Bookmark

Bookmark this Blog

Thursday, January 29, 2015

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माहिती


1. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण
होते ?
==> यशवंतराव चव्हाण
2. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद कोणत्या कालावधीत
सांभाळले ?
==> 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962
3. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद केंद्रातील
कोणत्या जबाबदारीच्या पदावर तत्कालीन
वेळेची गरज म्हणून जावे लागले म्हणून सोडले ?
==> संरक्षणमंत्री
4. यशवंतराव चव्हाण यांच्या कारकीर्दीतील
काही महत्त्वाचे निर्णय कोणते ?
==> कसेल त्याची जमीन हा कुळकायदा,
कोयना जलविद्युत प्रकल्प, साहित्य
संस्कृती मंडळ
5. यशवंतराव
चव्हाण यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> मारोतराव कन्नमवार
6.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान
होणारा पहिला विदर्भपुत्र कोण ?
==> मारोतराव कन्नमवार
7. मारोतराव कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद कोणत्या कालावधीत
सांभाळले ?
==> 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963
(एका वर्षापेक्षा थोडा जास्त कालावधी)
8. मारोतराव कन्नमवार
यांच्या कारकीर्दीतील काही महत्त्वाचे
निर्णय कोणते ?
==> ओझरचा मिग कारखाना, वरणगाव-
भंडारा आणि भद्रावती येथील संरक्षण
साहित्य उत्पादनाचे कारखाने
9. पदावर असताना निधन पावलेले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ?
==> मारोतराव कन्नमवार
10.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान
होणारा पहिला कोकणपुत्र कोण ?
==> परशुराम कृष्णाजी सावंत (काळजीवाहू
मुख्यमंत्री) , बॅरीस्टर ए.आर.अंतुले (नियमित
मुख्यमंत्री)
11. मारोतराव कन्नमवार
यांच्या अकाली मृत्यूनंतर नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> पी.के.सावंत (काळजीवाहू मुख्यमंत्री)
12. पी.के.सावंत यांनी किती काळ
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून
काम सांभाळले ?
==> 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963
(दहा दिवस)
13. मारोतराव कन्नमवार यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या (नियमित)
मुख्यमंत्री पदी कोण विराजमान झाले ?
==> वसंतराव नाईक
14. मारोतराव कन्नमवार ह्यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला होता ?
==> चंद्रपूर
15. वसंतराव नाईक ह्यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला होता ?
==> यवतमाळ
16. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी सर्वाधिक
काळ विराजमान होणारे मुख्यमंत्री कोण ?
==> वसंतराव नाईक (एकूण 4097 दिवस)
17. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी सर्वाधिक
वेळा विराजमान होणारे मुख्यमंत्री कोण ?
==> वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील
आणि शरदचंद्र पवार (प्रत्येकी 3 वेळा )
18. एका पेक्षा जास्त
वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले
व्यक्ती कोण ?
==> वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील
आणि शरदचंद्र पवार (प्रत्येकी 3 वेळा ) ,
शंकरराव चव्हाण , विलासराव देशमुख, अशोक
चव्हाण (प्रत्येकी 2 वेळा )
19.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद
भूषविणारी महिला कोण ?
==> आजवर एकही नाही.
19. वसंतराव नाईक यांनी सलग तीन
वेळा मुख्यमंत्री पद सांभाळले हे विधान चूक
की बरोबर ?
==> बरोबर. (असे करू शकलेले एकमेव मुख्यमंत्री)
20. अन्नधान्याच्या बाबतीत
महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करणारी 'हरित
क्रांती' यशस्वीपणे
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत
राबविली गेली ?
==> वसंतराव नाईक
21. 'पाणी आडवा पाणी जिरवा'
मोहिमेला प्रोत्साहन, आरे
कॉलनीचा विकास, नव्या शेती तंत्रास
चालना आणि रोजगार हमी योजनेचा शुभारंभ
ह्या बाबी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी कारकिर्दीशी संबंधीत
आहेत ?
==> वसंतराव नाईक
22. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद कोणत्या कालावधीत
सांभाळले ?
==> 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975
23.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान
होणारा पहिला मराठवाड्याचा सुपुत्र
कोण ?
==> शंकरराव चव्हाण
24. मारोतराव कन्नमवार यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> शंकरराव चव्हाण
25. जायकवाडी प्रकल्प,
विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प, उजनी,
इसापूर, पैनगंगा, अप्पर मांजरा प्रकल्प
ह्या पाटबंधारे
प्रकल्पांच्या उभारणीसाठी घेतलेला पुढाकार
आणि कापूस एकाधिकार योजना,
आदिवासी आश्रमशाळा, उर्दू
अकादमीची स्थापना आणि गृहनिर्माण मंडळ
आदि महत्त्वपूर्ण कामांमुळे कोणाची कारकीर्द
गौरवली गेली ?
==> शंकरराव चव्हाण
26. शंकरराव चव्हाण ह्यांचा जन्म कोठे
झाला होता ?
==> पैठण जि.औरंगाबाद
27. शंकरराव चव्हाण
ह्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पद वसंतराव
नाईक ह्यांच्या नंतर 1975 ते 1977
ह्या कालावधीत भूषविले.
त्यांची मुख्यमंत्री पदाची दुसरी कारकीर्द
1986 ते 1988 ह्या कालखंडात कोण
मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देवून पायउतार
झाल्यावर झाली ?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर
28. शंकरराव चव्हाण ह्यांच्या नंतर 1977
साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण
विराजमान झाले ?
==> वसंतदादा पाटील
29. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील
ह्या दोन मुख्यमंत्र्यांचा जन्म पश्चिम
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात
झाला होता ?
==> सांगली
30. कांद्याला आधारभूत किंमत, फलोद्यान
विकास मंडळ, ग्रामीण रस्ते विकास प्रकल्प इ.
महत्त्वाच्या निर्णयां बरोबर
सहकाराला चालना देण्याचे काम
कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केले ?
==> वसंतदादा पाटील
31. वसंतदादा पाटील ह्यांच्या पहिल्या दोन
सलग मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दी नंतर
(तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री 1983 ते 1985
ह्या काळात होते.)
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> शरदचंद्र पवार
32. महाराष्ट्रातील पहिल्या गैर-
काँग्रेसी मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री कोण होते ?
==> शरदचंद्र पवार
(पुरोगामी लोकशाही आघाडी)
33. शरदचंद्र पवार
ह्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री पद केव्हा सांभाळले ?
==> 1978 साली
34. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण
होते ?
==> शरदचंद्र पवार- वयाच्या 38 व्या वर्षी
35. शरदचंद्र पवार
ह्यांनी कोणकोणत्या कालावधीत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले ?
==> 18 जुलै 1978 ते 16 फेब्रुवारी 1980;
25 जून 1988 ते 24 जून 1991 आणि
6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995
36. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर
राज्यात किती वेळा राष्ट्रपती राजवट
लादली गेली आहे ?
==> फक्त एकदा - 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून
1980
37. 1980 च्या राष्ट्रपती राजवटी नंतर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण झाले ?
==> बॅरीस्टर अब्दुल रहेमान अंतुले
38. बॅरीस्टर ए.आर.अंतुले यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> रायगड
39. नाशिक आणि अमरावती ह्या दोन
विभागांची निर्मिती, मानखुर्द-नवी मुंबई
रेल्वे मार्गास मंजुरी, लातूर,
जालना आणि सिंधुदुर्ग ह्या नवीन तीन
जिल्ह्यांची निर्मिती आणि कुलाबा जिल्ह्याचे
रायगड असे नामकरण
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत
झाले ?
==> बॅरीस्टर अंतुले
40. बॅरीस्टर अंतुले यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> बॅरीस्टर बाबासाहेब भोसले
41. बॅरीस्टर बाबासाहेब भोसले यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> सातारा
42. श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना,
मुलींना दहावी पर्यंत मोफतशिक्षण,
अमरावती विद्यापीठाची स्थापना,
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती,
औरंगाबाद खंडपीठाची सुरुवात
आणि कोल्हापूर चित्रनगरीची सुरुवात
आदि महत्त्वाचे निर्णय
कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेत ?
==> बॅरीस्टर बाबासाहेब भोसले
43. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वात
कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण
(काळजीवाहू मुख्यमंत्री पी.के.सावंत
यांचा अपवाद वगळता)?
==> नारायण राणे
44. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वात
कमी काळ राहिलेले (चढत्या क्रमाने) चार
मुख्यमंत्री कोण ?
==> नारायण राणे (259 दिवस ) ; शिवाजीराव
पाटील-निलंगेकर (277 दिवस ) ; मारोतराव
कन्नमवार (370 दिवस ) ; बॅरीस्टर बाबासाहेब
भोसले (377 दिवस )
45. बॅरीस्टर बाबासाहेब भोसले यांच्या नंतर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण
विराजमान झाले ?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर
46. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> लातूर
47. लोकन्यायालय स्थापण्याचा निर्णय
कोणाच्या कार्यकाळात झाला?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर
48. शिवाजीराव पाटील-निलंगेकर
ह्यांच्या नंतर मुख्यमंत्री पदी विराजमान
झालेल्या मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम कोणता ?
==> शिवाजीराव पाटील-निलंगेकर=>शंकरराव
चव्हाण=>शरदचंद्र पवार=>सुधाकरराव
नाईक=>शरदचंद्र पवार=>मनोहर जोशी
49. सुधाकरराव नाईक हे वसंतराव नाईक ह्यांचे
पुत्र होते. चूक/बरोबर ?
==> चूक. पुतणे होते.
50. सुधाकरराव नाईक
यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात
झाला ?
==> यवतमाळ
51. 1994 साली राज्याचे महिला धोरण,
महिला आयोगाची स्थापना,
शेतमजुरांसाठी किमान वेतन, पहिली ते
चौथी च्या विद्यार्थ्यांना मोफत दुध असे
महत्त्वाचे निर्णय
कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतले ?
==> शरदचंद्र पवार
52. स्वतंत्र महिला व बालविकास
विभागाची स्थापना, अल्पसंख्याक
आयोगाची स्थापना, जिल्हा परिषद
अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा,
सहकारी सूत गिरण्यांची स्थापना, जलसंधारण
खात्याची निर्मिती कोणाच्या कारकीर्दीत
झाली ?
==> सुधाकरराव नाईक
53. 1995 साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-
भाजपा युतीने कोणते
मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले ?
==> मनोहर जोशी आणि नारायण राणे
54. बॅरीस्टर अंतुले आणि मनोहर
जोशी यांचा जन्म रायगड जिल्हातला तर
नारायण राणे ह्यांचा जन्म
कोणत्या जिल्ह्यात झाला ?
==> सिंधुदुर्ग
55. नवे शैक्षणिक धोरण, मातोश्री वृध्दाश्रम,
क्रीडा प्रबोधिनीची स्थापना, एका रुपयात
झुणका भाकर, सैनिकी शाळा, महाराष्ट्र
छात्र सेना , कृष्णा खोरे विकास महामंडळ,
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल
आणि महाराष्ट्र
कला अकादमीची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत
झाली ?
==> मनोहर जोशी
56. हिंगोली आणि गोंदिया हे दोन नवे जिल्हे,
28 तालुक्यांची निर्मिती,
जिजामाता महिला आधार विमा योजना,
बळीराजा संरक्षण विमा योजना, पर्यटन
क्षेत्रास उद्योगाचा दर्जा, ऊस
तोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा,
1999 हे वर्ष राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान
वर्ष म्हणून साजरे असे धडाडीचे निर्णय
कोणाच्या कारकिर्दीत झाले ?
==> नारायण राणे
57. नारायण राणे ते पृथ्वीराज चव्हाण
यांच्या कारकिर्दीतील मुख्यमंत्र्यांचा योग्य
क्रम कोणता ?
==> नारायण राणे=>विलासराव देशमुख=>
सुशीलकुमार शिंदे=> विलासराव
देशमुख=>अशोक चव्हाण=>पृथ्वीराज चव्हाण
58. महाराष्ट्र
राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहिलेले
नातेवाईक कोण?
==> वसंतराव नाईक-सुधाकरराव नाईक (काका-
पुतणे); शंकरराव चव्हाण -अशोक चव्हाण (पिता-
पुत्र)
59. महाराष्ट्र
राज्याच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात
असलेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले
आणि शेवटचे मुख्यमंत्री कोण ?
==> यशवंतराव चव्हाण
60. द्विभाषिक मुंबई
राज्याच्या स्थापनेपूर्वीच्या स्वातंत्र्य
प्राप्तीनंतरच्या कालखंडात बॉम्बे प्रांताचे
(Bombay State) चे मुख्यमंत्री कोण होते ?
==> सर्वप्रथम बाळासाहेब खेर आणि त्या नंतर
मोरारजी देसाई

��अधिक माहितिसाठि भेट द्या mahampsc.tk

2 comments: