न्यूटनचे गतीविषयक नियम:
न्यूटनचे गतीविषयक तीन नियम प्रसिद्ध आहे.
अ) न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम :-
कोणत्याही वस्तूवर बलाची क्रिया झाल्याशिवाय ती वस्तू आपली अवस्था स्वत:हून बदलवित नाही. न्यूटनच्या या नियमावर आधारित खालील उदाहरणे आहेत.
१. वेगाने धावणा-या गाडीचे अचानक ब्रेक दाबले असता आतील प्रवासी पुढे झुकतात.
२. मैदाने सपाट करण्यासाठी आणलेल्या रोलरला गती देण्याकरिता जास्त शक्ती खर्च करावी लागते. एकदा गतिमान झाल्यानंतर फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत.
---------------------
ब) न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम :
१. संवेग : संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो.
संवेग म्हणजे वस्तूमान व वेग यांचा गुणाकार होय. संवेगाची तीव्रता ही वस्तूमान आणि वेग या दोन्ही गोष्टीवर अवलंबून असते.
उदा.:-
१. हाताने फेकलेली बंदुकीची गोळी लाकडात घुसत नाही परंतु बंदुकीमधून झाडलेली गोळी मात्र लाकडात घुसते. ही घटना गोळीचा वेग जास्त असल्यामुळे घडून येते.
२. वेगाने जाणा-या दुचाकीचा धक्का पायी चालणा-या मनुष्याला बसला, तर त्याला कमी इजा होते. परंतु दुचाकी इतका वेग असणा-या मोटारीचा धक्का पायी जाणा-या मनुष्यास बसला तर त्याला गंभीर इजा होते. कारण यावेळी गाडीचे वस्तूमान दुचाकीपेक्षा जास्त आहे.
----------------------
क) न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम
कोणत्याही वस्तूवर बलाची क्रिया केली असता, बलाची क्रिया करणा-या त्या वस्तूद्वारे तेवढयाच परिमाणाचे प्रतिक्रिया बल कार्य करीत असते.
उदा.:-
१. दाराला लाथ मारली असता दार तितक्याच प्रतिक्रियेने आपल्या पायावर बल प्रेरित करते.
२. अग्निबाण उडत असतांना वातावरणात बलाची क्रिया करते. तेवढयाच बलाने वातावरणाकडून अग्निबाणावर प्रतिक्रिया केली जाते.
No comments:
Post a Comment