Bookmark

Bookmark this Blog

Thursday, October 8, 2015

जेष्ठ नागरीकांना धान्य व साखर योजना

ज्येष्ठ नागरिकांना धान्य व साखर योजना :

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी 35 किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणा अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी केली.

तसेच ज्या वृद्धांना मुलेसांभाळत नाहीत, त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन देण्यासाठीही शासकीय पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे :

नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या 'चेरॉन' या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत.

त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचा आणि प्लुटोच्या गहन आणि भीषण इतिहासावर प्रकाश पडणार असल्याचा दावा 'नासा'तर्फे करण्यात आला आहे.

प्लुटो या सूर्यमालेतील ग्रहाबद्दल फारशी माहिती नाही.

प्लुटोचा 'चेरॉन' हा सर्वात मोठा चंद्र प्लुटोच्या व्यासाच्या निम्म्या आकाराचा येतो.

'चेरॉन' हा चंद्र केवळ पर्वतीय आणि ओबडधोबड असल्याचा समज होता पण तो पर्वतीय, उंच शिखरे, सपाट भूप्रदेश आणि भूपृष्ठावर वेगवेगळे रंग असणारा असल्याचे नव्या चित्रावरून दिसून येते.

'न्यू होरायझन' यानाने 14 जुलै रोजी प्लुटोभोवती फेरी मारली आणि त्यावेळी टिपलेली छायाचित्रे 21सप्टेंबर रोजी पाठविली.

त्यात या चंद्राच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ओबडधोबड, पर्वतीय भाग दिसतो

No comments:

Post a Comment