Bookmark

Bookmark this Blog

Thursday, October 8, 2015

न्युटनचे गतीविषयक नियम

न्‍यूटनचे गतीविषयक नियम:

 न्‍यूटनचे गतीविषयक तीन नियम प्रसिद्ध आहे.

अ) न्‍यूटनचा गतीविषयक पहिला नियम :- कोणत्‍याही वस्‍तूवर बलाची क्रिया झाल्‍याशिवाय ती वस्‍तू आपली अवस्‍था स्‍वत:हून बदलवित नाही. न्‍यूटनच्‍या या नियमावर आधारित खालील उदाहरणे आहेत.
१. वेगाने धावणा-या गाडीचे अचानक ब्रेक दाबले असता आतील प्रवासी पुढे झुकतात.
२. मैदाने सपाट करण्‍यासाठी आणलेल्‍या रोलरला गती देण्‍याकरिता जास्‍त शक्‍ती खर्च करावी लागते. एकदा गतिमान झाल्‍यानंतर फारसे प्रयत्‍न करावे लागत नाहीत.

ब) न्‍यूटनचा गतीविषयक दुसरा नियम :
१. संवेग : संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्‍त बलाशी समानुपाती असतो.
संवेग म्‍हणजे वस्‍तूमान व वेग यांचा गुणाकार होय. संवेगाची तीव्रता ही वस्‍तूमान आणि वेग या दोन्ही गोष्‍टीवर अवलंबून असते.
उदा.:- 
१. हाताने फेकलेली बंदुकीची गोळी लाकडात घुसत नाही परंतु बंदुकीमधून झाडलेली गोळी मात्र लाकडात घुसते. ही घटना गोळीचा वेग जास्‍त असल्‍यामुळे घडून येते.
२. वेगाने जाणा-या दुचाकीचा धक्‍का पायी चालणा-या मनुष्‍याला बसला, तर त्‍याला कमी इजा होते. परंतु दुचाकी इतका वेग असणा-या मोटारीचा धक्‍का पायी जाणा-या मनुष्‍यास बसला तर त्‍याला गंभीर इजा होते. कारण यावेळी गाडीचे वस्‍तूमान दुचाकीपेक्षा जास्‍त आहे.

क) न्‍यूटनचा गतीविषयक तिसरा नियम :- कोणत्‍याही वस्‍तूवर बलाची क्रिया केली असता, बलाची क्रिया करणा-या त्‍या वस्‍तूद्वारे तेवढयाच परिमाणाचे प्रतिक्रिया बल कार्य करीत असते.
उदा.:- 
१. दाराला लाथ मारली असता दार तितक्‍याच प्रतिक्रियेने आपल्या पायावर बल प्रेरित करते.
२. अग्निबाण उडत असतांना वातावरणात बलाची क्रिया करते. तेवढयाच बलाने वातावरणाकडून अग्निबाणावर प्रतिक्रिया केली जाते.
________________________________

3 comments: