Bookmark

Bookmark this Blog

Monday, March 30, 2015

चालु घडामोडी १६

चालू‬ घडामोडी:- मार्च २०१५

०१)आयसीसीचा वर्ल्डकप संघ:-
ब्रॅण्डन मॅकलम (कर्णधार, न्यूझीलंड), मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड), कोरी अँडरसन (न्यूझीलंड), डॅनिएल व्हिटोरी (न्यूझीलंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), कुमार संगकारा (श्रीलंका), स्टिव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), ए.बी.डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), मॉर्नी मोर्केल (दक्षिण आफ्रिका), ब्रेंडन टेलर १२वा खेळाडू (झिम्बाब्वे).

०२) २०१५ पर्यत ऑस्ट्रेलियाने एकूण कितव्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे?
== ५ वेळेस
>१९८७-अॅलन बोर्डर
>१९९९-स्टीव्ह वॉ
>२००३-२००७-रिकी पाँटिंग
>२०१५-मायकल क्लार्क

०३) न्यूझीलंडला नमवून विजेतेपद पटकाविणाऱ्या ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप ट्रॉफी कोणी प्रदान केली?
== आयसीसीचे कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन
>आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल

०४) आयसीसीच्या नियमानुसार विजेत्या टीमला ट्रॉफी अध्यक्षांच्या हस्ते दिली जाते. आयसीसी कोणत्या अध्यक्षांनी सर्वप्रथम वर्ल्ड कपमध्ये विजेत्या टीमला पहिल्यांदा ट्रॉफी दिली होती?
== जगमोहन दालमिया-१९९९ मध्ये

०५) इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा विजेते:-
>महिला एकेरी-सायना नेहवाल,उपविजेती-रॅचनॉक इन्टॅनन-थायलंड
>पुरुष एकेरी-के. श्रीकांत,उपविजेता-व्हिक्टर अॅक्सेलसन-डेन्मार्क

०६) केंद्र सरकार पुरस्कृत सर्व योजनांचे प्रभावी संचलन करण्यासाठी तसेच, त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी 'निति आयोगा'तर्फे विशेष समितीची स्थापना करणार आहे.ही समिती कोणाच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
== निति आयोगाच्या सीईओ सिंधुश्री खुल्लर

०७) हैदराबाद फंड वादात पाकिस्तानचे वर्तन अनुचित असल्याचे सांगून भारताला एक कोटी ३९ लाख रुपये देण्याचा आदेश पाकिस्तानला कोणी दिला आहे?
== लंडन कोर्टाने
>वादात भारत, द नॅशनल वेस्टमिन्स्टर बँक आणि निजामाचे उत्तराधिकारी मुकर्रम जाह व मुफ्फखम जाह यांचा समावेश.
>२० सप्टेंबर १९४८ मध्ये तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या अर्थमंत्र्यांकडून नऊ कोटी ३९ लाख रुपये पाकिस्तानचे तत्कालीन उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहिमतुल्ला यांच्या वेस्टमिन्स्टर बँकेतील खात्यात जमा.

०८) मिझोरामचे राज्यपालपदावरून हटविण्यात आलेले राज्यपाल कोण?
== अझिझ कुरेशी
>बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे मिझोरामच्या राज्यपालपदाचा तात्पुरता कार्यभार सोपवला आहे

०९) सरकारने देशातील प्रमुख अशा किती बंदरांनजीक अत्याधुनिक शहरे (स्मार्ट सिटीज्) विकसित करण्याचे ठरविले असून या बंदरांना रेल्वेमार्गांनी जोडण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे?
== १२

१०) केंद्र सरकारने अतिरिक्त राष्ट्रीय जलमार्गांसाठी निवडलेल्या १०१ नद्यांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे?
== अंबा, अरुणावती, मांजरा (महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगण), नागनदी, पैनगंगा, सावित्री, शास्त्री नदी (जयगड) आणि उल्हास

११) क्रिकेट वर्ल्डकप २०१५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते कोणास सन्मानित करण्यात आले?
== जेम्स फॉकनर

१२) ग्लॅमरच्या दुनियेत अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या 'एफबीबी फेमिना मिस इंडिया २०१५' पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे?
== अदिती आर्या

१३) ढाकामध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी लेखक अविजीत रॉय यांच्यावर शस्त्रास्त्रांनी वार करत हत्या करण्यात आली होती,यानंतर पुन्हा राजधानी ढाकामध्ये आणखी कोणत्या ब्लॉगरची हत्या करण्यात आली?
== वशीकुर रहमान

१४) इबोला या घातक संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीची मनुष्यावर करण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे.ही लस कोणत्या दोन संस्थानी मिळून विकसित केली आहे?
== बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि तिनांजिन कॅनसिनो बायोटेक्नॉलॉजी

१५) भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दोन एअरबस ३३० विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली असून या विमानांची किंमत किती कोटी रुपये इतकी असणार आहे?
== ५ हजार १०० कोटी रुपये
>भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून १ हजार ६०५ कोटी रुपयांचे स्वाती हे रडार खरेदी प्रस्तावाला ही मंजुरी
>एअरबोर्न वॉìनग अँड कंट्रोल सिस्टीम (एवॅक्स)

१६) वर्ल्डकप २०१५ चा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते कोणास सन्मानित करण्यात आले?
== मिशेल स्टार्क

१७) सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या मूलभूत मूल्यापुढं बाकीच्या गोष्टी दुय्यम असल्याचा निर्वाळा कोणत्या खटल्यात दिला होता?
== १९५० मध्ये रोमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य खटल्यात,
>वृत्तपत्र पृष्ठसंख्या आणि किंमतप्रकरणी १९६२ मध्ये सकाळ पेपर्सनं दाखल केलेल्या याचिकेत,
>१९७३ च्या बेनेट अँड कोलमन आणि १९८५ च्या इंडियन एक्‍स्प्रेस खटल्यात

१८) PSF :-प्राइस स्टेबिलायजेशन फंड(Price Stabilization Fund)

१९) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता अत्यावश्यक करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
== राजस्थान

२०) घुमान मराठी साहित्य संमेलनाची मुख्य संयोजक संस्था कोणती आहे.जीने घुमान हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी केली आहे?
== सरहद(पुणे)

No comments:

Post a Comment