Bookmark

Bookmark this Blog

Sunday, August 23, 2015

चालु घडामोडि ३५

चालू घडामोडी:-
---------------------------------
१) देशाच्या नवनिर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी कोणती घोषणा दिली:- स्टार्ट-अप इंडिया (नवउद्योगी भारत) आणि स्टॅण्ड-अप इंडिया (उत्तिष्ठ भारत)

२) ---------------येथील विमानतळ सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरणार आहे? :-कोच्ची

३) दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांना साहसी खेळाचा दर्जा देऊन त्याचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती.?:- आशीष शेलार

४) चीनने त्यांचे चलन युआनचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत किती टक्क्यांनी अवमूल्यन केले:- ३.६२

५) खालीलपिकी कोणाची नवे निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली ?
:- ओम प्रकाश रावत
(रावत मध्य प्रदेश कैडर चे सेवानिवृत्त आईएएस (1977 बैच) अधिकारी आहेत)

६) ट्राय च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे:- आर. एस. शर्मा

७) ज्येष्ठ उद्योगपती, हीरो सायकल्सचे अध्यक्ष आणि हीरो उद्योग समूहाचे संस्थापक ---------------यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.त्यानी ६० वर्षे हीरो सायकलचे नेतृत्व केले :-ओम प्रकाश मुंजाल

८) कोणत्या राज्यात गेल्या चार वर्षांपासून "हाथी महोत्सव‘ साजरा केला जात आहे.? :- मध्य प्रदेश

९) भारताच्या कोणत्या खेळाडूने एका कसोटीत सर्वाधिक आठ झेलांचा विश्‍वविक्रम केला.? (यष्टिरक्षक नसलेल्या क्षेत्ररक्षकाने इतके झेल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे) :-अजिंक्‍य रहाणे
(यापूर्वीचा विक्रम सात झेलांचा होता. भारताचे यजुवेंद्र सिंग, यांनी 1977 मध्ये स्वातंत्र्यदिनी इंग्लंडविरुद्ध बंगळूर कसोटीत ही कामगिरी केली होती त्यानतर ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया), हसन तिलकरत्ने (श्रीलंका), स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) आणि मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) अशा चार क्षेत्ररक्षकांनी ही कामगिरी केली आहे)

१०) टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्‍वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला ?:- "अमृत योजना‘

११) आत्ताच प्रकाशीत झालेले " भविष्य का' भारत'" हे पुस्तक लेखक कोण' आहेत:- नितीन गडकरी

No comments:

Post a Comment