Bookmark

Bookmark this Blog

Sunday, November 1, 2015

मराठी व्याकरण

आपण बोलताना एका पाठोपाठ येणाऱ्या काही शब्दांमधील अक्षरे एकामागोमाग उच्चारताना, एकमेकांत मिसळली जातात.
उदाहरणार्थ - या वर्गात विद्यार्थी किती?
या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो.
एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात.  एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी : जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सुर + ईश = सुरेश.
२) व्यंजनसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. (व्यंजन + स्वर किंवा व्यंजन). उदा. सत् + आचार = सदाचार; उत् + लंघन = उल्लंघन.
३) विसर्गसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन) उदा. नि: + आधार = निराधार; दु: + काळ = दुष्काळ.






काही उदाहरणे :

जगन्नाथ : जगत +नाथ .गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा .सुर्याद्य : सूर्य + उदय .लंकेश्वर : लंका + ईश्वर .जलौघ : जल + ओघ .यशोधन : यश + धन .महर्षी : महा +ऋषी .विद्यार्थी : विद्या +अर्थी .सिंहासन : सिंह + आसन ..श्रेयश : श्रेय + यश .

*सराव टेस्ट -१(Practice Test)

1) वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "
विधानार्थीप्रश्नार्थीनकारार्थीउद्गारार्थी1. विधानार्थी


2) वाक्यातील कर्ता ओळखा. "त्याला जरा गंमत वाटली. "
त्यालाजरागंमतवाटली4. वाटली

3) वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "
बादशहाखाननावहे नावअसेल4. असेल

4) वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "
उत्तरमीत्याचेमी त्याचे3. त्याचे

5) वाक्यातील कर्ता ओळखा. " गावात लोक त्याची चर्चा करीत "
लोकगावातचर्चात्याची2. गावात

6) 'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' - वाक्यप्रकार ओळ्ख.
संयुक्तकेवलमिश्रगौण1. संयुक्त

7) 'आज पाऊस पडावा' -वाकप्रचार ओळखा.
केवलमिश्रसंयुक्तगौण1. केवल

8) खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
भवितव्यआडनावविज्ञानप्रगती1. भवितव्य

9) खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.
आजन्मलेखकदाताखोदाई1. आजन्म

10) 'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?
प्रयोजक क्रियापदसाधित क्रियापदसिद्ध क्रियापदशक्य क्रियापद

*सराव टेस्ट - 2(Practice Test)

1) 'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
बरे वाटणेस्वच्छ दिसणेसमाधान होणेइच्छा पूर्ण करणे3. समाधान होणे


2) व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
स्वर नाहीत ते.ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.जे संकप असतातज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो .4. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो .

3) मराठी मुळाक्षरात _______ हे व्यंजन स्वतंत्र आहे.
यरलळ4. ळ

4) 'राजवाडा' हा कोणता समास आहे?
द्वंद्व समासअव्ययीभाव समासबहुव्रीही समासतत्पुरुष समास4. तत्पुरुष समास

5) 'धर्मीवाचक ' नामे कशास म्हणतात?
सामान्यनामे व विशेषनामेसर्वनामे व विशेषणेसामान्यनामे व सर्वनामेविशेषनामे व सर्वनामे1. सामान्यनामे व विशेषनामे

6) 'अं' व 'अः' या दोन वर्णांना ........असे म्हणतात.

स्वरव्यंजनस्वरादीअर्धस्वर3. स्वरादी

7) योग्य शब्दसमूह निवडा.
फुलांचा घडखेळाडूंचा काफिलानोटांचे बंडलगुरांचा थवा3. नोटांचे बंडल

8) शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात.
शब्दरचनाधातूशब्दसिद्धीशब्दशक्ती3. शब्दसिद्धी

9) 'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
अपूर्ण भविष्यकाळपूर्ण भविष्यकाळसाधा भविष्यकाळयापैकी नाही1. अपूर्ण भविष्यकाळ

10) 'आधीच उल्हास,त्यात ..........मास' म्हण पूर्ण करा.
श्रावणपौषवैशाखफाल्गुन4. फाल्गुन

No comments:

Post a Comment