Bookmark

Bookmark this Blog

Sunday, August 23, 2015

जागतिक लोकसंख्या अहवाल -२०१५

जागतिक लोकसंख्या अहवाल-२०१५

भारत २०२२ सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीरकेलेल्या अहवालात नमूद करण्यात आले
याआधीच्या अहवालात भारत २०२८ पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून अव्वल स्थान गाठेल असे म्हटले होते आता याअहवालातहे अंतर आता सहा वर्षांनी कमी
२१०० सालापर्यंत भारत या स्थानावर कायम राहील, अशी नोंद अहवालात करण्यात आली
सध्या चीनची लोकसंख्या सुमारे १३८ कोटी इतकी, तर भारताची १३१ कोटींच्या घरात आहे.
भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर २०२२ पर्यंत असाच कायम राहिला तर २०३० साली भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या आसपास असेल. २०५० साली हाच आकडा १७० कोटींच्या घरात जाऊ शकतो. चीनच्या बाबतीत २०३० पर्यंत त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर बऱयापैकी स्थिर राहील तर २०५० नंतर दर कमी झालेला असेल. २०१३ साली जाहीर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात भारत २०२८ सालापर्यंत लोकसंख्येच्या आकडेवारीत चीनच्या पुढे जाईल, असे नमूद करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment