Bookmark

Bookmark this Blog

Friday, January 30, 2015

चालु घडामोडी ३

जानेवारी २०१५
०१) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा २७ जानेवारीला कोणत्या कार्यक्रमाद्वारे भारतीय
नागरिकांशी रेडियोवरुन एकत्रितपणे संवाद साधणार आहेत?
== मन की बात
०२) युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधी (युनिसेफ)
यांच्यावतीने ‘सर्वासाठी शिक्षणाच्या मोहिमेचे
अपयश : शाळा सोडलेल्या मुलांसाठी जागतिक पुढाकार’
याबाबतचा अहवाल:-
>भारतात ५८.८१ दशलक्ष मुली तर ६३.७१ दशलक्ष मुले
शाळेत जातात.
>२०११ मध्ये १४ लाख मुले प्राथमिक शाळेपासून वंचित होती.
यात मुलींचे प्रमाण १८ टक्के तर मुलांचे प्रमाण १४ टक्के होते.
>भारतातील ७ ते १४ वयोगटातील १४ टक्के
मुलेही बालकामगार आहेत.
>२००० ते २०१२ या बारा वर्षात शाळेत जाणा-
या मुलांची संख्या एक कोटी १६
लाखांनी वाढवण्यात भारताला यश मिळाले आहे. मात्र, १४ लाख
मुलांच्या नशिबी अजूनही शाळा नाही,
>२००० ते २०१२ या काळात दक्षिण आशियातील शाळेत जाणा-
या मुलांची संख्या २ कोटी ३० लाखने
वाढली.
०३) केंद्रीय अर्थसंकल्प २०१५:-
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावावर
चर्चा:-२४ आणि २५ फेब्रुवारी
>अर्थसंकल्पीय अधिवेशन:- २३ फेब्रुवारी-२०
मार्चपर्यंत २० एप्रिल रोजी दुसऱ्या सत्राला सुरुवात
>आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल:- २७ फेब्रुवारी
>रेल्वे अर्थसंकल्प:- २६ फेब्रुवारी
>केंद्रीय अर्थसंकल्प:- २८ फेब्रुवारी
अधिवेशन संस्थगित:-०८ मे
०४) २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ‘फरिश्ता’
या कादंबरीतील काही भाग
"पीके' चित्रपटाच्या कथानकात वापरल्याचा आरोप
कोणी केला आहे?
== कपिल इसापुरी (दिल्ली उच्च न्यायालयात
याचिका दाखल)
०५) नायजेरियातील वंचित विद्यार्थी व
आदिवासींच्या सहकारी संस्थांच्या उत्थानासाठी काम
करणार्या विदर्भातील कोणत्या तरुणाला राणी एलिझाबेथ
यांचा प्रतिष्ठेचा तरुण नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला आहे?
== अक्षय जाधव
०६) भारतात गेल्या सहा महिन्यात ज्या घटना घडल्या आहेत त्यात
हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय दिसत असून त्यामुळे देशात
बहुसंख्याकवादाचा धोका नाकारता येत नाही, असे मत
कोणत्या अमेरिकी इतिहासकाराने व्यक्त केले आहे?
== डेव्हिड लेलिव्हेल्ड
०७) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
यांनी स्मार्ट खेडे व स्मार्ट प्रभाग
कार्यक्रमाची सुरूवात कोठून केली आहे?
== पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ातील वेलिवेणू
०८) ज्येष्ठ विचारवंत, राजकीय अभ्यासक
आणि 'स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज'चे
(सीएसडीएस) संस्थापक
असणार्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== रजनी कोठारी
०९) कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, फुटस्टेप्स इन टू दि फ्युचर, डायग्नोसिस
ऑफ दि प्रेझेण्ट वर्ल्ड अॅण्ड ए डिझाइन फॉर एॅन ऑल्टरनेटिव्ह,
पॉलिटिक्स इन इंडिया,अनइझी इज दि लाइफ ऑफ माइण्ड
या पुस्तकांशी संबंधित विचारवंत कोण?
== रजनी कोठारी
१०) बांगलादेशातील कोणत्या वादग्रस्त लेखिका यांचा व्हिसा रद्द
करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर
सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे?
== तस्लिमा नसरीन(याचिकाकर्ते:- अखिल भारतीय
मानव हक्कआणि सामाजिक न्याय मंच)

2 comments: