०१) घुमान साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि
समारोप सोहळ्याचे कोणत्या वाहिनीवरून
फुकट प्रसारण न करण्याचा निर्णय 'प्रसार
भारती'ने घेतला आहे?
== डीडी सह्याद्री
०२))सरकारी योजनांविषयी जनतेच्या
तक्रारी आता थेट पंतप्रधान कार्यालयात
पोहोचवता येण्याची सुविधा उपलब्ध करून
देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते कोणते पोर्टल सुरु करण्यात आले आहे?
== प्रगती(Pro-Active Governance And Timely
Implementation)
०३) राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
किशोरवयीन मुला-मुलींसाठी सार्वजनिक
आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र टोल फ्री
हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, त्याचे
उद्घाटन कोणाच्या हस्ते वर्षा निवासस्थान
येथे करण्यात आले आहे?
== मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस
>हेल्पलाइन क्रमांक:- 18002332688
०४) राज्यात इलेक्ट्रीक बसेस धावणार असून
यात पहिल्या टप्प्यात कोणत्या मार्गांचा
विचार केला जाणार आहे?
== मुंबई- पुणे, पुणे -कोल्हापूर, औरंगाबाद- नांदेड
व अकोला ते नागपूर
०५) मूळचे जळगावचे व सध्या अमेरिकेत संगणक
अभियंता असलेल्या पंकज पाटील (तोंडापूर
ता. जामनेर) यांनी तयार केलेल्या ‘नॅनो
सेन्सर’ला जगविख्यात कोणत्या संस्थेने पेटंट
दिले आहे?
== नासा (द नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस
अॅडमिनिस्ट्रेशन)
०६) राम जाधव यांचा कार्यकाल संपुष्टात
आल्यामुळे नाट्य सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष
म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== अरुण नलावडे
०७) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)
ODI Rankings:-
>फलंदाज:-एबी डिव्हिलर्स
>गोलंदाज:-मिशेल स्टार्क
>अष्टपैलू खेळाडू:-तिलकरत्ने दिलशान
>संघ:-ऑस्ट्रेलिया
०८)शासन निर्णय:-
>सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलिसांना
एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर
ट्विट करून दिला आहे.
>यामुळे पोलिसांना सुमारे ४९० ते ९०० रुपये वेतन
मिळणार आहे.
>सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी
सायबर गुन्हे तपास शाखेत एक हजार अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती
०९) जगाच्या इतिहासामध्ये प्रथमच कोणत्या
शास्त्रज्ञाने स्वत:चे नाव "ट्रेडमार्क‘ म्हणून
नोंदविण्यास पुढाकार घेतला आहे?
>ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग
>यापूर्वी "हॅरी पॉटर‘च्या लेखिका जे. के.
रोलिंग आणि इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा
माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम यांनीही
स्वत:च्या नावाचा "ट्रेडमार्क‘ नोंदविला
आहे.
१०) दुर्मिळ एमराल्ड-कट १०० कॅरेट हिऱ्याच्या
लिलाव करण्यात येणार असून हा लिलाव कोण
करणार आहे?
== "सोथेबी न्यूयॉर्क‘ ज्वेलरी हाउस
>लंडनमधील ज्वेलरी हाउस ‘डी बिअर्स‘ला हा
हिरा दक्षिण अफ्रिकेच्या खाणीमध्ये
सापडला होता. त्यावेळी तो २०० कॅरेट होता.
११) पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात
झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास
यंत्रणेने (एनआयए) चार बांगलादेशी
नागरिकांसह किती जणांविरुद्ध आरोपपत्र
दाखल केले आहे?
== २१
१२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी
शोधलेल्या एक लाख दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ
कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून
अभ्यासक आणि वाचकांपर्यंत न पोचलेला हा
अमूल्य ठेवा लवकरच कोणत्या संकेतस्थळावर
उपलब्ध होणार आहे?
१३) भोपाळ येथील बरकतुल्ला विद्यापीठाने
अफगाणिस्तानातील कोणत्या
विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे?
== शेख झायेद विद्यापीठ
१४) बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ’क्लीन
चिट’ दिलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण
अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर
जोशी यांच्यासह किती जणांना सर्वोच्च
न्यायालयाने नोटीस पाठविली आहे?
== २०
>२०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने
नेतेमंडळींना बाबरी मशीद पाडल्याच्या
आरोपातून निर्दोष मुक्त केले होते.
>या निकालाला आव्हान देणारी याचिका
फैजाबादमधील रहिवासी हाजी मेहमदू अहमद
यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
१५)कोणत्या परदेशी कंपनीने विमान इंधन
(एटीएफ) विक्रीच्या परवानगीसाठी केलेला
अर्ज सरकारने फेटाळला आहे?
== एअर बीपी-ब्रिटीश पेट्रोलियम
१६) वाहतुकीचे इंधन असलेल्या पेट्रोल, डिझेल
आणि विमान इंधन यांच्या विक्रीचा
परवाना मिळवण्यासाठी देशातील तेल आणि
वायू संशोधन आणि उत्पादन, शुद्धीकरण,
पाईपलाईन आणि टर्मिनल यामध्ये दहा
वर्षामध्ये कंपनीची प्रत्यक्षात किंवा
प्रस्तावित किती कोटी डॉलर गुंतवणूक असणे
आवश्यक आहे?
== ५० कोटी डॉलर
१७) जापनीज मोटार उत्पादक होंडाने उपकंपनी
होंडा कार्स इंडियाच्या ‘सीईओ’पदी
कोणाची नियुक्ती केली आहे?
== कात्सुशी इनोऊ
१८) जपानच्या वाहन उत्पादक कंपनी होंडाने
उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केले असून
यासाठी भारतातील होंडा कार्स इंडिया
लिमिटेड आणि होंडा मोटारसायकल अँड
स्कुटर्स इंडिया या दोन संपूर्ण मालकी
असलेल्या उपकंपन्यांच्या माध्यमातून २०१६पर्यंत
किती कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा
केली आहे?
== ९६५ कोटी रुपये
१९) राजघाटाजवळ एकता स्थळ समाधी
परिसरात कोणत्या माजी पंतप्रधानांचे
स्मारक उभारण्याचा निर्णय मोदी सरकारने
घेतला आहे?
== माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव
>याच ठिकाणी ग्यानी झैलसिंह, व्यंकटरमण,
शंकर दयाळ शर्मा, के. आर. नारायणन या
माजी राष्ट्रपतींची स्मारके आहेत.
२०) आण्विक, जैवशास्त्रीय आणि
रसायनशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा उपयोग
शस्त्रास्त्र बनवण्यासाठी करून मोठ्या
प्रमाणात संहार घडवून आणतील, या
भीतीपोटी ब्रिटनमधील विद्यापीठांनी
किती परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश
नाकारला आहे?
== ७३९
Bookmark
Bookmark this Blog
Saturday, April 11, 2015
चालु घडामोडी २२
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment