संसद आदर्श ग्राम योजना:
2014 च्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जाहीर केलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेला 11 आॅक्टोबर 2114 रोजी प्रारंभ झाला (विज्ञान भवन दिल्ली).
पंतप्रधान मोदी यांनीदेखील आपल्या वाराणसी मतदारसंघातील ककरिया हे गाव दत्तक घेतले.
असे असेल आदर्श ग्राम –
सांसद आदर्श ग्राम योजना तीन टप्प्यात राबवली जाणार अाहे:
1) अल्पकाळातील कामे तीन महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये गावची स्वच्छता, अंगणवाडीत मुलांचा प्रवेश, गावात झाडे लावणे आणि आरोग्य सुविधा पुरवणे या सारखे कामे करावी लागणार आहेत.
2) मध्यम मुदतीची कामे एक वर्षात पूर्ण करायची आहेत.
3) दीर्घ मुदतीची कामे वर्षापेक्षा अधिक काळता पूर्ण करावी लागणार आहेत.
विशेष बाब म्हणजे गावाचा वाढदिवसही साजरा करण्यात येणार असून, त्यादिवशी गावाबाहेरील व्यक्तिंना बोलवून त्यांचा सन्मान करणे, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याची जबाबदारीही खासदाराचीच असणार आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहातील 795 खासदारांनी मिळून 2016 पर्यंत 795 गावे आदर्श बनवावित.
प्रत्येकवर्षी एक गाव यानुसार 2014 ते 2024 पर्यंत देशातील सहा लाख गावांपैकी जवळपास 6 हजार 360 गाव आदर्श बनतील.
स्वत:चे गाव दत्तक घ्यायचे नाही.
कृषी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानास चालना
सक्रिय आणि पारदर्शी ग्रामसभांद्वारा सुशासन व लोकशाहीला बळकट करणे
महिला सभा, बालसभा घेऊन ग्रामीण महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे
वयस्करांसहित सर्वांसाठी शिक्षणाची उपलब्धता
गावांमध्ये चांगल्या आरोग्य सेवा-सुविधा पुरविणे
ई-सेवा आणि मोबाईलच्या वापरावर भर
स्वतंत्र वेब पोर्टल सुरू
No comments:
Post a Comment