Bookmark

Bookmark this Blog

Saturday, April 11, 2015

चालु घडामोडी २१

‪#‎चालू‬ घडामोडी:-एप्रिल २०१५

०१) पोलीस, अग्निशमन दल किंवा अ‍ॅम्ब्युलन्स अशा कोणत्याही प्रसंगी किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत संपूर्ण देशभर कोणता क्रमांक वापरता येऊ शकेल, असे दूरसंचार नियामक मंडळ(ट्राय) ने सुचविले आहे?
== ११२
- अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘९११‘ आणि ब्रिटनमध्ये ‘९९९‘ हा क्रमांक राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून वापरला जातो.या धर्तीवर टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (ट्राय) ही शिफारस केली आहे.
- ११२ क्रमांक सरकार संपूर्ण देशभर लोकांमध्ये व्यापकपणे प्रचार करून पोहोचवू शकते व सध्याचे १००, १०१, १०२ आणि १०८ हे क्रमांक दुय्यम म्हणून कायम राखू शकते, असेही सुचविण्यात आले आहे. कोणीही वरील क्रमांक लावला (डायल) की तो नव्या ११२ क्रमांकावर आला पाहिजे.
- कोणताही मोबाईल किंवा लँडलाईन फोनवरून फोन करता येत नसेल किंवा हे फोन तात्पुरते बंद केलेले असतील तरीही ११२ या क्रमांकावर त्यावरून फोन करता आला पाहिजे.

०२) संकटात सापडलेल्या लोकांचे फोन कॉल्स हाताळण्यासाठी ट्रायने कशाची शिफारस केली आहे?
== पब्लिक सेफ्टी आन्सरिंग पॉर्इंटस् (पीएसएपी)

०३) संकटप्रसंगी द्यायच्या मदतीचे समन्वयन करण्यासाठी पीएसएपीअंतर्गत कोणती पद्धती तयार करण्याचीही शिफारस ट्रायने केली आहे?
== प्रतिसाद व्यवस्थापन पद्धती (रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टीम)

०४) नव्या वित्तीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व खात्यांचे हिशेब अद्ययावत करण्याची कामगिरी ‘ईपीएफओ’ने आपल्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पार पाडली असून नव्या वित्तीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी किती कोटी खात्यांचे हिशेब पूर्ण करून ती त्या दिवसापर्यंत अद्ययावत करण्यात आली आहे?
== १५.५४ कोटी खाती

०५) फोर्ब्सने प्रसिध्द केलेल्या जागतिक १०० श्रीमंत अरब व्यक्तींमध्ये कोणी अव्वल क्रमांक पटकावला आहे?
== सौदी अरेबियाचे राजे अलवलीद बीन तलाल अल सौद
- अलवलीद सौद यांच्याकडे तब्बल २२.६ बिलियन डॉलर अर्थात ( १ लाख ४० हजार कोटी रुपये ) कोटींची संपत्ती आहे.

०६) जगातील सर्वाधिक वृद्ध जपानी महिला मिसाओ ओकावा यांचे निधन झाले होते. त्यानंतर सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्तीचा किताब गर्टरुड विव्हर यांना देण्यात आला होता पण त्यांचेही नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?
== ११६ व्या वर्षी
गर्टरुड विव्हर यांचे अमेरिकेतील अर्कान्सास येथे निधन झाले. विव्हर न्यूमोनियाने पीडित होत्या.

०७) जागतिक आरोग्य संघटना ७ एप्रिल २०१५ पासून कोणते आरोग्य जागृतीपर अभियान राबविणार आहे?
== शेतापासून ताटापर्यंत
- जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर मार्गारेट चांग

०८) अवघ्या ३९ दिवसांत मंगळावर मानव पाठविणारे यान तयार करण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) टेक्सास येथील कोणत्या कंपनीला दहा दशलक्ष डॉलर्स अनुदान मंजूर केले आहे?
== अ‍ॅड अ‍ॅस्ट्रा रॉकेट

०९) नुकतेच कोणत्या १०० वर्षांच्या जपानी महिलेने १५०० मीटर पोहण्याची स्पर्धा एक तास १५ मिनिटे व ५४.३९ सेकंदांत पूर्ण केली आहे?
== मिको नागाओका

१०) अमेरिकेचे संरक्षणमंत्री असलेले कोणते नेते मे महिन्यामध्ये भारताचा दौरा करणार आहेत?
== अ‍ॅश्टन कार्टर

११) आयोडिनयुक्त जीवनरक्षक टिकलींचे (बिंदी) उत्पादन करणारी सेवाभावी संस्था कोणती?
== ग्रे फॉर गूड
- सिंगापूरच्या ग्रे ग्रुपने नीलवसंत वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संशोधन केंद्राच्या संयुक्त सहकार्याने ‘ग्रे फॉर गूड’ नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केली आहे.

१२) देशात घनकचरा व्यवस्थापनाची एकूण काय स्थिती आहे याविषयी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या अहवालानुसार देशात सर्वाधिक कचरा कोठे तयार होतो?
== महाराष्ट्र (मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये)

१३) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार:-
- देशातील सव्वाशे कोटी नागरिक रोज १ लाख ४३ हजार ४४९ टन कचरा करतात. त्यात महाराष्ट्रात तयार होणाऱ्या २६,८२० टन दैनिक कचऱ्याचा वाटा १८ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी फक्त ४,७०० टन कचऱ्याचीच पद्धतशीर विल्हेवाट लावली जाते.
- अहवालानुसार जेथे रोज १०० ते ५०० टन कचरा तयार होतो अशी ७० शहरे आहेत तर ५० ते १०० टन दैनिक कचरानिर्मिती करणाऱ्या शहरांची संख्या ६० आहे.

१४) मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये कोणत्या टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे?
== सायंकाळी ६ ते रात्री ९ या महत्त्वाच्या वेळेत (प्राइम टाइममध्ये)
- शिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची माहिती देणारी चित्रफीत प्रत्येक चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर दाखविली जाईल.

१५) मराठा समाजासाठी आरक्षित केलेल्या किती टक्के जागा राज्य सरकारला रिकाम्या ठेवता येणार नाहीत़ अंतिम निर्णय होईपर्यंत त्या जागांवर हंगामी स्वरुपाची भरती केली जावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले़ आहेत?
== १६%
- मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा व न्या. गिरीश कुलकर्णी खंडपीठ
- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिम समाजास आरक्षण देण्यासाठी वटहुकूम काढला. त्याविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या नोकरी व शिक्षणातील आणि मुस्लिमांच्या फक्त नोकऱ्यांमधील आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली.
- नंतर सरकारने विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात या वटहुकुमाची जागा घेणारा कायदा केला. मात्र त्यातून मुस्लिमांचे आरक्षण वगळले. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा रिकाम्या ठेवल्या जातील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने फेब्रुवारीमध्ये घेतला होता़.

१६) केंद्र शासनाच्या ‘स्वदेश भ्रमण’ या पर्यटन विकासासाठी असणाऱ्या योजनेत महाराष्ट्रातून कोणत्या एकमेव जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागाचा विकास केला जाणार आह?
== सिंधुदुर्ग
- या योजनेंतर्गत तीन वर्षासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने वर्षाला १०० कोटी याप्रमाणे केंद्र शासनामार्फत निधी दिला जाणार आहे.

१७) भारतातील एकमेव धन्वंतरी मंदिराची स्थापना भुसावळमध्ये करणार्या कोणत्या आयुर्वेदाचार्य चे नुकतेच निधन झाले आहे?
== श्रीकर जळूकर उर्फ वैद्य तात्या

१८) लिबोर:-लंडन इंटरबॅंक ऑफर्ड रेट
- एखाद्या बॅंकेने अन्य बॅंकेकडून काही रक्कम कर्जाऊ घेतल्यास त्यासाठी लंडनमध्ये वेगळा व्याजदर आकारला जातो. बॅंकांनी आपसातील उसनवारीसाठी ठरवलेल्या या दराला लंडन इंटरबॅंक ऑफर्ड रेट, अर्थात लिबोर असे म्हणतात. हा दर ब्रिटिश बॅंक्‍स असोसिएशनकडून ठरवला जातो. यामुळे बॅंकांना आपसात पैसे कर्जाऊ घेताना पारदर्शी व्यवहार करणे सोपे जाते.

१९) आर्थिक बेंचमार्क ठरवण्यासाठी फिक्‍स्ड इन्कम मनी मार्केट अँड डेरिव्हेटिव्ह्‌ज असोसिएशन ऑफ इंडिया (एफआयएमएमडीए), फॉरेन एक्‍सचेंज डिलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (फेडाय) आणि इंडियन बॅंक्‍स असोसिएशन (आयबीए) या संस्थांनी मिळून कोणत्या कंपनीची स्थापना केली आहे?
== दि फायनान्शियल बेंचमार्क्‍स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

२०) इंटरनेटचा वाढता वापर आणि गरज लक्षात घेता पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मोफत वाय-फाय देण्याची योजना आखली आहे.
पहिल्यांदा मोफत वाय-फाय सुविधा कोठे सुरू झाली?
== वाराणसी- गंगाघाट

२१) देशातील पर्यटनस्थळ वाय-फाय सुविधा:-
- जगप्रसिद्ध ताजमहालबरोबरच उत्तर प्रदेशातील फत्तेपूरसिक्री आणि वाराणसी येथील सारनाथ येथे वाय-फाय सुविधा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील उत्तर प्रदेशातील या तीन जगप्रसिद्ध ठिकाणांबरोबरच दुसऱ्या टप्प्यातही सुमारे २५ स्थळांवर वाय-फाय सुरू केले जाणार आहे.
- दुसऱ्या टप्प्यात ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिर, मध्य प्रदेशमधील खजुराहो, कर्नाटकातील हंपी, महाबलीपुरम, तंजौर येथील बुद्धेश्‍वर यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील वाय-फाय पुढील वर्षात जूनपर्यंत सुरू होईल.
- बीएसएनएल तर्फे ही सुविधा पुरविली जाणार आहे.
- पहिल्या अर्ध्या तासासाठी वाय-फाय मोफत असेल, मात्र त्यानंतर वापर केल्यास शुल्क पडणार आहे.इंटरनेट वापराचे २०,३०,५० आणि ७० रुपयांचे कूपन विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे.

२२) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (डीए) सरसकट किती टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे?
== ६%
- यामुळे "डीए‘ मूळ पगाराच्या १०७ टक्‍क्‍यांवरून ११३ टक्‍क्‍यांवर झेपावणार आहे.
-‘डीए‘ वाढीचे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी अर्थमंत्रालयातर्फे एका कॅलेंडर वर्षातील ग्राहक मूल्य महागाई सूचकांक -औद्योगिक कामगार (सीपीआय-जेडब्ल्यू) गृहीत धरते.

२३)"रियल इस्टेट‘ (नियामन व विकास) विधेयक-२०१३:-
- या प्रस्तावित कायद्यानुसार बिल्डरांना साऱ्या प्रकल्पांची अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे.
- त्याचबरोबर जमिनीची खरेदी, तिचा नकाशा, गृहप्रकल्पाचा दर्जा, प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, याबाबतची सारी माहिती, लेआऊट प्लॅन आदी माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे.
- त्यानुसार घरे बांधून पूर्ण केली नाहीत, तर संबंधितांना कडक शिक्षेचीही तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे.

२४) दिल्लीच्या रस्त्यावर किती वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेली डिझेल मोटार किंवा वाहन चालविण्यास राष्ट्रीय हरित लवादाने मनाई केली आहे?
== १० वर्ष
- राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी आज यासंदर्भातील आदेश काढत डेन्मार्क, ब्राझील, चीन आणि श्रीलंकेमध्ये अशा प्रकारच्या वाहनांवर बंदी घातली जात असल्याचे उदाहरण दिले.
- हरित लवादाने गेल्यावर्षी 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेल्या पेट्रोल गाड्या चालविण्यावर बंदी घातली होती.

२५) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय:-
-घटस्फोटित मुस्लिम महिलांना घटस्फोटित पतीकडून निर्वाह भत्ता घेण्याचा अधिकार आहे.
- एखादा व्यक्तीकडे पुरेशी संपत्ती असताना पत्नी, मुले किंवा आई-वडिलांकडे लक्ष देत नसेल, तर कलम १२५ नुसार पत्नीस, मुलांना आणि आई-वडिलांना निर्वाहभत्ता देण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते.
न्यायाधीश दीपक मिश्रा आणि प्रफुल्ल सी. पंत यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.

२६) ट्‌विटरने रिट्‌विट करताना मूळ मजकूरशिवाय किती अतिरिक्त अक्षरे लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे?
== ११६

२७) ओलिस ठेवलेल्यांचे छायाचित्र ट्‌विटरवर प्रकाशित केल्याने कोणत्या देशाने ट्विटर आणि युट्युब वापरण्यास बंदी घातली होती.परंतु नंतर ही बंदी उठविण्यात आली?
== तुर्की

२८) आरोपीविरुद्ध खटला दाखल न करता अनिश्‍चित काळापर्यंत त्याला तुरुंगात ठेवण्याची मुभा देणारे वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने पुन्हा एकदा संमत केले आहे?
== मलेशिया

२९) राजधानी दिल्लीतील कोणत्या मोस्टवॉन्टेड गँगस्टरला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे?
== नीरज बवाना

३०) युद्धजर्जर येमेनमधून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करणाऱ्या भारताकडे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इजिप्त, सिंगापूर, इराक, लेबनॉन यासह किती देशांनी भारत सरकारकडे येमेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मदत मागितली आहे?
== २६ देशांनी

No comments:

Post a Comment