Bookmark

Bookmark this Blog

Saturday, April 11, 2015

चालु घडामोडी १९

‪#‎चालू‬ घडामोडी:-एप्रिल २०१५

०१) सत्यजित रे यांच्या गुप्तहेर कथांमधून अवतरलेला डिटेक्टीव फेलुदा १९६५ मध्ये लहान मुलांच्या कोणत्या मासिकातून प्रथम प्रकाशित झाला होता?
== संदेश(२०१५ ला ५० वर्षे पूर्ण)

०२) ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:-
३-५ एप्रिल २०१५,घुमान(पंजाब)
>ग्रंथदिंडी : विशेष सहभाग पद्मश्री सुरजितसिंग पातर
>ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन : उद्घाटक : फ.मुं. शिंदे (अध्यक्ष ८७ वे अ.मा. साहित्य संमेलन, सासवड)
>साहित्य संमेलनाचे उद्घाटन (श्री गुरूनानक देवजी सभामंडप) अध्यक्ष : प्रकाशसिंह बादल, मुख्यमंत्री,
>उद्घाटक : नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पंजाबी लेखक गुरू दयालसिंग, फ.मुं. शिंदे, डॉ. सदानंद मोरे. प्रमुख उपस्थितीः शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे.
>अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य
>अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे

०३) घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत नामदेवांची आठवण कायम रहावी, यासाठी पंजाब सरकारने त्यांच्या नावाने घुमानमध्ये कोणत्या नवीन कॉलेजची घोषणा केली आहे?
== पदवी कॉलेज

०४) घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीतील पहिल्या व एकमेव अशा कोणत्या मोबाइल विश्वकोशाचे प्रकाशन करण्यात येणार आहे?
== balaee(बलई) कोश- संचालक ललकार छडवेलकर

०५) रेल्वेचे ऑनलाइन बुकींग दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ६० दिवस आधी करता येत होतं आता नवीन नियमानुसार ते किती दिवसाआधी करता येणार आहे?
== १२० दिवस(०४ महिने)
>०१ एप्रिल २०१५ या एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक ११ लाख तिकिटांचे बुकींग झाले.

०६) मार्च २०१५ पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारावर अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणा-या इंटेलसेंटर या कंपनीने जाहीर केलेल्या सामान्य नागरी जीवन जगण्यासाठी सर्वात धोकादायक असणा-या देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा देश कोणता?
== १) इराक(८११) २) सीरिया(७१७) ३) नायझेरिया(२७३) ८) पाकिस्तान(१२२)
>कंट्री थ्रेट इंडेक्सच्या (सीटीआय) आधारावर

०७) 'इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन' चा अहवाल:-
>फेब्रुवारी २०१५अखेर जगभरातील प्रवासी विमान वाहतुकीमध्ये ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
>देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीमध्ये १४.८ टक्क्यांची वाढ झाली असून भारतात झालेली वाढ जगभरातील अन्य देशांतील वाढीपेक्षा अधिक.
>वाढ झालेल्यांमध्ये भारतापाठोपाठ ब्राझील आणि चीनचा समावेश आहे.

०८) 'टाटा समूहा'च्या कंपन्यांचे संचालन करणाऱ्या 'टाटा सन्स'च्या संचालकपदी कंपनीच्या १०३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच कोणत्या अनुभवी गुंतवणूक विश्लेषक महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे?
== फरिदा खंबाटा

०९) भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून सभासदांना मराठीसह आता किती पसंतीच्या भाषांत माहिती देण्यास सुरुवात झाली आहे?
== १०

१०) विदेश व्यापारनीती (२०१५-२०)
:-माहिती उद्योग व वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन
>२०१९-२० पर्यंत निर्यात ४६६ अब्ज डॉलरवरून ९०० अब्ज डॉलर नेण्याचे टार्गेट
>जागतिक निर्यातील भारताचा वाटा २ टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर नेणे.
>व्यापारधारित निर्यात योजना आणि सेवाधारित निर्यात योजना सुरू
>स्थानिक कच्चा माल आणि श्रमाचा वापर करून मूल्यवर्धिकत उत्पादनांची निर्यात केल्यास बक्षीस
>एसईझेडसाठी अधिक विशिष्ट प्रोत्साहने
>देशांतर्गत भांडवली वस्तू उत्पादनांना प्रोत्साहन
>विदेश व्यापारनीती 'मेक इंडिया', डि‌जिटल इंडिया, स्किल इंडियाशी सलग्न करणार
>आयात शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर भरण्यासाठी ड्युटी क्रेडिट स्क्रिप्सचा (आयात वस्तूंसाठी बँकेकडून दिले जाणारे विशिष्ट रकमेची पावतीपत्र) वापर सोपा करणार
>निर्यात प्रोत्साहन मोहिमेत राज्य सरकारांचाही समावेश होणार
>विदेश व्यापारनीतीचा आढावा दरवर्षी न घेता अडीच वर्षांनी घेतला जाणार
>संरक्षण, शेतीमाल आणि पर्यावरणस्नेही उत्पादनांच्या निर्यातीसाठी मोठ्या स्वरूपात साह्य

११) मायामी टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत एकेरीच्या कारकिर्दीतील ७००वा विजय नोंदविणारी महिला खेळाडू कोण?
== सेरेना विल्यम्स-(सबिन लिसिकी हिचा पराभव केला)

१२) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती(आयओसी) ११५ सदस्यांचे प्रस्तावित मानधन जाहीर:-
>आयओसीचे अध्यक्ष:- थॉमस बाक
>आयओसीचे चार उपाध्यक्षांसह १४ कार्यकारिणी सदस्य एकत्र येतात तेव्हा त्यांना प्रतिदिनी ९०० डॉलर (८३० युरो) इतका भत्ता मिळतो.
>अन्य सदस्यांना प्रत्येक दिवसाचे ४५० डॉलर इतका भत्ता मिळतो. सर्व आयओसी सदस्यांना प्रत्येक वर्षी एकूण ७ हजार डॉलर म्हणजेच ६४७० युरो इतका भत्ता मिळतो.
>अध्यक्षांना वार्षिक असा भत्ता नसतो किंवा दरदिवसाची भरपाईपोटी दिली जाणारी रक्कमही नसते पण नीति आयोगाने २,२५,००० युरो (२४३८०० डॉलर)
सदस्यांचे प्रस्तावित मानधन जाहीर:-
>आयओसीचे अध्यक्ष:- थॉमस बाक
>आयओसीचे चार उपाध्यक्षांसह १४ कार्यकारिणी सदस्य एकत्र येतात तेव्हा त्यांना प्रतिदिनी ९०० डॉलर (८३० युरो) इतका भत्ता मिळतो.
>अन्य सदस्यांना प्रत्येक दिवसाचे ४५० डॉलर इतका भत्ता मिळतो. सर्व आयओसी सदस्यांना प्रत्येक वर्षी एकूण ७ हजार डॉलर म्हणजेच ६४७० युरो इतका भत्ता मिळतो.
>अध्यक्षांना वार्षिक असा भत्ता नसतो किंवा दरदिवसाची भरपाईपोटी दिली जाणारी रक्कमही नसते पण नीति आयोगाने २,२५,००० युरो (२४३८०० डॉलर) इतकी रक्कम त्यांच्यासाठी निश्चित केली आहे.

१३) जागतिक रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावरील अँडी मरेने द. आफ्रिकेच्या केविन अँडरसनचे कडवे आव्हान ६-४, ३-६, ६-३ असे परतवून लावत कारकिर्दीतील कितवा विजय मिळविला आहे?
== ५००वा

१४) टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय गोलंदाजांना दिलेली नावे:-
>मोहम्मद शमी-कोलकाता नवाब
>उमेश यादव:-विदर्भ एक्सप्रेस
>मोहित शर्मा:-हरयाणा एक्सप्रेस

१५) संपूर्ण जगात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)१८० देशांशी करार केला आहे.तंबाखूबाबत जनजागृती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक जगात १३६वा आहे तर जगात पहिल्या क्रमांकावर असणारा देश कोणता?
== थायलंड
>'फ्रेमवर्क कन्व्हेंन्शन ऑन टोबॅको कंट्रोल' या नावाने २७ फेब्रुवारी, २००५पासून करार केला आहे

