* कॅम्पबेल, ओमुरा, तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल:-
------------------------------------------------------------------------------------------------
* मानवी शरीरामध्ये असलेल्या परजीवी कृमींवर उपचार शोधून काढणारे आर्यलडचे विल्यम कॅम्पबेल, जपानचे सातोशी ओमुरा आणि चीनच्या श्रीमती योउयू तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल यंदाच्या वर्षी (२०१५) जाहीर करण्यात आले आहे.
* साडेनऊ लाख अमेरिकी डॉलर आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
* ओमुरा आणि कॅम्पबेल यांनी परजीवींमार्फत होणारे संक्रमण रोखण्यासाठी उपचारपद्धती विकसित केली, तर युयु तू यांनी मलेरियावरील नव्या उपचारांवर संशोधन केले आहे.
युयु तू:
* मलेरियासाठी तयार करण्यात आलेल्या आर्टेमिसाईनिन आणि हायड्रोआर्टेमिसाईनिन या औषधांची निर्मिती युयु तू यांनी केली आहे. या औषधांमुळे दक्षिण आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांच्या आरोग्यात प्रचंड सुधारणा झाली. विसाव्या शतकातील महत्त्वाच्या संशोधनांमध्ये तू यांच्या संशोधनाचा समावेश केला जातो. यासाठीच त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात येत आहे. तू यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल 2011मध्ये लॅस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. विशेष म्हणजे चीनमधील पारंपरिक औषधी वनस्पतींच्या आधाराने त्यांनी संशोधन केले.
* चिनी संशोधक असलेल्या यांनी बीजिंग वैद्यकीय विद्यापीठातून 1955मध्ये पदवी मिळविली. त्या 1965पासून 1978पर्यंत चायना ऍकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये सहायक प्राध्यापक होत्या. त्यानंतर 2000पासून त्या त्याच संस्थेत मुख्य प्राध्यापक आहेत.
* ओमुरा:-
* ओमुरा हे बायोकेमिस्ट आहेत. त्यांनी व कॅम्पबेल यांनी परजीवींपासून होणारे संक्रमण रोखण्यासाठी औषधांमध्ये सूक्ष्मजीवांचा (मायक्रोऑरग्यानिजम) वापर करण्याची पद्धती विकसित केली. "रिव्हर ब्लाइंडनेस‘ (नदी पात्रात वाढणाऱ्या काळ्या माशा चावल्याने येऊ शकणारे अंधत्व) आणि "लिंफॅटिक फिलारिऍसिस‘ या दोन रोगांवरील औषधे तयार करण्यासाठीची पद्धती त्यांनी विकसित केली.
* टोकियो विद्यापीठातून फार्मास्युटिकल सायन्समध्ये पीएचडी मिळविणारे सतोशी ओमुरा यांनी 1965 ते 1971 या कालावधीत किटासातो इन्स्टिट्यूटमध्ये काम केले, तसेच किटासातो विद्यापीठात 1975 ते 2007पर्यंत प्राध्यापकपदी काम केले. सध्या ते तेथेच मानद प्राध्यापक आहेत
* कॅम्पबेल:-
* कॅम्पबेल यांचा जन्म 1930मध्ये झाला. त्यांनी ट्रिनिटी कॉलेजमधून "बीए‘ची पदवी मिळविली. विस्कॉन्सिन्स विद्यापीठातून त्यांनी 1957मध्ये "पीएचडी‘ पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी 1957 ते 1990 या कालावधीत मर्क इन्स्टिट्यूट फॉर थेरॅप्युटिक रिसर्चमध्ये काम केले. सध्या ते अमेरिकेतील ड्रू विद्यापीठात "रिसर्च फेलो एमिरेट्स‘ आहेत.
_______________________________
No comments:
Post a Comment