Bookmark

Bookmark this Blog

Thursday, October 8, 2015

रसायनशास्त्र आणि साहित्य व न्युट्रिनोचे कोडे सोडविणार्यांना नोबेल २०१५


रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2015 :

ऑक्टोबर 2015 महिन्यामध्ये या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. या लेखामध्ये आम्ही वैद्यकशास्त्रात मिळालेल्या नोबेल पुरस्काराची माहिती देत आहोत.

'गुणसूत्रांतील दुरुस्तीचा तांत्रिक अभ्यास' याविषयीच्या संशोधनासाठी स्वीडनचे संशोधक थॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रीच व अमेरिकन-तुर्कीश शास्त्रज्ञअझीज सॅंसर यांना या वर्षीचा रसायनशास्त्रातील "नोबेल" पारितोषिक जाहीर झाले आहे.
 गुणसूत्रांतील दुरुस्तीच्या तांत्रिक अभ्यासामुळे जीवित पेशींच्या कार्यपद्धतीविषयीची मूलभूत माहिती जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
 कर्करोगाच्या उपचारांसहित इतर बाबींमध्ये सुधारणा होण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे रॉयल स्विडीश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
 लिंडाल (वय 77) हे फ्रान्सिस क्रीक इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रमुख व ब्रिटनस्थित क्‍लॅरे हॉल लॅबोरेटरीमधील कर्करोग संशोधन विभागाचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत.
 तर मॉड्रीच हे सध्या हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक असून, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतातील ड्युरहॅममधील ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन येथे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 तसेच नॉर्थ कॅरोलीना प्रातांतील चॅपेल हिल भागातील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये सॅंसर (69) प्राध्यापक आहेत.

# बेलारूस येथील प्रसिद्ध लेखिका स्वेतलाना एलेक्सीविच (67) यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यात नोबेल पुरस्कार पटकावणार्‍या स्वेतलाना या 14 व्या महिला ठरल्या आहेत.

* न्यूट्रिनोंचे कोडे सोडविणाऱ्यांना नोबेल
--------------------------------------------------------------------------------
* न्यूट्रिनों कणांविषयी सखोल ज्ञान देणाऱ्या संशोधनासाठी जपानचे ताकाकी काजिता व कॅनडाचे आर्थर मॅकडोनल्ड यांना यंदा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
* न्यूट्रिनो कणांचे गुणधर्म रंग बदलणाऱ्या श्ॉमेलिऑन सरडय़ासारखे बदलत असतात व त्यांचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असते, असे या अभ्यासकांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले.
* काजिता व मॅकडोनल्ड यांनी अनुक्रमे सुपर कामियोकँडे डिटेक्टर (जपान) व सडबरी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी (कॅनडा) येथे संशोधन केले आहे
* विजेत्यांना ८० लाख क्रोनर म्हणजे ९ लाख ६० हजार अमेरिकी डॉलर्स विभागून मिळणार आहेत.

* ताकाकी काजिता:-
* काजिता (वय ५६) हे टोकियो विद्यापीठात प्राध्यापक असून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्मिक रे रीसर्च’ या संस्थेचे संचालक आहेत.
* १९९८ मध्ये काजिता यांनी न्यूट्रिनो कण पकडले होते व वातावरणामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला होता
* २००२ मधील नोबेल विजेते मासतोशी कोशिबा यांचे विद्यार्थी आहेत. कोशिबा यांचे संशोधनही न्यूट्रिनोवरच आहे.

* आर्थर मॅकडोनल्ड:-
* मॅक्‌डोनाल्ड (72) हे कॅनडातील किंग्स्टनमधील क्विन्स विद्यापीठात "प्रार्टिकल फिजिक्‍स‘चे प्राध्यापक आहेत

No comments:

Post a Comment