#सायबर गुन्हेगारी!
●सायबर गुन्हेगारांसाठी कायदा:-
सायबर गुन्ह्यांच्या विरोधात प्रामुख्याने भारतीय दंडसंहिता या पारंपरिक कायद्याचा वापर केला जात असला तरी माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० या गुन्ह्यांमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्याला मे २००० मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या कायद्यात सायबर गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याचे नेमके अधिकार कुणाला आहेत, त्यात लायसन्स देणे, नाकारणे, सायबर अपील न्यायाधिकरण, भारताबाहेरील गुन्ह्यांसाठी असलेली कायदेशीर तरतूद यांचा समावेश आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या गोपनीय माहितीचे महत्त्व आणि त्याचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई करता येईल, याचाही उल्लेख आहे.
माहिती तंत्रज्ञान नियम-२००० आणि सायबर विनियम अपील न्यायाधिकरण (कार्यपद्धती) २००० याविषयी माहिती देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचे एकूण १३ भाग असून, त्यात एकूण ९० उपघटकांचा समावेश आहे. त्यात पूर्वीचे चार कायदे समाविष्ट केले आहेत. त्यामुळे त्याचे पूर्ण स्वरूप एकूण ९४ उपटकांत समाविष्ट केले आहे. बनावट आयडी, दुसऱ्याच्या नावाने प्रोफाइल-ई-मेल आयडी, दुसऱ्याच्या नेटवर्कचा गैरवापर करणे, संगणकामध्ये जाणूनबुजून व्हायरस पाठविणे, माहितीची चोरी करणे, चाइल्ड पोर्नोग्राफी व इतर प्रकारचे सायबर गुन्हे आयटी ऍक्टमध्ये आले आहेत. यामध्ये तीन वर्षांपासून ते आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.
●सोशल मीडियाबद्दल आय-टी कायद्यातील काही तरतुदी
●कलम- ६६ अ:- एखाद्यास बदनामीकारक, खोडकर संदेश पाठविणे किंवा एखादी खोटी माहिती पसरविणे ज्यामुळे कुणाची अडचण, कुंचबणा होणे. धोका निर्माण होऊन त्रास, मानहानी, इजा होणे. आकस, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते किंवा द्वेषभावना वाढीस लागू शकते किंवा एखाद्या संदेशाचे मूळ स्रोत लपविणे किंवा खोटे भासविणे अशा कृती केल्यास तीन वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे.
●कलम-६६ सी:- दुसऱ्याचा पासवर्ड चोरी करणे, त्याच्या परवानगीशिवाय वापरणे, डिजिटल हस्ताक्षर व फिंगर प्रिंटचा गैरवापर यासाठी तीन वर्षे आणि शिक्षा एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
●कलम- ६६ डी:- दुसऱ्याचा डुप्लिकेट आयडी, मेल आयडी, प्रोफाइल तयार करणे, वेबपेज चोरी करणे, दुसऱ्याच्या नावाने एसएमएस, फसविण्याच्या हेतूने ई-मेल पाठविणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा आणि एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
●कलम- ६६ ई:- चोरून कुणाचे अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करणे व ते इंटरनेटवर टाकणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा व एक लाखापर्यंत दंडाची तरतूद.
●कलम- ६७ बी :-चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये पाच वर्षे शिक्षा आणि दहा लाखांपर्यंत दंड.
●कलम ६७ सी:- इंटरनेट, संगणकाचा वापर करणाऱ्या प्रत्येक युजरचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक. जर रेकॉर्ड ठेवले नाही तर गुन्हा समजला जाईल. यासाठी तीन वर्षे शिक्षा, एक लाखापर्यंत दंडाची तरतूद.
●कलम- ६९ :- मोबाईल, सेवा सुविधा प्रदान करणाऱ्या कंपन्यांनी मास्टर की सरकारला देणे बंधनकारक केले आहे. यामध्ये सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा.
Bookmark
Bookmark this Blog
Thursday, October 8, 2015
सायबर गुन्हेगारी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment