०१) एका बारच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी १
कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोप ठेवण्यात आलेले
केरळचे अर्थमंत्री कोण?
== के.एम. मानी
०२) भारतीय कायदेमंडळाने निवडणूक आयोगाकडे सादर
केलेला निवडणूक प्रक्रिया सुधारणा अहवाल शिफारशी:-
भारतीय कायदेमंडळाचे अध्यक्ष:- न्यायाधीश ए.पी.शहा
>नोंदणीकृत असलेल्या पक्षांच्या उमेदवारांनाच निवडणूक
लढण्याची अनुमती देण्यात यावी
>लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ३४ अन्वये
सुरक्षा अनामत रक्कम 20 हजार रुपयांपर्यंत
वाढविण्याची शिफारस
>कायदेमंडळाने एकाच उमेदवाराला एकापेक्षा अधिक
ठिकाणी निवडणूक लढविण्यास बंदी करावी,
>अनिवार्य मतदानाची कल्पना रद्द करावी
>सभागृह बरखास्त होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी शासन
पुरस्कृत जाहिरातींवर बंदी करावी
०३) मध्य प्रदेशमधील
एका खाणीच्या प्रकल्पाला लंडनमध्ये विरोध
दर्शविण्यासाठी निघालेल्या कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्या प्रिया पिल्लई
यांच्या विदेश दौऱ्यावर सरकारने बंदी आणली होती. परंतु
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल
देताना न्यायालयाने पिल्लई यांच्या विदेश दौऱ्यावरील
बंदी मागे घेण्याबाबत सरकारला निर्देश दिले आहेत.
== ग्रीनपीस(न्यायाधीश राजीव शाकधेर)
०४) मागील तीन महिन्यांपासून भारतात सुमारे दीड हजार
नागरिकांचे बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूच्या विषाणूमध्ये
(एच१एन१) बदल झाल्यामुळे तो अधिक घातक
आणि संसर्गजन्य झाला असल्याचे मत कोणी व्यक्त केले
आहे?
== राम शशीशेखरन-अमेरिकेतील एमआयटीचे संशोधक
०५)‘थाली‘(मंगळसूत्र) शो प्रसारित केल्याने
काही संघटनांनी कोणत्या वाहिनीवर
गावठी बॉंबचा हल्ला केला?
== तमीळ टीव्ही न्यूज
०६) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान
ऍनरुड जुगनॉथ यांच्यात झालेले करार:-
१) बेटांचा विकास
२ ) सागरी व्यापारात वाढ, मॉरिशसच्या बेटावरील
सागरी आणि हवाई वाहतूक यंत्रणेत सुधारणा
३ ) आंब्याची आयात
४) सांस्कृतिक सहकार्य करार
५) परंपरागत वैद्यकीय चिकित्सा सहकार्य
०७) पुजारी पदासाठी झालेली देशातील पहिलीच
परीक्षा कोणत्या मंदिरासाठी घेण्यात आली आहे?
== पंढरपूर- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
०८) देशांतर्गत हिंसाचारामुळे
अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात
असलेल्या कोणत्या देशाला १७.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज
देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ)
घेतला आहे?
== युक्रेन
>अमेरिकाही युक्रेनला ७.५ कोटी डॉलर्सची अतिरिक्त
मदत करणार
०९) कोणत्या क्रिकेट संघटनेच्या कार्यालयाला टाळे
ठोकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे?
== राजस्थान क्रिकेट संघटना(आरसीए)
>अध्यक्ष ललित मोदींविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत
करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर
१०) दिल्ली सामूहिक बलात्कारावर आधारित "इंडियाज्
डॉटर‘ नावाच्या डॉक्युमेंट्रीवरील बंदी मागे
घेण्याची मागणी करणारी विभोर आनंद
यांची याचिका कोणत्या उच्च न्यायालयाने फेटाळून
लावली आहे?
== दिल्ली उच्च न्यायालय
११) लोकप्रिय सर्चइंजिन गुगलने लंडनमध्ये आपले पहिलेच
स्टोअर उघडले आहे.या गुगल स्टोअरला काय नाव देण्यात
आले आहे?
== क्रोमेझोन
१२) २००५ मध्ये कुमार मंगलम
बिर्ला यांच्या कोणत्या कंपनीला ओडिशातील तालाबीरा-
दोनमधील कोळसा खाणपट्ट्याचे वाटप केले गेले
होते.या कंपनीला कोळसा खाणींचे वाटप
करण्याच्या प्रक्रियेतील कटात माजी पंतप्रधान
मनमोहनसिंग यांचा सहभाग स्पष्ट होत असल्याचे
निरीक्षण न्यायालयाने नोंदविले असून कटकारस्थान,
फसवणूक, भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील कलमान्वये
सीबीआय विशेष न्यायालयाने यांच्या विरोधात समन्स
जारी केले?
== हिंदाल्को बिर्ला समुहातील कंपनी
*गुन्हेगारी कट रचणे (कलम १२० ब),
गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात (कलम ४०९)
१३) भारत आणि सेशल्स यांच्यात झालेले करार:-
१)हायड्रोग्राफमध्ये (जलस्थिती) सहकार्य,
२) ऊर्जानिर्मिती,
३) संयुक्तपणे जलवाहतूक मार्ग विकसित करणे,
४) अन्य देशांना विकण्यासाठी इलेक्ट्रॉनिक जलवाहतूक
मार्ग तयार करणे आणि पायाभूत विकासाचा समावेश आहे.
*सेशल्सच्या नागरिकांना तीन महिन्यांसाठी मोफत
व्हिसा आणि व्हिसा ऑन अरायव्हलची घोषणा
*सेशल्सचे राष्ट्रपती जेम्स मायकेल
१४) कोळसा व खाण-खनिजविषयक वादग्रस्त
विधेयकांवरील राज्यसभेच्या दोन निवड
समित्या अध्यक्ष:-
कोळसा विधेयकावरील समिती- भूपेंद्र यादव
खाण-खनिज विधेयकावरील समिती- अनिल दवे
१५) सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर
सर्वाधिक लोकप्रिय केलाडू महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत
पहिल्या क्रमांकावर असलेला खेळाडू कोण?
== शिखर धवन
१६) सुप्रीम कोर्टाचे बंधन:-
हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या
नियुक्तीसाठी सध्याच्या कॉलेजियम
पद्धतीऐवजी आणलेला १२१वा घटनादुरुस्ती कायदा तसेच
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएएस)
यांच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकांवर
हायकोर्टांनी सुनावणीस घेऊ नये
१७) गाझियाबादमधील दादरी भागातील आमदार महेंद्रसिंह
भाटी यांची १९९२मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात
आली होती.या हत्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील
कोणत्या वादग्रस्त राजकीय नेत्यास आणि अन्य
तिघांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने
जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे?
== डी. पी. यादव
१८) 'टाडा'अंतर्गत १९९४ मधील एका प्रकरणामध्ये
लष्कर-ए-तय्यबाचा कोणत्या दहशतवाद्यास
दिल्ली कोर्टाने निर्दोष सोडले?
== अब्दुल करीम टुंडा
१९) सलग तीन एकदिवसीय शतक करणारे ६ खेळाडू
जहीर अब्बास और सईद अन्वर (पाकिस्तान), हर्शल
गिब्स, एबी डिव्हीलियर्स आणि क्विंटन डि कॉक (दक्षिण
अफ्रीका) व रॉस टेलर (न्युझीलंड)
२०) अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी अमेरिकेचे
पाकिस्तान मधील राजदूत म्हणून
कोणाची नियुक्ती केली आहे?
== डेविड हेल
Bookmark
Bookmark this Blog
Sunday, March 15, 2015
चालु घडामोडी १३
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment