Bookmark

Bookmark this Blog

Sunday, August 23, 2015

लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धति

�� उप दिशा कशा लक्षात ठेवाल.(घड्याळाच्या दिशेने)

"वानर इकडे आले नाही"

वा = वायव्य

ई = ईशान्य
आ = आग्नेय

ना = नैरुत्य

विषाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवायचे.

“कांदे पोइए गोड का रे झाले”.

(पोइए = पोहे असे समजावे.)

स्पष्टीकरण

१) कां = कांजण्या

२) दे = देवी

३) पो = पोलिओ

४) इ =इन्फुएन्झा

५) ए =एड्स

६) गो = गोवर.

७) ड = डेंग्यू

८) का = कावीळ

९) रे = रेबीज.

जीवाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवाल.

“धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला”.

महत्वाचे रोग खालील प्रमाणे.

१) धनुर्वात

२) क्षयरोग

३) कुष्ठरोग

४) न्युमोनिया

५) विषाचा = विषमज्वर

६) घोट = घटसर्प

७) पटकन = पटकी

गांधीजींच्या सक्रीय चळवळी क्रमाने कशा लक्षात ठेवाल.

“ चंपाच्या खेड्यातील गिरण्यांनी संप केला म्हणून गांधीजींनी रोलेट act नुसार असहकार चळवळीच्या माध्यमातून सविनय वैयक्तिक भारत सोडण्याचा निर्णय घेतला.”

१९१७ = चंपारण्य सत्याग्रह

१९१८ = खेडा सत्याग्रह

१९१८ = अहमदाबाद गिरणी संप

१९१९ = रोलेट act विरोधात सत्याग्रह

१९२०  =असहकार चळवळ

१९३० = सविनय कायदेभंग चळवळ

१९४० = वैयक्तिक सत्याग्रह

१९४२ = भारत छोडो आंदोलन

दोन वेळा नोबल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ

‘मडम आणि जॉन फ्रेडली बोलतात’

१. मडम – मडम क्युरी

२. जॉन – जॉन बारडिन

३. फ्रेंड – फ्रेंडरिक सेंगर

४. ली – लिनस पोलिंग

महाराष्ट्रातील घाट

१) आंबा कोर = आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

२) माथूना = मुंबई ते नाशिक - थळ घाट

३) बापुचादिवा = पुणे ते बारामती - दिवा घाट.

४) कुंभा चिपक = कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

५) खांबाला पूस = पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

६) फोकोगा = फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

७) मुना कसा आहेस = मुंबई ते नाशिक - कसारा घाट.

"छत्री उलटी झाले"

छ  - छत्तीसगड

उ - उत्तराखंड

झ - झारखंड

चांदीचे चार प्रमुख उत्पादक देश उतरत्या क्रमाने

‘मी पकडला चोर’

१. मी      – मेक्सिको

२. पकडला – पेरू

३. चोर     - चीन

सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे 

“साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव 

सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे 

“साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव 

अनुसूचित जमाती साठी राखीव महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ कसे लक्षात ठेवाल?

" दिपाचा नंदू कोठे गेला"

दि = दिंडोरी
पा = पालघर
चा = चिमूर
नंदू = नंदुरबार

रा...राज्ये.....वे...वेतन
शे.....शपथ
रा....राज्यसभा
आ....अनुसूचित जाती व जमाती
डे....डोंगराळ भाग आसाम,मेघालय
सू.....सूची
भा....भाषा
ज....जमीनदारी
प....पक्षातंर बंदी
स्था...स्थानिक स्वराज्य संस्था
न...नगरपालिका

भारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल.

' लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.'

१) लक्षाने - लक्ष

२) निशाना- निशांत

३) रुस्तामचे दोन रुस्तम -१

४) रुस्तम -२

५) नेत्र

No comments:

Post a Comment