बँक
व्यापारी बँका-व्यापारी बँकांचे सूचित व असूचित असे दोन प्रकार आहेत.
सूचित बँक- ज्या बँकांचे वसूल भांडवल व राखीव निधी मिळवून एकत्रित रक्कम 5 लाख रूपये अथवा त्यापेक्षा अधिक असेलतर त्यांचा समावेश सूचित यादित होता. त्यांना सूचित बँका असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून त्यांना काही सवलती मिळतात. त्याच बरोबर त्यांना रिझर्व्ह बँकेच्या काही नियम, कायदे कानून यांचा अवलंबन करावा लागतो. या बँकांचे व्यवहाराचे नियमन रिझर्व्ह बँक करते.
असूचित बँक-ज्या बँकांचे वसूल भांडवल व राखीव निधी मिळवून एकत्रित रक्कम 5 लाख रूपयांपेक्षा कमी असते. अशा बँकांचा रिझर्व्ह बँकेच्या यादीत समावेश नसतो. अशा बँकाला असूचित बँका म्हणतात. या बँकावर रिझर्व्ह बँकेचे फारशे बंधन नसतात.
सहकारी बँक- लोकांना बचतीची सवय लागावी व त्यांना योग्य कारणासाठी कर्ज मिळावे हा सहकारी बँकेचा मुख्य उद्देश्य असतो. सहकारी बँक व्यवसायाची रचना त्रीस्तरीय असते.
प्राथमिक सहकारी संस्था- लोकांच्या ठेवी स्वीकारतात व सभासदांना कर्जाचा पुरवठा करणे. या संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद असतात. ह्या बँका शेतकर्यांना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज देते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक- या बँका प्राथमिक सहकारी बँकांवर नियंत्रण व देखरेख ठेवतात व त्यांना कर्ज देतात. राज्यपातळीवरही राज्य सहकारी बँकांकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना कर्जपुरवठा होतो. ह्या बँका 5-10 वर्ष मुदतीचे कर्ज देते.
मध्यवर्ती बँक- ही बँक देशातील बँक व्यवसायावर नियंत्रण ठेवणारी बँक असते. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील मध्यवर्ती बँक असून तिची स्थापना 1 एप्रिल 1935 साली करण्यात आली. मध्यवर्ती बँकांचे मुख्य उद्देष्ट देशात आर्थिक स्थैर्य राखून आर्थिक प्रगतिस पोषक असे कार्य करणे. ही बँक लोकांकडून ठेवी स्वीकारत नाही व व्यक्तिगत पातळीवर कर्जाचे व्यवहारही करत नाही. तिची कार्य व्यापारी बँकांपेक्षा फार वेगळी असतात. भारत सरकारची नाणे रिझर्वह बँक चलनात आणते. ही चलन निर्मिती रिझर्वह बँक काही प्रमाणाच्या राखीव निर्मितीच्या आधारावर करते.
No comments:
Post a Comment