#चालू घडामोडी:-एप्रिल २०१५
०१) कोट्यावधींच्या सत्यम घोटाळ्याप्रकरणी कोणत्या न्यायालयाने सत्यम कॉम्पुटर्सचे संस्थापक बी.रामलिंग राजू त्यांचे बंधू बी. रामा राजू यांच्यासह १० आरोपींना दोषी ठरवले आहे?
== हैदराबादच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने
- न्यायमूर्ती बी.व्ही.एल.एन चक्रवर्ती
- यापूर्वी ११ जानेवारी राजू यांच्यासह १० जणांना आंध्रप्रदेश पोलीस गुन्हे अन्वेषष विभागाकडून अटक करण्यात आली होती.
०२) सत्यम कॉम्पुटर्सचे संस्थापक बी.रामलिंग राजू यांच्यासह कोट्यावधींच्या सत्यम घोटाळ्याप्रकरणी हैदराबादच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयातर्फे कोणास दोषी ठरवण्यात आले आहे?
== सत्यम कॉम्पुटर्सचे संस्थापक बी.रामलिंग राजू यांच्यासह या प्रकऱणी त्यांचे आणि सत्यमचे माजी संचालक बी. रामा राजू, माजी प्रमुख वित्त अधिकारी वादलामनी श्रीनिवास, माजी पीडब्लूसी ऑडिट सुब्रमणी गोपालकृष्णन आणि टी. श्रीनिवास, दुसरे बंधू बी. सुर्यनारायण राजू, माजी कर्मचारी डी. रामकृष्णा, डी. व्ही.वेंकटत्रिपाठी राजू, श्रीसैलम आणि व्ही.एस.प्रभाकर गुप्ता
०३) अमेरिकन हवाई नियामक फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी (एफएए)ने भारतीय हवाई क्षेत्राचे मानांकन सुधारताना कोणते मानांकन बहाल केले आहे?
== श्रेणी-१
-१४ महिन्यांनंतर भारतीय हवाई क्षेत्राला सुरक्षिततेची ही श्रेणी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. याआधी भारतीय हवाई नियामक ‘डीजीसीए’ने आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांची पूर्तता न केल्याने हे मानांकन श्रेणी-२पर्यंत कमी करण्यात आले होते.
-अमेरिकेचे वाहतूकमंत्री अँथनी फॉक्स
०४) अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरातील शेतकर्याना यापूर्वी ५० टक्के नुकसान भरपाई दिली जात असे मात्र आता ही मर्यादा किती टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे?
== ३३ टक्के
नुकसान भरपाईच्या रक्कमेत ५० टक्के वाढही करण्यात आली आहे.
०५) चॉकलेट व बिस्किट क्षेत्रातील कॅडबरी इंडिया लिमिटेड कंपनीने कोटय़वधी रुपयांचे उत्पादन शुल्क चुकवल्याचे उघड झाले असून त्यामुळे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कंपनीला किती कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे?
== ५७० कोटी रुपये
०६) युद्धग्रस्त येमेनमधून भारताने चार हजाराहून अधिक नागरिकांची सुटका केली आहे. यासाठी कोणती मोहीम राबविण्यात आली होती?
== ऑपरेशन राहत
०७) बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी तसेच मृत गर्भाला कचरापेटीत फेकून दिल्याप्रकरणी अमेरिकन न्यायालयाने भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेला २० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे?
== पूर्वी पटेल (३३)
०८) १५ एप्रिल २०१३ रोजी बोस्टन मॅरेथॉनच्या "फिनिशिंग लाइन‘ जवळ झालेल्या दुहेरी बॉंबस्फोटांमध्ये तीन जण ठार तर १७० जण जखमी झाले होते.याप्रकरणी कोणास आरोपपत्र निश्चित करून दोषी ठरविण्यात आले आहे?
== झोहोखर त्सार्नेव्ह (वय २१)
०९) मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉंबस्फोट प्रकरणातील कोणत्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले?
== याकूब अब्दुल रझ्झाक मेमन
१०) चर्चित व्यक्ती:- याकूब अब्दुल रझ्झाक मेमन
- मुंबई साखळी स्फोटांचा सूत्रधार टायगर मेमन याचा याकूब हा भाऊ आहे.
-गुन्हेगारी कट आखणे आणि मुंबई स्फोटांसाठी आर्थिक मदत गोळा करून तिचे वाटप करणे, या आरोपांखाली मुंबईतील ‘टाडा‘ न्यायालयाने २००७ मध्ये मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती.
-मार्च २०१३मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही ‘टाडा‘ न्यायालयाचा निर्णय कायम राखला होता.
-त्यानंतर ऑक्टोबर २०१३ मध्ये मेमनने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
११) निवडणूक आयोगाचे विद्यमान मुख्य आयुक्त एच. एस. ब्रह्मा हे १९ एप्रिलला निवृत्त होत आहेत.त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे.
== नसीन झैदी
१९७६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे झैदी हे अनेक वर्षे नागरी विमान उड्डाण मंत्रालयात कार्यरत होते.
१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी ०९ ते १६ एप्रिलपर्यंत कोणत्या तीन देशांच्या भेटीवर जात आहेत?
== फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा
- अण्विक ऊर्जा, संरक्षण, अवकाश, पायाभूत क्षेत्र, गुंतवणूक आणि उद्योग व व्यापार या विषयांवर या तीन देशांचा दौरा प्रामुख्याने केंद्रित राहणार आहे.
१३) सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसाठी योगासनांचे वर्ग सुरु करण्यात आले असून याकामी कोणत्या संस्थेची मदत घेतली जात आहे?
== बह्म कुमारी
- बीएसएफ प्रमुख डी के पाठक
१४) नेदरलँड्स येथील ‘रॉयल डच शेल‘ कंपनी लवकरच ब्रिटनच्या कोणत्या ग्रुपचे अधिग्रहण करणार आहे?
== बीजी ग्रुप
-हा व्यवहार ४७अब्ज पौंड म्हणजे सुमारे ७० अब्ज डॉलरला पार पडणार आहे.
१५) एका मिनिटात चार्ज होणार्या तसेच अत्यल्प खर्च असलेल्या ऍल्युमिनियमच्या मोबाईल बॅटरीचा शोध कोणी लावला आहे?
== स्टॅण्फोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी
१६) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या वारशाच्या संवर्धनासाठी राबवण्यात येत असलेल्या 'मेरा लखनऊ' या मोहिमेची तसेच साहसी महिलांना दिल्या जाणाऱ्या 'राणी लक्ष्मीबाई नारी सन्मान' या पुरस्काराची ब्रँड अॅम्बेसडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
== फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१५ची सेकंड रनर अप वर्तिका सिंह
१७) नवीन रेल्वे सुविधा:-
- रेल्वेप्रवाशांना आपल्या प्रवासाच्या वेळात निश्चिंतपणे झोप घेता यावी, यादृष्टीने रेल्वेने एक अनोखी सेवा लागू केली आहे. उतरण्याचे स्टेशन येण्याच्या ३० मिनिटे आधी प्रवाशाला त्याच्या मोबाइलवर 'वेकअप कॉल' दिला जाणार आहे. १३९ या रेल्वे इन्क्वायरी नंबरवर व्हॉइस कॉलच्या स्वरुपात ती उपलब्ध असेल.
१८) आंध्र प्रदेशच्या कोणत्या जंगलात सुरू असलेल्या चंदन आणि रक्तचंदन तस्करीला रोखण्यासाठी राज्य पोलिस, वन विभाग तसेच विशेष कृती दलाच्या जवानांनी सुरू केलेल्या मोहिमेत २० जण ठार झाले असून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणी आंध्र सरकारला नोटीस बजावली आहे?
== सेशाचलम
-चित्तूर जिल्ह्यातील तिरूपतीजवळील श्रीशैलमच्या घनदाट जंगलात ही चकमक सुरू आहे.
१९) केंद्रीय दक्षता आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== वरिष्ठ आयएएस अधिकारी निलम साहनी
-आयोगाचे प्रमुख आलोककुमार यांची नीती आयोगाच्या अतिरिक्त सचिवपदी बदली केल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.
-साहनी १९८४च्या बॅचच्या आयएएस असून, सध्या आंध्र प्रदेशामध्ये कार्यरत आहेत. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असेल.
२०) ऑनलाइन शॉपिंगच्या दुनियेत अल्पावधीतच दबदबा निर्माण करणार्या कोणत्या कंपनीने ऑनलाइन किराणा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे?
== फ्लिपकार्ट
-बिगबास्केट, जॉपनाउ आणि लोकल बनियासारख्या ऑनलाइन कंपन्या आधीपासूनच किराण व्यवसायात आहेत.
-अॅमेझॉन आणि स्नॅपडील या कंपन्याही आधीपासूनच ऑनलाइन किराणाच्या क्षेत्रात आहेत. इतकेच नव्हे तर, अॅमेझॉन इंडियानं किराणा दुकानांच्या सहकार्यानं 'किराणा नाउ' नावानं एक्सप्रेस डिलिव्हरी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
No comments:
Post a Comment