Bookmark

Bookmark this Blog

Thursday, January 29, 2015

चालु घडामोडी २

Keep visit mahampsc.tk
जानेवारी २०१५
०१) बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न:-
महाजन आयोग
साक्षी-पुरावे तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने
नेमलेली एकसदस्यीय समिती:- डॉ. माम्मोहन सरीन
(जम्मू-कश्मीरचे निवृत्त राज्यपाल)
०२) आयआयटीएम, पुणे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ
ट्रॉपकिल मेटेरोलॉजी) आणि मुंबई
महापालिका यांच्या सहकार्याने प्रादेशिक
हवामानखात्याचा कोणता प्रकल्प राबविण्यात येत
आहे?
== 'सफर, मुंबई' (सिस्टिम ऑफ एअर
क्वालिटी फॉरकास्ट अॅण्ड रिसर्च)
०३) ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि रयत शिक्षण संस्थेचे
कार्याध्यक्ष असलेल्या कोणत्या व्यक्तीचे निधन झाले
आहे?
== रावसाहेब शिंदे
०४) ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’चे जनक
कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== आर. के. लक्ष्मण (रासिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण)
जन्म:-२३ ऑक्टोबर, इ.स. १९२४.म्हैसूर, भारत
मृत्यू २६ जानेवारी, २०१५. पुणे, महाराष्ट्र
# आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके:-
आयडल अवर्सआर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन
ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८द इलोक्वेन्ट ब्रश
(व्यंगचित्रसंग्रह) द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र;
मराठीत -लक्ष्मणरेषा) अ डोज ऑफ लाफ्टर
( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा,
निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ
इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह)
बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४
पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर
(विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल
रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
# पुरस्कार:-
पद्मभूषण (१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे
पुरस्कार(१९८४), मराठा विद्यापीठ:-डी.
लिट.,कुसुमाग्रज प्रतिष्ठान:- गोदावरी गौरव
पुरस्कार,दि इन्डियन एक्सप्रेस:-
बी डी गोयंका पुरस्कार, हिन्दुस्तान टाईम्स:-
दुर्गा रतन स्वर्ण पदक
# आत्मचरित्र :-
The Tunnel of Time : An Autobiography
’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद:- अशोक जैन
०५) प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक,
लेखक आणि अनुवादक तसेच ८१व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
भूषविणार्या कोणत्या लेखकाचे नुकतेच निधन झाले आहे?
== म. द. हातकणंगलेकर
०६) ९५वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन ६ ते ८
फेब्रुवारी रोजी कोठे आयोजित करण्यात आले आहे?
== बेळगाव (उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांच्या हस्ते)
०७) ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
पंजाब राज्यातील घुमान येथे कधी आयोजित करण्यात
आले आहे?
== ३-५ एप्रिल २०१५ (स्वागत अध्यक्षपदी:- भारत
देसडला)
०८) प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदक जाहीर झालेले
कोणते जवान काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात हिज्बुल
मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत
शहीद झाले?
== कर्नल एम. एन. राय
०९) प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा एकूण ९६७
पोलिस पदकांची आणि ३७४ शौर्य
पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
>एक अशोक चक्र
>तीन कीर्तीचक्र,
>१२ शौर्य चक्र,
>४८ सेना पदकं (शौर्य),
>दोन नौसेना पदकं (शौर्य),
>११ वायुसेना पदकं (शौर्य),
>२८ परम विशिष्ट सेना पदकं,
>तीन उत्तम युद्ध सेवा पदकं,
>तीन अतिविशिष्ट सेवा पदकं,
>५३ अतिविशिष्ट सेवा पदकं,
>१३ युद्ध सेवा पदकं,
>४२ सेवा पदकं (कर्तव्याप्रती निष्ठा),
>आठ नौसेना पदकं (कर्तव्याप्रती निष्ठा),
>१९ वायुसेवा पदकं (कर्तव्याप्रती निष्ठा),
>चार विशिष्ट सेवा पदकं आणि
>१२४ विशिष्ट सेना पदक
१०) यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ९६७
जणांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत.
>२५ जणांना शौर्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते
पोलिस पदक,
>९८ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
>तर ७१२ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक
>५६ जणांना जीवन रक्षक पदक’
११) बराक
ओबामा यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनामध्ये
देण्यात आलेल्या 'गार्ड ऑफ ऑनर'चे नेतृत्व करत
अशी कामगिरी बजावणारी महिला अधिकारी कोण?
== विंग कमांडर पूजा ठाकूर
१२) अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' मिशेल ओबामा भारतात
आल्या, तेव्हा त्यांनी परिधान केलेला ड्रेस अमेरिकेत
राहणाऱ्या एका भारतीय
वंशांच्या कोणत्या डिझायनरने तयार केला होता?
== डिझायनर बिभू मोहपात्रा
१३) अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या चर्चेतून झालेले करार:-
>भारत-अमेरिका नागरी अणू करार
>संरक्षण हस्तांतर
>स्मार्ट सिटी प्रकल्प
>वातावरण बदल
>विज्ञान-तंत्रज्ञानात सहकार्य
इतर महत्त्वाच्या बाबी:-
>जागतिक सुरक्षा परिषदेतील
भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा
>आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील
महत्त्वाच्या विषयांवरही भारताला मतदानाचा अधिकार
>अमेरिकेतील भारतीयांवरील सोशल
टॅक्सचा बोजा कमी करण्याचा विचार
>लष्करी साहित्यनिर्मितीत सहकार्य
>मानवरहित विमानांच्या निर्मितीसाठीही मदत
१४) केंद्र सरकारने ६६ व्या प्रजासत्ताक
दिनाच्या पूर्वसंध्येला किती पद्म
पुरस्कारांची घोषणा केली?
>९ पद्मविभूषण,
>२० पद्मभूषण आणि
>७५ पद्मश्री पुरस्कार
१५) राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो?
== २५ जानेवारी
१५) मुख्य निवडणूक आयुक्त एच. एस.
ब्रह्मा यांनी मतदार यादीत कोणता उपक्रम
वर्षभरात राबवणार असल्याचे जाहीर केले आहे?
== सोपी नोंदणी, सोपी सुधारणा
१६) दहशतवादावर भाष्य करणारा अक्षय
कुमारचा कोणत्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर
पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे?
== बेबी (नीरज पांडे दिग्दर्शित)
१७) संयुक्त अरब अमिरातीमधील ओएसएन
या आघाडीच्या टीव्ही नेटवर्कने विश्वचषकनिमित्त
३२ मीटर लांब आणि चार मीटर रुंद बॅट तयार
केली असून या बॅटचे वजन ९५० किलो आहे.ही बॅट कोठे
ठेवण्यात येणार आहे?
== आयसीसीच्या दुबई येथील अकादमीत
१८) अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठे हिमवादळ
असण्याची शक्यता वर्तविण्यात येत
असलेल्या हिमवादळाचे नाव काय आहे?
== जुनो
१९) सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन
स्पर्धेच्या महिला एकेरीत जेतेपद पटकाविणारी खेळाडू
कोण?
== सायना नेहवाल (पुरुष एकेरी:- पारुपल्ली कश्यप)
२०) स्पेनमधील लॉस लानोस येथे
असलेल्या नाटो सैन्याच्या प्रशिक्षण तळावर
लष्करी सरावादरम्यान फायटर जेट विमान कोसळले हे
विमान कोणत्या वर्गातले होते?
== ग्रीक बनावटीचे एफ-१६
२१) आफ्रिकेतील झांबिया या देशाचे सहावे अध्यक्ष
म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
== एडगर लंगू
२२) डॉ. आंबेडकर यांचे १९२१-२२ असे दोन वर्षे लंडन
येथील ज्या घरात वास्तव्य होते.ते घर कोण विकत
घेणार आहे?
== महाराष्ट्र सरकार
२३) जागतिक शिक्षण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित
करण्यात आली आहे?
== लंडन (ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त रंजन मथाई)
२४) थायलंडच्या माजी महिला पंतप्रधान
असलेल्या कोणत्या महिलेविरोधात महाभियोगास
तेथील लोकप्रतिनिधींनी
मान्यता दिली असून,यांच्यावर पाच वर्षांची राजकीय
बंदी घालण्यात आली आहे?
== माजी महिला पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा(बहुच
र्चित तांदूळ घोटाळ्यात सहभाग
असल्याचा कोर्टाचा ठपका)
२५) देशातील हिरे व्यावसायिकांना अर्थसाह्य
करणारी कोणती बँक बंद केली जाणार असून
त्याविरोधात बँकेतील ३३ कर्मचाऱ्यांनी २८ ते ३०
जानेवारी असा तीन दिवसांचा संप पुकारला आहे?
== अॅण्टवर्प डायमंड बँक (एडीबी)
२६) ऑनलाइन रिटेलमधील
अग्रणी असलेली कोणती कंपनीत मनुष्यबळापैकी सात
टक्के कर्मचाऱ्यांना (२४००) कामावरून काढून
टाकण्यात येणार आहे?
== ईबे eBay
२७) केरळमध्ये ३१ जानेवारीपासून सुरू होत
असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे
किती खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे?
== ५१५ खेळाडूंसह ११८ मार्गदर्शक आणि व्यवस्थापक
>पथकप्रमुख:-अॅड. धनंजय भोसले
>ध्वजवाहक:-नेमबाज राही सरनोबत
२८) आर. के. लक्ष्मण आणि त्यांचे सहकारी-मित्र
बाळासाहेब ठाकरे या दोघांचा आदर्श कोण होते?
== डेव्हिड लो (कर्नल ब्लिम्प:-हे प्रसिध्द पात्र)
२९) इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण
मूर्ती यांनी ब्रिटनमधील
महात्मा गांधींच्या स्मारकासाठी किती रुपयांची देणगी दिली आहे?
== २ लाख पौंड
३०) ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने
ऑस्ट्रेलियाचा कोणत्या गोलंदाजाला सर्वोत्तम
क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर केला आहे?
== सीन एबॉट (एबॉटच्या चेंडूने फिल ह्यूजेसचा मृत्यू
झाला होता)
३१) कोणत्या तामिळ वर्तमानपत्रावर
चार्ली हेब्दोप्रमाणेच हल्ला करणार
असल्याची धमकी मिळाली आहे?
== दिनामलार
३२) पोलीस उपनिरीक्षकांची पदे बढतीने
भरण्यासाठी घेण्यात येणा-या खात्यांतर्गत परीक्षेत
‘ओबीसी’ व माजी सैनिक या दोन्ही प्रवर्गातील
उमेदवार कमाल वयोमर्यादेत एकूण
किती वर्षांची सवलत मिळण्यास पात्र ठरतो,
असा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने
(मॅट) दिला आहे?
== १० वर्षे
३३) गोव्याचे सुपुत्र, संस्कृत विद्वान, इतिहासकार,
लेखक, संगीतकार, भाषातज्ज्ञ तथा चित्रकार
असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== डॉ. जुझे परेरा
३४) भारत-अमेरिकेने संरक्षण रूपरेखा (डिफेन्स फे्रमवर्क
अॅग्रीमेंट) हा द्विपक्षीय करार
किती वर्षांसाठी आणखी वाढविण्यास सैद्धान्तिक
सहमती दिली़ आहे?
== १० वर्षे
३५) राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा करण्यात
येतो?(National Girl Child Day)
== २४ जानेवारी
३६) खुशवंत सिंह मेमोरियल पुरस्काराने कोणास
सन्मानित करण्यात आले आहे?
== अरुंधति सुब्रमण्यम
३७) केरळ मध्ये आयोजित ३५व्या राष्ट्रीय खेळांचे
उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
== व्यंकय्या नायडू
३८) केरळ मध्ये आयोजित ३५व्या राष्ट्रीय खेळांचे
घोषवाक्य काय आहे?
== Get Set Play
३९) पाकिस्तानातील कराचीजवळील ओरांगी येथे क्लब
क्रिकेट सामने सुरू असताना कोणत्या खेळाडूचा छातीवर
चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे?
== झिशान मोहम्मद
४०) खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकास
अमेरिकेच्या केपलर या दुर्बिणीमधून अवकाशाचा वेध घेत
असताना विश्वामधील सर्वांत
जुनी सौरव्यवस्था शोधण्यात यश आले आहे.
या सौरव्यवस्थेमध्ये एकूण पाच ग्रह आढळले असून
या सौरव्यवस्थेमधील मुख्य तारा कोणता?
== केपलर ४४४

No comments:

Post a Comment