#अतिसंभाव्य १०० प्रश्नोत्तरे
०१) केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांना गृह सचिवपदावरुन हटवण्यात आले असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती कऱण्यात आली आहे?
== ग्रामविकास सचिव एल.सी गोयल
०२) सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणात गुजरातचे माजी पोलीस महासंचालक असलेल्या कोणत्या व्यक्तीस विशेष सीबीआय न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे?
== पी. सी. पांडे
०३) सोहराबुद्दीनचा खटला सीबीआयच्या विनंतीवरून मुंबईमध्ये कधी हस्तांतरित करण्यात आला?
== सप्टेंबर २०१२
०४) केंद्र सरकारकडून २००५ पासून अन्नधान्यातील कीटकनाशकांचा अभ्यास केला जात आहे. २०१३-१४ मध्ये या सर्वेक्षणासाठी देशाच्या विविध भागातून घाऊक व किरकोळ बाजारातून भाजीपाला, अन्नधान्य, मसाला, फळांचे नमूने घेण्यात आले. त्यात ७५९१ प्रकारचे अन्नधान्य, भाज्या, फळांची तपासणी केली असून त्यातील किती नमुन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कीटकनाशके आढळली आहे?
== ५०९
०५) ७५९१ प्रकारच्या नमुन्यांची चाचणी एकूण किती प्रयोगशाळेत करण्यात आली होती?
== २५
०६) संयुक्त राष्ट्रांचा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल (एमजीडी) योजना भारत सरकारने सन २००० साली हाती घेतली होती २०१२ पर्यंत एकूण किती जण गरीबी रेषेखाली आहेत?
== २७ कोटी
०७) गुजरात पोलिसांनी १५ जून २००४ ला इशरत जहाँ सोबत कोणाला लष्कर ए तैयब्बाचे दहशतवादी असल्याच्या संशयावरुन गुजरातमध्ये ठार मारले होते.(बनावट चकमक प्रकरण)
== इशरत जहाँ, जावेद शेख, झीशान जोहर आणि अमजद अली राणा
>पोलीस सहआयुक्त आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे
०८) सध्या देशातील दोनशे शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर आयआरसीटीसीने रेल्वे तिकीटावर कॅश ऑन डिलिव्हरीची सेवा सुरु केली असून कोणत्या वेबसाईटवर तिकीट बुक केल्यानंतर ते घरपोच मिळेल?
== Bookmytrain.com
०९) शालेय अभ्यासक्रमात नीती शास्त्र सक्तीचे करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात कोणी जनहित याचिका दाखल केली आहे?
== महिला वकील संतोष सिंग
१०) शेती व शेतक-यांना वाहिलेली कोणती २४ तास चालणारी कोणती नवी वाहिनी एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आहे?
== डीडी किसान
११) लस निर्मितीत जगातील सर्वात मोठा देश कोणता ठरला आहे?
== भारत (सेरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, बायोलॉजिकल ई)
१२) प्राईस वॉटरहाऊस कुपर्सचा अहवाल:-
>२०३४ वर्षापर्यंत भारताला ३० लाख डॉक्टर्स, ६० लाख परिचारिका आणि साडेतीन लाख बेड्सची गरज पडेल. यासाठी २४५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे
> हजार लोकसंख्येमागे १.३ आहे.(३.५ असे प्रमाण असायला हवे)
>जीवन जगण्याचा कालावधी:-२०१२ मध्ये हा ६६ वर्ष होता, २०२४ पर्यंत तो ७१ तर २०३४ पर्यंत ८०पर्यंत जाणे गरजेचे
>सध्या हजार बालकांमागे जन्मत: मृत्यूचे प्रमाण ४४ आहे. २०२४ मध्ये ते ३१ तर २०३४ पर्यंत १२ पर्यंत आणणे गरजेचे
१३) इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) रुग्णांसाठी तक्रार निवारण मंच काढला असून आयएमएने १७०० स्थानिक शाखा आणि किती राज्य शाखांना हे मंच स्थापन करण्यास सांगितले आहे?
== ३० शाखांना
>आयएमएचे महासचिव डॉ. के. के. आगरवाल
>आयएमएचे अध्यक्ष ए. मरतड पिल्लई
१४) जॉर्डनचा कोणत्या वैमानिकाला ‘इसिस’ने जिवंत जाळल्याने संपूर्ण पश्चिम आशियात संतापाची लाट पसरली आहे.
लेफ्टनंट मोएथ-अल-कसाबेह
१५) जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळल्याचा व्हीडिओ इसिसने प्रसिद्ध केल्यानंतर अल-कायद्याच्या कोणत्या दोन जिहादी कैद्यांना फाशी दिल्याची माहिती जॉर्डनच्या सरकारी प्रवक्त्यांनी दिली आहे.?
== साजिदा-अल-रिश्वी आणि झद-अल-कबरेली
१६) तैपेईच्या संघसन विमानतळावरुन ट्रान्स एशियाचे एटीआर ७२ हे विमान किनमेन बेटाच्या दिशेने निघाले असतांना कोणत्या नदीत कोसळले होते?
== कीलुंग
१७) आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा लाभला आहे?
== तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओरिया
१८) प्रथमच ओडिशातील कोण-कोणत्या किनारी भागातील डॉल्फिनची गणना केली जाणार आहे?
== भद्रक, बालासोर, बेहरामपूर आणि पुरी
१९) शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार द्यायचे किती टक्के आरक्षणातील प्रवेश यंदा प्रथमच राज्यभरातील सर्व महापालिकांच्या हद्दीत ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार आहेत?
== २५%
संकेतस्थळ:- www.rte25admission.maharashtra.gov.in
२०) इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातमधील कोणत्या दोन वादग्रस्त पोलिस अधिकार्याना सशर्त जामीन मंजूर केला आहे?
== डी. जी. वंजारा आणि पी. पी. पांडे
२१) जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेल्या गुगलने ‘जी टॉक‘ ही सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
== १६ फेब्रुवारी २०१५ पासून
२२) गुगलने ‘जी टॉक‘ सेवेऐवजी आता कोणते अॅप्लिकेशन वापरण्याचा सल्ला मेसेजद्वारे आपल्या जी टॉक युजर्सना दिला आहे?
== गुगल हँगआऊट
२३) ‘मन पाखरु पाखरु‘, ‘प्रिती परी तुजवरती‘, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क‘, ‘तुज आहे तुजपाशी‘, ‘पळा पळा कोण पुढे पळे‘ या नाटकांमध्ये अभिनय केलेल्या कोणत्या अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== आत्माराम भेंडे
२४) आत्माराम भेंडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आले आहे?
== २००६-०७
२५) ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात(५०सावा) पुरस्काराने कोणत्या मराठी साहित्यिकास सन्मानित करण्यात आले आहे?
== भालचंद्र नेमाडे(२०१४ चा पुरस्कार)
२६) १९६५ पासून देण्यात येणाऱ्या ज्ञानपीठाचा मान मिळविणारे भालचंद्र नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ठरले असून, यापूर्वी हा सन्मानाने कोणास गौरविण्यात आले आहे?
== १९७४-वि.स. खांडेकर(‘ययाती’साठी)
>१९८७-वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज(‘विशाखा’साठी)
>२००३-गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर (‘अष्टदर्शने’साठी)
>२०१४-भालचंद्र नेमाडे(‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’साठी)
२७) भालचंद्र नेमाडेंची साहित्यसंपदा:-
>कादंबर्याय:-
कोसला,बिढार,हिंदू -जगण्याची समृद्ध अडगळ,जरीला,झूल,
>कविता संग्रह:-
मेलडी,देखणी
>समीक्षा:-
>टीकास्वयंवर,साहित्याची भाषा,तुकाराम,द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी,नेटिविझम,इंडो – अँग्लियन रायटिंग्स
२८) भालचंद्र नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार,मानसन्मान
- १९७६ - बिढार - ह. ना. आपटे पुरस्कार
- १९८४ - झूल - यशवंतराव चव्हाण (कऱ्हाड) पुरस्कार
- १९८७ - कुरुंदकर पुरस्कार, साहित्याची भाषा
- १९९१ - टीका स्वयंवर - साहित्य अकादमी पुरस्कार
- १९९१ - देखणी - कुसुमाग्रज पुरस्कार
- १९९२ - देखणी - ना. धों. महानोर पुरस्कार
- २००२ - महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार
- २०१३ - नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्कार
- २०१५ - ज्ञानपीठ पुरस्कार(२०१४)
>उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट
२९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे शंभर दिवस कधी पूर्ण होत आहेत?
== ०७ फेब्रुवारी २०१५
३०) गांधीनगरमध्ये आयोजित ९व्या "प्लास्ट इंडिया-२०१५‘ या कार्यक्रमात मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
== वापी(गुजरात)
३१) जागतिक तापमानवाढीवरील आंतरराष्ट्रीय परिषद पुढील वर्षी(२०१६) मध्ये कोठे होणार आहे?
== फ्रान्समधील पॅरिस येथे
३२) १९७५ साली प्रदर्शित झालेला व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला तसेच चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम नोंदविलेला अत्यंत लोकप्रिय असा कोणता चित्रपट पाकिस्तानमधील चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे?
== शोले
३३) भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा हत्यारा व तमिळ टायगर रिबेलचा नेता असलेला कोणत्या व्यक्तीस परदेशात जाण्यास श्रीलंकन न्यायालयाने बंदी घातली आहे?
== कुमारन पथमंथम
३४) राजे फैजल आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते:-
भारतीय वंशाचे इस्लामिक विद्वान डॉ. झाकीर ए. नाईक:-इस्लामच्या सेवेबद्दल
विज्ञान श्रेणीतील पुरस्कार:- ग्राटझेल व रसायनशास्त्राचे प्रोफेसर ओमर मवान्नेस
इस्लामिक अभ्यासासाठीचा पुरस्कार:-डॉ. अब्दुल अजीज बिन अब्दुल रहमान काकी
वैद्यकीय क्षेत्रासाठीचा पुरस्कार:- प्रो. जेफ्री इव्हान गॉर्डन
३५) महाविद्यालय, विद्यापीठ आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्यावर बंदी घालण्याबद्दल परिपत्रक जारी करा, असा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने राज्यसरकारला दिला आहे?
== मद्रास उच्च न्यायालय(तामिळनाडू)
३६) राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलाला नथुराम गोडसेंचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे?
== अलवर जिल्ह्यात
३७) नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पांतर्गत डिसेंबर २०१६ पर्यंत किती ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे?
== अडीच लाख
३८) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा (मूळचा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) नेटबॉल खेळाडू असलेल्या कोणत्या तरुणाचा समुद्रात याचा बुडून मृत्यू झाला आहे?
== मयूरेश भगवान पवार
३९) ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे हे कितव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते?
== ६१साव्या(नाशिक-१९८१)
४०) ११५ तास सलग कुराण पठण करून एक नवा विश्वविक्रम कोणी बनविला आहे़?
== नागपुरातील मोहम्मद शहजाद परवेज यांनी
४१)२०१२-१३ मध्ये देशाच्या चालू खात्यातील तूट जीडीपीच्या ४.७ टक्क्यांवर झेपावली होती,मात्र २०१३-१४मध्ये परिस्थिती बरीच बदलून ही तूट किती टक्क्यांवर आली ?
== १.७%
४२)सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकबरोबर अनिल अंबानींच्या समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम)ने भागीदारीची घोषणा केली असून या सुविधेअंतर्गत किती वेबसाईट मोफत उपलब्ध होणार आहेत?
== ३३ पेक्षा जास्त
४३)इंटरनेट.ऑर्ग(.org) अॅअपची सुविधा मिळवणारा आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे?
== भारत
४४)मोफत इंटरनेट सेवेसाठी आरकॉम-फेसबुक एकत्र आले असून ही सुविधा सुरुवातीला किती सर्कल मध्ये उपलब्ध होणार आहे?
== मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, चेन्नई, तामिळनाडू आणि केरळ
४५)सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसी, सेल, नाल्को आणि एनएलसी यांच्याकडून ३६ कोळसाखाणींसाठी एकूण किती अर्ज प्राप्त झाल्याचे कोळसा खात्याने स्पष्ट केले आहे?
== ६९
४६)केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार:-
>या वर्षी विकासदर ७.४ टक्के राहील.
>२०१३-१४मध्ये ९९.२१ लाख कोटी रुपयांवर जीडीपी(३० जानेवारीच्या सुधारित आकडेवारीनुसार)
>२०११-१२च्या आधार वर्षानुसार चालू आर्थिक वर्षात जीडीपी १०६.५७ लाख कोटींचा पल्ला गाठेल
>या वर्षी देशाचे दरडोई उत्पन्न १० टक्क्यांनी वाढून ७,३७८.१७ रुपयांवर जाणार आहे.
>फॅक्टर कॉस्ट ऐवजी कॉन्स्टंट प्राईसनुसार अर्थव्यवस्था मोजण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
४७) कॅनलिस या संस्थेच्या अहवालानुसार स्मार्टफोन विक्रीमध्ये भारतीय बाजारपेेठेत सर्वाधिक दबदबा असणा-या सॅमसंग या कोरियन कंपनीच्या वर्चस्वाला धक्का देत कोणत्या भारतीय मोबाईल उत्पादक कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे?
== मायक्रोमॅक्स(जागतिक बाजारपेठेत ३रे स्थान)
४८)पेमेंट बँकेचा कारभार:-
>प्रति व्यक्ती १ लाखापर्यंत ठेवी स्वीकारता येणार
>एटीएम/डेबिट कार्डची सुविधा देणार
>म्युच्युअल फंड आणि विमा उत्पादनांच्या विक्रीस परवानगी
>विविध पेमेंट आणि पैसे हस्तांतराची सुविधाही देणार
>क्रेडिट कार्ड, कर्ज सुविधा मात्र देता येणार नाही
*परवानासाठी अर्जदार:-
>रिलायन्स-स्टेट बँक
>आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड (एबीएनएल)
>भारती एअरटेल आणि कोटक महिंद्रा बँक
>फ्युचर समूह
*इतर स्पर्धक:-
>एसकेएस मायक्रोफायनान्स
>यूएई एक्स्चेंज इंडिया
>दिवाण हाऊसिंग फायनान्स
>एसई इन्व्हेस्टमेंट
४९) जैवतंत्रज्ञानावर (बीटी) आधारित पीक लागवडीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
== ४था
USA (69 million hectares),
Brazil (30.3 million),
Argentina (23.7 million),
India (10.6 million)
५०) थ्रीजी स्पेक्ट्रम लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या लिलावासाठी प्रत्येक मेगाहर्ट्झमागे सरकारने किती दर निश्चित केला आहे?
== ३ हजार ७०५ कोटी रुपये
५१) राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय, ३ दंत आणि ४ आयुर्वेदिक महाविद्यालयातील अध्यापकांचे नियत सेवानिवृत्तीचे वय ६३वरून किती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे?
== ६४
५२) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी किती मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे?
== १० मिनिटे अगोदर
५३) स्मार्टफोनद्वारे सोशल मीडिया आणि मोबाइल बँकिंगचा वाढता प्रसार लक्षात घेता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या संस्थेने ‘इमिजीएट पेमेंट सर्व्हिस’ (आयएमपीएस) हे तंत्रज्ञान विकसित केले असून, याद्वारे हे मनी ट्रान्स्फर शक्य होणार आहे.या अंतर्गत दिवसाकाठी अडीच हजार रुपये किंवा महिन्याकाठी किती हजार रुपयांपर्यंत पैसे हस्तांतरित करण्याची मुभा देण्यात आली आहे?
== २५ हजार रुपये
५४) कायम विनाअनुदानित तत्त्वावरील खासगी माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मूल्यांकन निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची त्रयस्थ समितीने पाहणी केली होती. त्यानुसार किती शाळा अनुदानास पात्र ठरल्या असून, यातील १,२९२ पदे अनुदानास पात्र ठरली आहे?
== ४६२ शाळांपैकी १६२ शाळा(४८६ वर्गांसाठी ८१० शिक्षक आणि ४८२ शिक्षकेतर अशी एकूण १,२९२ पदे)
५५) नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे आगामी वर्षभरात होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे जलदगतीने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालीसमिती नेमण्यात आली आहे?
== आनंद कुळकर्णी (सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव)
५६) मुंबईपासून २२८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील कोणत्या गावातील नागरिकांनी जातीय सलोखा टिकवण्यासाठी आपापसांत १०० वर्षांचा करार केला आहे?
== बुरोंडी(हिंदू व मुस्लिम)
५७) आत्माराम भेंडे यांना कोण-कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे?
== नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर आणि रंगभूमी जीवनगौरव
५८) ‘बाफ्टा २०१५’ चित्रपट महोत्सवात रिचर्ड लिंकलेटर यांच्या कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह तीन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले?
== बॉयहुड
५९) ‘बाफ्टा २०१५’ चित्रपट महोत्सवात सर्वाधिक पाच पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाले?
== द ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल
६०) ५७ व्या ग्रॅमी समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले भारतीय कोण?
== बंगळुरू येथील संगीतकार रिकी केज(विंडस् आॅफ समसारा) व नीला वास्वानी( ‘आय अॅृम मलाला : हाऊ वन गर्ल स्टूड अप फार एज्युकेशन अँड चेंज्ड् द वर्ल्ड’)
६१) क्रिकेट विश्वचषक २०१५:-
>१४ देश, ४४ दिवस आणि ४९ सामने
उद्घाटन> न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न
६२) कोणत्या विश्व्करंडक स्पर्धेत भारत-पाकिस्तान प्रथमच आमनेसामने आले होते?
== ५वा विश्वचषक-१९९२ (ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड)
>४ मार्च,१९९२-सिडनी क्रिकेट मैदान,सिडनी,ऑस्ट्रेलिया
६३) संविधानातील कोणत्या कलमानुसार नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवेत आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत?
== कलम १६ (४)
६४) नॅशनल सायन्स फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठेचा "करियर‘ पुरस्कार दिला जातो. रिचार्जेबल बॅटरी तयार करण्यासाठी लागणारा धातूचा अत्यंत पातळ पत्रा (अल्ट्रा थीन मेटल शीट) तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला पाच लाख अमेरिकी डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे?
== गुरप्रीतसिंग
६५) ‘लष्करे तैयबा‘ (एलईटी), "जमात-उद-दावा‘,‘जैश-ए-मोहम्मद‘, ‘हक्कानी नेटवर्क‘, "अल् कायदा यांसारख्या दहशतवादी संघटना आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या आर्थिक केंद्रांना आणि निधी उभारणीला संयुक्तपणे लक्ष्य करण्याचे कोणत्या दोन देशांनी ठरवले आहे?
== भारत आणि अमेरिका
६६)सुधारित राष्ट्रीय इलेक्ट्रिाक मोबिलिटी मिशन-२०२० (एनईएमएमपी) कार्यक्रम:-
*योजनेची चतुःसूत्री
- वायूप्रदूषणाला आळा घालणे
- देशी वाहननिर्मितीला चालना देणे
- राष्ट्रीय ऊर्जासुरक्षा
- इंधन बचत
*योजनेचा आवाका:-
१४ हजार कोटी रुपये "एनईएमएमपी‘चा एकूण प्रकल्प
७९५ कोटी रुपये पहिल्या टप्प्यासाठी मंजूर रक्कम
२५ लाख लिटर इंधन बचतीचा अंदाज
६७) लोकसंख्येचा अंदाज:-
>२०३० पर्यंत शहरी भागात राहणाऱ्या भारतीयांची संख्या ६० ते ७० कोटींचा टप्पा ओलांडेल.
>सध्या देशात १० ते २० लाख लोकसंख्येची शहरे ३० टक्के,
>२५ लाखांपर्यंतच्या लोकसंख्येची ४२ टक्के
>५० लाखांपुढच्या शहरी लोकसंख्येची ६३ टक्के
६८) २०१४ या वर्षात सोन्याच्या मागणीत जवळपास १४ टक्क्यांनी घट झाली असून मागणी किती टनांवर पोहोचली आहे?
== ८४२.६ टन
६९) भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या एकूण मागणीत २०१४ मध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली असून मागणी किती टनांवर पोहोचली आहे?
== ६६२ टन
७०) कारमध्ये लहान मुले असतील तर गाडी चालविताना चालकांना धुम्रपान करण्यास कोणत्या देशात मनाई करण्यात आली आहे?
== ब्रिटन
७१) जगात सर्वांत जास्त भांडवल असणारी कंपनी कोणती ठरली आहे?
== ऍपल- ७०० अब्ज डॉलर्स(भारतीय चलनात ४२ लाख कोटी रुपये)
७२) सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्येही आता ऍपल प्रवेश करणार असून, यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला जाणार आहे?
== फर्स्ट सोलर
७३) ईजिप्तने देशातील पहिलावाहिला आण्विक प्रकल्प (४८०० मेगावॅट) बांधण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
== रशिया
७४) इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने अपहृत केलेल्या कोणत्या अमेरिकी महिलेची हत्या केली आहे?
== कायला जीन म्यूलर
७५) राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने कोणत्या देशामधील आपला दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
== येमेन
७६) अरविंद केजरीवाल:-
>पारितोषिके, मानसन्मान:-
२००४ - अशोका फेलो
२००५ - कानपूर आयआयटीतर्फे सत्येंद्र दुबे स्मृती पारितोषिक
२००६ - रेमन मॅगसेसे पारितोषिक
२००६ - सीएनएन- आयबीएनतर्फे ‘इंडियन ऑफ इयर’ सन्मान
२००९ - आयआयटी खरगपूरतर्फे सर्वोत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार
२००९ - असोशिएशन फॉर इंडियाज डेव्हलपमेंटतर्फे फेलोशिप आणि निधी
२०१० - इकॉनॉमिक टाइम्सतर्फे ‘कॉर्पोरेट एक्सशलन्स’ पारितोषिक
२०११ - ‘एनडी टीव्ही’तर्फे अण्णा हजारे यांच्यासोबत ‘इंडियन ऑफ इयर’ पारितोषिक
७७) समलैंगिक संबंध प्रकरणासंदर्भात मलेशियामधील कोणत्या प्रभावशाली विरोधी पक्षनेत्याला दोषी असल्याचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सुनाविला आहे?
== अन्वर इब्राहिम
७८) जिनिव्हामधील एचएसबीसी बॅंकेत खाते असलेल्यांची माहिती:-
६२८ - यापूर्वीच्या यादीतील नावे
११९५ - नव्या माहितीनुसार नावे
२५४२० कोटी - भारतीय खातेधारकांची रक्कम
६२ लाख कोटी - एसएसबीसीमधील एकूण ठेवी
७९) इजिप्त प्रिमिअर लीग स्पर्धेत एअर डिफेन्स या स्टेडियममध्ये कोणत्या दोन अव्वल संघांत सामना होणार होता ज्यात स्टेडियममध्ये घुसणारे प्रेक्षक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत ३० जणांचा मृत्यू झाला?
== झमालेक(अल्ट्रास व्हाईच नाईट) आणि ईएनपीपीआय
८०) "यू-ट्यूब‘वरील "इनोसेंस ऑफ मुस्लिम‘ या व्हिडिओमुळे सप्टेंबर २०१२ मध्ये कोणत्या देशात घालण्यात आलेली बंदी आता अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आली आहे?
== पाकिस्तान
८१)क्रिकेट वर्ल्डकप २०१५ स्पेशल:-
>पहिला चेंडू टाकला कुलसेकराने, ‘स्ट्रायकर’ फलंदाज मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड).
(विशेष म्हणजे गेल्या विश्वचषकात शेवटचा चेंडूही कुलसेकरानेच टाकला होता. त्यावर महेंद्रसिंग धोनीने षटकार ठोकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.)
>पहिली धाव अवांतर रूपाने (वाईड).
>पहिला चौकार ब्रेंडन मॅककलमचा. गोलंदाज कुलसेकरा.
>पहिला षटकारही मॅककलमचा, गोलंदाज मलिंगा.
>पहिली विकेट मॅककलमची, गोलंदाज रंगना हेरथ.
>पहिला झेल जीवन मेंडिस, फलंदाज मॅककलम.
>पहिला यष्टिचीत (रॉस टेलर यष्टिचीत संगकारा गो. जीवन मेंडिस)
>पहिले अर्धशतक मॅककलमचे.
>पहिले शतक – आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया).
>पहिली हॅटट्रिक – स्टीव्हन फिन (इंग्लंड).
>डावात पाच विकेट – स्टीव्हन फिन (इंग्लंड).
>पहिला सामनावीर – कोरी अॅँ डरसन (न्यूझीलंड)
८२) वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रीक करणारे गोलंदाज:-
>चेतन शर्मा-भारत विरुध्द न्यूझीलंड-१९८७
>साकलेन मुश्ताक-पाकिस्तान विरुध्द झिंम्बावे -१९९९
>चामिंडा वास-श्रीलंका विरुध्द बांगलादेश-२००३
>ब्रेट ली-ऑस्ट्रेलिया विरुध्द केनिया-२००३
>लसिथ मलिंगा-श्रीलंका विरुध्द दक्षिण आफ्रिका-२००७
>केमर रोच-वेस्ट इंडिज विरुध्द हॉलंड-२०११
>लसिथ मलिंगा-श्रीलंका विरुध्द केनिया-२०११
>स्टीव्हन फिन-इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया-२०१५
८३)विराट कोहली(भारत-पाक सामना)
>पाकविरुद्ध वर्ल्डकप सामन्यात शतकी खेळी करणारा पहिला भारतीय फलंदाज.
>सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने सौरव गांगुलीच्या २२ शतकांशीही बरोबरी केली.
>ओस्ट्रेलिया मध्ये वर्ल्डकप सामन्यात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज
>वनडे क्रिकेटमध्ये झटपट २२ शतके.त्याने १५१ सामन्यांत (१४३ डाव) ही कामगिरी केली.
>वनडेत २२ किंवा त्याहून अधिक शतके ठोकणारा कोहली पाचवा फलंदाज. यापूर्वी सचिन (४९ शतके), पाँटिंग (३०), जयसूर्या (२८) आणि गांगुली (२२) यांनी २२ किंवा त्याहून अधिक शतके ठोकली आहेत.
८४) वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
बिशन सिंग बेदी (१९७५ वर्ल्ड कपमध्ये ईस्ट आफ्रिकेविरुद्ध बारापैकी आठ षटके निर्धाव)
८५) पाचव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी करत इंग्लंडच्या इऑन मॉर्गन-रवी बोपाराने केलेल्या नाबाद २२६ धावांचा विक्रम कोणी मोडला?
== डेव्हिड मीलर आणि जीन पॉल ड्युमिनी (१७८ चेंडूंत विक्रमी नाबाद २५६ धावा)
८६) भारताने आतापर्यत ६ वेळेस पाकिस्तानला वर्ल्डकप मध्ये कोण-कोणत्या वर्षी हरविले आहे?
== १९९२ (४३ धावा), १९९६ (३९ धावा), १९९९ (४७ धावा), २००३ (सहा गडी राखून), २०११ (२९ धावा) आणि २०१५(७६ धावा)
८७) ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:-
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू:-आकांक्षा व्होरा(महाराष्ट्राची जलतरणपटू)
सर्वोत्कृष्ट खेळाडू:-साजन प्रकाश(केरळचा जलतरणपटू)
८८) ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धत मुंबईच्या आकांक्षा व्होराने किती पदके कमावली आहेत?
== पाच सुवर्ण आणि एक रौप्यपदक(महिलांच्या ४००, ८००, १५०० मी. फ्रीस्टाइलसह ४ बाय २०० आणि ४ बाय १०० मी. फ्रीस्टाइल रिलेमध्ये सुवर्णपदक याशिवाय ४०० मी. वैयक्तिक मिडलेमध्ये रौप्यपदक)
८९) पदक तालिका:-
१)सेनादल:- ९१ सुवर्ण, ३३ रौप्य आणि ३५ ब्राँझपदक
२)केरळ:- ५४ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ६० ब्राँझ
३)हरियाण:-४० सुवर्ण, ४० रौप्य आणि २७ ब्राँझ
४)महाराष्ट्र:-३० सुवर्ण, ४३ रौप्य आणि ५० ब्राँझ
९०) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०१६ मध्ये कोठे आयोजित करण्यात येत आहे?
== गोवा
९१) क्रिकेट विश्वकरंडक २०१५ स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल वेस्टईंडिज संघाला हरवत कोणत्या संघाने नोंदविला आहे?
== आयर्लंड( या अगोदर पाकिस्तानला २००७ मध्ये व इंग्लंडला २०११ मध्ये पराभूत केले होते)
९२) आयपीएलच्या ८व्या हंगामासाठी खेळाडूंचे लिलाव सुरू झाले आहेत. लिलावात विश्वकरंडकासाठी भारतीय संघात स्थान न मिळालेल्या अष्टपैलू खेळाडू युवराजसिंगला तब्बल १६ कोटी रुपये देऊन कोणत्या संघाने खरेदी केले आहे?
== दिल्ली डेअरडेव्हिल्स
९३) विश्ववकरंडक लढतीचे आयोजन केलेले शंभरावे स्टेडियम होण्याचा मान कोणत्या स्टेडीयमला मिळाला आहे?
== हेगले ओव्हल (न्यूझीलंड)
९४) कुमार संगकाराने विश्वतकरंडकात १०३० धावा करत स्पर्धेत एक हजार धावा पूर्ण करणारा चौदावा खेळाडू होण्याचा मान मिळविला तसेच कारकिर्दीत १३ हजार ७३२ धावा करत सर्वाधिक एकदिवसीय धावांच्या क्रमवारीत दुसरा फलंदाज होत कोणाचा रेकार्ड मोडला?
== रिकी पॉंटिंग(१३,७०४)
९५) विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रीक नोंदविणारा फिन इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. विश्वकरंडक स्पर्धांत हॅट्ट्रीक नोंदविणारा फिन जगातील कितवा गोलंदाज आहे?
== सातवा
९६) ललिता बाबर
>राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्णपदक (९ मिनिटे ४२.६३ सेकंद)
>विश्व् ऍथलेटिक्से स्पर्धेसाठी दोन क्रीडा प्रकारांत पात्र ठरणारी ललिता पहिलीच धावपटू ठरली.
९७) बॉक्सिंिग इंडियाचे सचिव जय कवळी यांची सलग कितव्यांदा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंाग संघटनेच्या युवा समितीच्या सचिवपदी निवड झाली?
== तिसर्यांदा (२००६ पासून या पदावर आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी २०१८पर्यंत असेल)
९८) शालेय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेला पुण्याचा बास्केटबॉलपटू असलेल्या कोणत्या खेळाडूचे नियमित सरावाच्या वेळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्या्ने निधन झाले?
== अक्षय लक्ष्मण भोसले (वय २३)
९९) एटीपी टूरवरील इक्वेडोर ओपनचे विजेतेपद कोणी पटकावले?
== व्हिक्टकर एस्ट्रेला बर्गोस(डॉमिनिकन प्रजासत्ताक)
१००) वर्ल्ड कप क्रिकेट २०१५ मध्ये विजेत्या संघांना किती रक्कम दिली जाणार आहे?
== विजेत्या संघाला ४० लाख डॉलर, तर उपविजेत्या संघाला १८ लाख डॉलर
No comments:
Post a Comment