पेशींचे प्रकार
1. दृश्याकेंद्रकि पेशी (eukaryotic cells) :
ज्या पेशींची अंगके पटल वेष्टित असतात त्यांना दृशाकेंद्रकी पेशी असे म्हणतात.
केंद्रपटल, केंद्रकी आणि केंद्रकद्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक या पेशींमध्ये असते.
तुलनेने बऱ्याच मोठ्या असून आकार 5-100 um एवढा असतो.
या पेशींमध्ये एकापेकाक्षा जास्त गुणसूत्रे असतात.
उच्च विकसित एकपेशी व बहुपेशी प्राण्यांमध्ये या पेशी असतात
.उदा : शैवाल ,कवके,प्रोटोझुआ,वनस्पती व प्राणी
2) आदिकेंद्रकी पेशी (prokaryotic cell) :
ज्या पेशींच्या अंगकाभोवती आवरण नसते त्यांना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात.(lacking nuclear membrance)
या पेशी अत्यंत सध्या असतात.(primary)
या पेशींचे तीन मुलभूत घटक असतात.प्रद्रव्यपटल,पेशीद्र्व्य आणि केंद्रकद्रव्य .
केंद्रकाभोवती पटल नसल्यामुळे पेशीमधील जनुकीय द्रव्याचा (DNA) पेशिद्रव्याशी थेट संपर्क असतो. त्यांच्यामध्ये एकाच गुणसूत्र असते. पेशिद्रव्याच्या या DNA असलेल्या अस्पष्ट भागास केंद्रकाभ (nucleoid) म्हणतात.
आदीकेंद्रकी पेशी आकाराने लहान असून 1-10 um आकाराच्या असतात. उदा. जीवाणू (bacteria) ,नील-हरित शैवाल (B-G Algae)
Bookmark
Bookmark this Blog
Thursday, October 8, 2015
पेशींचे प्रकार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment