांडलेल्या प्रस्तावास मंजुरी .
१८३९ - आँक्लंडने मेकॉलेच्या प्रस्तावात बदल करुन रकमेचा काही भाग पौर्वात्य शिक्षणावर खर्च करण्याचा तसेच दर महिन्याला एशिॲटीक सोसायटीला रुपये ५०० देण्याचा निर्णय घेतला .
१८४२ - ' कमिटी आँफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ' ची जागा "कौन्सिल आँफ एज्युकेशन " ने घेतली .
१८४३ - १८५५ बंगाल मधील सरकारी नियंत्रणाखालील शाळांची संख्या २८ वरुन १५१ पर्यंत गेली .
१८५४ - प्राथमिक व उच्च शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन दिले . नियामक मंडळाचा अध्यक्ष सर चार्लस वुड याने १८५४ मध्ये शिक्षण विषयक खलिता तयार केला .
१८५४ चा वुडचा खलिता - वैशिष्ट्ये
१) शैक्षणिक अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षण नको .
२) स्री शिक्षणाला सरकारने विशेष उत्तेजन द्यावे .
३) शिक्षणाची व्याप्ती वाढविण्यासाठी व दर्जा सुधारण्यासाठी इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर करावा .
४) शिक्षणाचे स्वतंत्र खाते सरकारने स्थापन करावेत .
५) इलाख्याच्या मुख्य शहरात विद्यापीठे स्थापन करावी .
जानेवारी १८५७ - कोलकाता येथे विद्यापीठ स्थापन .
जुलै १८५७ - मुंबई येथे विद्यापीठ स्थापन .
सप्टेंबर १८५७ - मद्रास येथे विद्यापीठ स्थापन .
डलहौसीने १८५७ पर्यंत स्थापन केलेली महाविद्यालये
- वैद्यकीय महाविद्यालये - मुंबई , मद्रास , लाहोर
समाप्त

No comments:

Post a Comment