१६) डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वानुसार तंबाखूच्या पुडीवरील ८५ टक्के जागा वैधानिक इशाऱ्याने व्यापलेली असणे आवश्यक आहे. पण भारतात वैधानिक इशारा केवळ पुडीच्या एका बाजूला फक्त किती टक्के जागेत छापला जात आहे?
== ४०%

१७) तंबाखूच्या विरोधात जनजागृती करणार्या 'पेस' या संस्थेचा फुलफॉर्म काय आहे?
== प्रीव्हेंट अॅडिक्शन थ्रू चिल्ड्रेन्स एज्युकेशन

१८) भारतात पुरुषांमध्ये कॅन्सरने होणारे सर्वाधिक मृत्यू तोंडाच्या कॅन्सरने झाल्याचे निरीक्षण कोणत्या जगविख्यात वैद्यकीय नियतकलिकामध्ये नोंदवण्यात आले आहे.
== लॅन्सेट
>केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाच्या अखत्यारितील ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडियाच्या (गॅटस् इंडिया) सर्व्हेनुसार महाराष्ट्रात २६.६ टक्के लोक धूररहित तंबाखूचे म्हणजे खर्रा, जर्दा, खैनी, मिश्रीचे मुख्यत्वे सेवन करतात.

१९) भारतीय डाक विभागाची 'मनी आॅर्डर' ही १३५ वर्षांची जुनी सेवा कधीपासून बंद करण्यात आली आहे?
== ०१ एप्रिल २०१५

२०) येमेनमधील युद्ध परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीयांना हवाई दलाच्या विशेष विमानाने कोणत्या विमानतळावर आणण्यात आले?
== मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

२१)'संत नामदेव एक्स्प्रेस'ला मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे संमेलनाचे बोधचिन्ह असलेला झेंडा कोणी दाखवला?
== राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी
>नांदेड येथून श्री नानकसाई फाउंडेशन, नाशिकच्या महिला आणि पुरुषांचं ढोलपथक, नरसी नामदेव गावची ग्रंथदिंडी, कवी नारायण सुमंत यांच्या मोडनिंब गावची दिंडी एक्सप्रेस ने रवाना.

२२) राज्यातील ६२ तालुक्यांमध्ये ०१ एप्रिल २०१५ पासून कम्प्युटराइज्ड सातबारा उपलब्ध होणार असून अन्य तीनशे तालुक्यांमध्ये या योजनेचा 'ट्रायल रन' सुरू होत आहे.संपूर्ण राज्यभरात ही योजना कधी सुरू होण्याची तयारी करण्यात आली आहे?
== ०१ मे २०१५
>राज्याचे जमाबंदी आयुक्त संभाजी कडूपाटील

२३) घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या स्मृतिचिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
== ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी

२४) भारतीय टपाल खात्याच्या 'माय स्टॅम्प' या योजनेंतर्गत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले असून साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच संमेलनाचे टपाल तिकीट प्रसिद्ध झाले आहे? पाच रुपयांच्या या तिकिटावर संमेलनाच्या बोधचिन्हासह कोणत्या फुलाचा समावेश करण्यात आला आहे?
== पिवळ्या रंगाच्या लिलीच्या फुलाचा

२५) राज्यातील सकाळ व सायंकाळच्या कोर्टांसाठी १४व्या वित्त आयोगात तरतूदच नसल्याने, ही सर्व न्यायालये कधीपासून बंद करण्यात आली आहेत?
== ०१ एप्रिल २०१५ पासून
>मुंबई व नागपूर येथील सायंकालीन मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा अपवाद वगळता
>सन २०१०मध्ये केंद्र सरकारने देशातील कोर्टांच्या आधुनिकीकरणासाठी पाच हजार कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी ५४२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला होता. या निधीपैकी २९७ कोटी रुपये सकाळ व संध्याकाळच्या कोर्टांसाठी देण्यात आला होता.

२७) शालिनीदेवी चिंतामणी कापसे मानवधर्म सेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा भगवान महावीर मानवधर्म अहिंसा गौरव पुरस्कार यावर्षी कोणास प्रदान करण्यात येणार

No comments:

Post a Comment